चित्री धरणातील पाण्याचा एकही थेंब कोणत्याही कंपनीला देऊ देणार नाही. – श्रमिक मुक्ती दल
आजरा – प्रतिनिधी.
चित्री धरणातील पाण्याचा एकही थेंब कोणत्याही कंपनीला देऊ देणार नाही. असे श्रमीक मुक्ती दल यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
पाटगाव धरण अदानी कंपनीला देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला असून त्या पाठोपाठ चित्री धरण ही वीज निर्मितीसाठी आंध्रातील खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वर्तमान पत्रात आलेल्या बतमीतून समजते. हा प्रकल्प सिचन प्रकल्प असून आजरा गडहिंग्लज तालुक्यातील शेतकर्यांचाच त्यावर पहिला हक्क आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे हे पाणी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा हा प्रकार आहे. शासनाचा हा प्रयत्न आजरा गडहिंग्लज तालुक्यतील शेतकरी हाणून पाडतील याबाबत लवकरच बैठक घेऊन जन आंदोलन उभा करू असा इशारा आज आम्ही देत आहोत.
असे पत्रक श्रमिक मुक्ती दल व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कॉ संपत देसाई, दशरथ घुरे, प्रकाश मोरुस्कर, नारायण भदंगे, अशोक बांदेकर, युवराज जाधव, नामदेव फगरे, बाळू जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
