अज्ञान व्यक्तीने अनेक जणांच्या फोडल्या रस्त्याकडेच्या १५ चार चाकी गाड्या.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील पूर्व भागातील सरोळी, निंगुडगे व गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर येथील सुमारे १५ चारचाकी गाड्या अज्ञातांनी रात्री फोडल्या आहेत. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
रस्त्याकडेला उभ्या केलेल्या या गाड्यांची तोडफोड केली आहे.
गाड्यांच्या काचांचा दगडाने फोडल्या आहेत. कांही गाड्यांमधील किरकोळ साहित्य लंपास केले आहे. नादुरुस्त गाड्यांसह सुस्थितीत असलेल्या चारचाकी गाड्यांचा यामध्ये समावेश आहे.
ऐनापूर येथील सुनील कुराडे, राजू कडाकने, सदाशिव कागवाडे, सरोळी येथील पशुवैद्यकीय डॉ विजय पाटील, बाळासाहेब पोवार, रमेश देसाई, एस.आर.पाटील, निंगुडगे येथील बाळू बोलके, महेश देसाई, प्रकाश मगदूम, सुनील देसाई आदींच्या गाड्यांचे नुकसान केले आहे. घटनास्थळी पोलिस रवाना झाले आहेत. झालेल्या प्रकारची पाहणी करत आहेत.
