खासदार निलंबन कारवाईचा आजरा शिवसेना व प्रागतिक पक्षाकडून निषेध.- जोरदार निदर्शने.
आजरा.- प्रतिनिधी.
खासदार निलंबन कारवाई मधून या देशात अघोषित आणिबाणी लागू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
या दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीने शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी देशात सर्वत्र निदर्शने करण्याची हाक दिली होती. त्या अनुषंगाने आजरा येथे ( उबाठा ) शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
प्रागतिक पक्षांच्या आघाडीमधील सर्व घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी आपापल्या भागातील निदर्शनामध्ये संपूर्ण शक्तीनिशी सहभागी व्हावे. असे आवाहन वरिष्ठ नेत्यांनी केले होते. शक्य व आवश्यक असेल, तेथे पुढाकार घ्यावा. तसेच इंडिया आघाडीमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यासह एकत्रित निदर्शने करण्यात यावीत असे प्रागतिक पक्षांच्या आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. .निलंबित खासदारांवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या १४१ खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे…लोकसभेतून एकूण ९५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर ४६ सदस्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे…संसदेच्या कामकाजानंतर इंडिया आघाडीने शुक्रवारी देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाची घोषणा केली होती. आजरा येथील या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत उप.ता.प्रमुख संजय येसादे, शिवाजी आढाव, जयसिंग पाटील, शहर प्रमुख ओमकार माधाळकर, युवा सेनेचे महेश पाटील, तसेच दिनेश कांबळे, नारायण कांबळे राष्ट्रीय काँग्रेसचे नौशाद बुड्डेखान सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
