HomeUncategorizedशेतकरी हाच खरा साखर कारखान्याचा मालक_नुतन संचालक अशोक तर्डेकर. - (मलिग्रे ग्रामस्थ...

शेतकरी हाच खरा साखर कारखान्याचा मालक_नुतन संचालक अशोक तर्डेकर. – (मलिग्रे ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार सोहळा संपन्न.)

शेतकरी हाच खरा साखर कारखान्याचा मालक_नुतन संचालक अशोक तर्डेकर. – मलिग्रे ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार सोहळा संपन्न

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालूका शेतकरी सहकारी साखर कारखान्याला ऊर्जीत स्वरूप देणे, ही आम्हा संचालकांची जबाबदारी असून, तालुक्यातील शेतकरी व साखर कारखाना कामगार याना शाश्वत विकास देण्यासाठी पंचसूत्राचा अवलंब करून ,मी सभासदांचा विश्वस्त म्हणून कार्यरत राहणार असून, शेतकरी हाच खरा या साखर कारखान्याचा मालक आहे.असे विचार मलिग्रे येथील मलिकार्जून मंदिरांत, मलिग्रे ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या वतीने आजरा साखर कारखाना संचालक पदी निवड झाले बद्दल, सत्कार प्रसंगी बोलताना, अशोक तर्डेकर यांनी मत व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी, निवृत्त पोलिस अधिकारी, शंकर नेसरीकर होते. यावेळी तर्डेकर यांनी सहकारी साखर कारखाना निवडणूक निमित्ताने ज्यांनी सहकार्य केले त्या गडहिंग्लज, आजरा राजकीय पक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते, मित्र परिवार व ग्रामस्थ या सर्वांना धन्यवाद देत, तुमच्या ॠणात राहून, साखर कारखान्यात सर्वाचा प्रतिनिधी म्हणून लक्ष घालून,शेअर्स संदर्भातील अडचणी, समजून घेवून, जन जागृती करणार आहे. ऊस उत्पादकांचे प्रश्न, तसेच सभासदांना साखर वाटप . कामगारांना असणार्या अडचणी आणी साखर कारखाना कर्जमुक्त होण्यासाठी, विरोधी बाकावरून पंचसूत्राचा वापर करणार आहे. मी वारकरी संप्रदायातील असल्याने , प्रमेश्वाराच्या कृपेने तुमच्या सेवेत राहीन, असे मत तर्डेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती अनिरुध्द रेडेकर यांनी, संचालक तर्डेकर हे मुंबई महानगरपालिकाचे निवृत्ती कार्यकारी अभियंता आहेत. त्यांनी आपल्या कौशल्येने आजरा वाशीयाचे सहकारातील वैभव जपण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. कार्यक्रम चे अध्यक्ष शंकर नेसरीकर यांनी मलिग्रे गावाला मिळालेले प्रतिनिधित्व हे अभ्यास पूर्ण महीती असणारे नेतृत्व आहे .या निमित्ताने जिल्ह्यातील लोका पर्यंत मलिग्रे गावचे नेतृत्व पोहचले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागत व सुत्रसंचालन संजय घाटगे यांनी केले. प्रास्ताविक अशोक शिंदे यांनी केले यावेळी समिर पारदे, सरपंच सौ शारदा गुरव, सुरेश पारदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ, भावेश्वरी पत संस्था, रवळनाथ दुध संस्था, मलिकार्जून विकास संस्था व मुंबई मित्र मंडळ याच्यावतीने संचालक तर्डेकर याचा सत्कार करणेत आला. यावेळी उपसरपंच सुरेखा तर्डेकर, शोभा जाधव चेअरमन शिवाजी कागिनकर केशव बुगडे, विष्णू आसबे पांडूरंग सावंत, दशरथ पारदे, विश्वास बुगडे, अनिल बुगडे बावीस बार्देसकर,अनिल कागिनकर, आपाजी बुगडे, पोलिस पाटील मोहन सावंत, तंटा कमिटी अध्यक्ष संजय बुगडे याच्या सह सर्व संस्था चे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार मारूती ईक्के यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.