HomeUncategorizedविद्यार्थी शाळेत शिक्षक, शिक्षिका कोल्हापुरातील बायोमेट्रिक कॅम्प मध्ये प्राथमिक शिक्षण प्रशासनाचा सावळा...

विद्यार्थी शाळेत शिक्षक, शिक्षिका कोल्हापुरातील बायोमेट्रिक कॅम्प मध्ये प्राथमिक शिक्षण प्रशासनाचा सावळा गोंधळ.-सदर कामकाज तालुकास्तरीय पंचायत समिती विभागात घेण्याची पालकांची मागणी.

विद्यार्थी शाळेत शिक्षक, शिक्षिका कोल्हापुरातील बायोमेट्रिक कॅम्प मध्ये प्राथमिक शिक्षण प्रशासनाचा सावळा गोंधळ.-
सदर कामकाज तालुकास्तरीय पंचायत समिती विभागात घेण्याची पालकांची मागणी.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग मार्फत राबविण्यात आलेले बायोमेट्रीक ऑथेंटीकेशन कॅम्प आयोजित करणेत येत असलेबाबत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेचे केला मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका, यांना बायोमेट्रिक कॅमसाठी कोल्हापूरमध्ये मागील दोन दिवसांपासून यापुढील तीन दिवस जोपर्यंत आपल्या शाळेचे
सदर कॅम्पसाठी हजर राहण्याची सक्ती करणेत आली.
यामध्ये परिपत्रकात जोडण्यात आलेल्या यादीतील शाळेच्या HOI (Head of Institute) व INO (Institute Nodal Officer) यांनी बायोमेट्रीक ऑथेंटीकेशन साठी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आधारकार्ड, मुख्याध्यापक मान्यता व सोबत जोडण्यात आलेल्या नमुना घेऊन उपस्थित राहावे. असे परिपत्रक काढण्यात आले आहे.


तसेच सदर शाळांनी खालील Update Institute करुन यावे. NSP पोर्टल School Nodal Officer Login Administration Update Institute (यामध्ये HOI व INO यांची सर्व माहिती भरावी व शाळेचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट अपलोड करुन माहिती सबमिट करावी. यासाठी जिल्ह्यातील हजारो शिक्षक कोल्हापुर येथे मेन राजाराम हायस्कूलमध्ये कॅम्प साठी सकाळपासून रांगेत आहेत याबाबतची अध्यात प्रशासनाकडून नियोजन नसल्याने शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. विद्यार्थी शाळेत आणि शिक्षक कॅम्पमध्ये सदर बायोमेट्रिक कॅम्प तालुक्याच्या पंचायत समिती विभागामध्ये आयोजित केली असती तर विद्यार्थ्यांची हेडसाळ व शिक्षकांची तारांबळ उडाली नसती.. शिक्षण विभागाचा हा कारभार हा दिशाहीन झालेला आहे. अशी प्रतिक्रिया पालकांच्याकडून येत आहे.
एकीकडे कमी पटाच्या शाळा शासन बंद करत असताना पालकांची मानसिकता प्राथमिक शाळेत पाठवण्याची नाही. तरीही ग्रामीण भागातील शाळा टिकल्या पाहिजे यासाठी आपल्या मुलांना प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत असताना हा शासनाचा कारभार असा असतो… सदर काम ऑनलाईन प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समिती मधून केले असते तर जिल्ह्यातील हजारो शिक्षक कोल्हापुरात बोलण्याची गरज कशी भासते.. व हा त्रास कोणाला होऊ नये म्हणून केला जात आहे.
असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर कॅम्प तालुका पंचायत समिती विभागात बोलवावी अन्यथा पालकांच्या वतीने आंदोलन करण्याच्या तयारी पालक संघटना करत आहे.
एकीकडे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक कमी असताना एका शिक्षकाकडे दोन-तीन वर्ग दिले आहेत यामध्ये मुख्याध्यापक यांच्याकडे देखील काही वर्ग दिले जातात अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक जर कोल्हापूर येथे बोलवून कॅम्प घेतली जात असेल किंवा त्या कॅम्प कालावधीत संपवायचे असेल तर यापूर्वी चालू का केले नाही. तर शिक्षकांच्या वर अन्याय झाला तर शिक्षक आंदोलन करतात मग आता विद्यार्थी शाळेत ठेवून आपण काम कोल्हापुरात शाळेच्या कामासाठी गेला आहात. मग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक ही सदर कॅम्प तालुकास्तरीय व्हावी. अशी मागणी का? करत नाहीत.
यामुळे असा होत असलेला प्राथमिक शिक्षणाचा सावळा गोंधळ थांबावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी देखील शिक्षक संघटनेने पुढे येण्याची गरज आहे. परंतु शिक्षक संघटना शांत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.