HomeUncategorizedआजरा साखरच्या चेअरमन पदी वसंतराव धुरे तर व्हा. चेअरमन पदी एम. के....

आजरा साखरच्या चेअरमन पदी वसंतराव धुरे तर व्हा. चेअरमन पदी एम. के. देसाई. यांची बिनविरोध निवड.

आजरा साखरच्या चेअरमन पदी वसंतराव धुरे तर व्हा. चेअरमन पदी एम. के. देसाई. यांची बिनविरोध निवड.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीला १९ जागेवर विजय मिळवण्यात यश आले होते. दि‌.२८ डिसेंबर रोजी चेअरमन व व्हा चेअरमन निवड झाली. या निवडीमध्ये चेअरमन पदी वसंतराव धूरे तर व्हा. चेअरमन पदी एम.के देसाई यांची निवड करण्यात आली. निवडी नंतर बोलताना चेअरमन वसंतराव धूरे म्हणाले चालू गळीत हंगाम हा खडतर असणार आहे. तर यावर्षीच्या हंगामातील तोट्याचा खड्डा अधिक वाढणार आहे पण कोणताही अधिक खर्च न वाढवता कारखाना सुरळीत चालण्यासाठी सर्व संचालक चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत व कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी सर्व संचालक मंडळ आम्ही प्रयत्न करणार आहोत असे बोलताना म्हणाले यावेळी साखर सह संचालक निवडणूक अधिकारी गोपाळ मावळे म्हणाले ऊस विकास परिषदेच्या माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये असे उत्पन्न अधिक वाढवून क्रशिंग जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.‌ यासाठी सर्व संचालक मंडळांनी या दोन गोष्टीकडे लक्ष द्यावे या दोन गोष्टीकडे लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने कारभार करावा असे म्हणाले. यावेळी संचालक मुकुंदराव देसाई काशिनाथ तेली व्हाईस चेअरमन एम. के. देसाई, यांनी कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने काम करत ऊस उत्पादन वाढवून करण्याचे क्रशिंग कसे वाढेल याकडे लक्ष देणार असल्याचे बोलताना सांगितले. यावेळी भाजपचे संग्राम कुपेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई उपस्थित होते.
चेअरमन निवडीसाठी सूचक म्हणून मुकुंददादा देसाई तर अनुमोदक उदयराज पवार व्हा. चेअरमन निवडीसाठी सूचक विष्णुपंत केसरकर तर अनुमोदक आनंदा फडके होते. चेअरमन व्हा. चेअरमन निवडीचा बंद लकोटा भाजपचे संग्राम कुपेकर यांनी फोडून निवडी घोषित केल्या. निवडणूक अधिकारी म्हणून श्री माळवे यांनी काम पाहिले. यावेळी सर्व नुतन संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी आभार मांनले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.