आजरा नगरपंचायतच्या मुतारीत दारूच्या रिकामी बाटलीचा. ढीग.- मुतारी बाहेरून सुंदर – आत मध्ये दुर्गंधीच.
आजरा.- संभाजी जाधव.

आजरा नगरपंचायत हद्दीतील आजरा शहरातील प्रमुख चौक व आंबोलीकडे जाणाऱ्या चौकातील मुतारी मध्ये दारूच्या रिकामी बाटलींचा अक्षरशः ढीग लागला आहे.
त्याच्यापेक्षा अधिक दुर्गंधी व अस्वच्छता आहे.
आता ही समस्या थोडी वेगळीच आहे. दारूच्या बाटलीचा लागलेला आहे. हा बाटलींचा ढीग नगरपंचायत कर्मचारी काही मुतारीच्या दारात येवून कोण बाटली टाकली बघायला जात नाही. त्यांची ही जबाबदारी देखील नाही. दारू पिणाऱ्या व्यक्तीने ती बाटली तिथे टाकावी की नाही. हे ठरवलं पाहिजे ती जागा बाटली टाकायची नाही.
व याला जबाबदार कर्मचारी किंवा नगरपंचायत नाही.

परंतु मुतारी मध्ये काय आहे. किंवा मुतारी स्वच्छ आहे. की नाही हे पाहाण्याची जबाबदारी नगरपंचायतची नक्कीच आहे. नगरपंचायत या मुतारीकडे फिरकतच नसल्याचे चित्र त्या ठिकाणी आहे. इतकी दुर्गंधी व अस्वच्छता आहे. की आत मध्ये गेल्यानंतर चक्कर येण्यासारखा वास या मुतारीत येतो.
म्हणजेच नगरपंचायत कर्मचारी स्वच्छता विभाग यांचे दुर्लक्ष नक्कीच आहे.
यापुढे देखील दारूच्या रिकामी बाटल्यांचे ठीक त्याठिकाणी साचणारच यापूर्वी देखील होतेच.
प्रश्न उपस्थित होतो दुर्गंधीचा या परिसरात केवळ एकच सार्वजनिक मुतारी असल्याने तालुक्यातील व नगरपंचायत हद्दीतील नागरिक या ठिकाणी या मुतारीचा लाभ घेतात.
आता याकडे नगरपंचायत चे अधिकारी जर या मुतारीकडे सत्त्यता पाहणी करण्यासाठी गेले तर त्यांच्या लक्षात येईल आजरा शहरातील ही मुतारी व अन्य ठिकाणी असलेल्या मुताऱ्यांची अस्वच्छता किती आहे.
तसं आणि एक बाबतीत नगरपंचायत चे दुर्लक्ष आहेत. पण आरोग्याच्या दृष्टीने घातक असणाऱ्या या मुतारीकडे नगरपंचायतने आता तरी लक्ष द्यावे. अन्यथा मुतारी स्वच्छ करा म्हणून आजरा शहरातील नागरिकांना निवेदन देण्याची वेळ येऊ देऊ नये. यासाठी ही मुतारी व शहरातील अस्वच्छ असणाऱ्या मुताऱ्या ताबडतोब स्वच्छ करून घ्याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
