HomeUncategorizedअभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात!- बॅनरबाजीमुळे चर्चा.🛑तळीरामांसाठी झिंगाट निर्णय. रातभर बसा...

अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात!- बॅनरबाजीमुळे चर्चा.🛑तळीरामांसाठी झिंगाट निर्णय. रातभर बसा अन् सकाळी.- दारुची दुकानं आणि बार इतक्या वाजेपर्यंत सुरु राहणार.👇👇🛑पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बजरंग पुनियाने परत केला पद्मश्री पुरस्कार,

🛑अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात!- बॅनरबाजीमुळे चर्चा.
🛑तळीरामांसाठी झिंगाट निर्णय. रातभर बसा अन् सकाळी.- दारुची दुकानं आणि बार इतक्या वाजेपर्यंत सुरु राहणार.👇👇
🛑पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बजरंग पुनियाने परत केला पद्मश्री पुरस्कार,

मुंबई.- प्रतिनिधी.

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आणि लोकसभेची निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात होती. त्याला पुष्टी देणारे बॅनर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात लागले आहेत. हा मतदारसंघ भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप माधुरी दीक्षित हिला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार का, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माधुरी दीक्षित हिच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी मोदी सरकारने केलेल्या कामाचे बुकलेट शाह यांनी माधुरी दीक्षित हिला भेट दिले हेाते. त्या भेटीनंतर माधुरी दीक्षित ही भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली होती. त्यावर खुद्द माधुरी हिने आणि भाजपकडूनही भाष्य करण्यात आले नव्हते. मात्र, माधुरी ही निवडणुकीच्या राजकारणात उतरणार, अशी चर्चा तेव्हापासून रंगली आहे.

उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ पूनम महाजन यांचा आहे. या मतदारसंघातून पूनम महाजन ह्या दोन निवडणुका निवडून आलेल्या आहेत. सध्याही हा मतदारसंघ भाजपला पोषक मानला जातो.

पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बजरंग पुनियाने परत केला पद्मश्री पुरस्कार,

मुंबई.- प्रतिनिधी

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड झाल्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिताना त्याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
काय करावे, कुठे जावे आणि कसे राहावे, हे समजत नसताना आपण आपली रात्र रडत घालवली, असे पुनियाने आपल्या पत्रात म्हटले आहे. ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पद्मश्री पुरस्कार परत करण्याबाबत माहिती दिली. त्याने पंतप्रधान मोदींना उद्देशून एक पत्र देखील पोस्ट केले, ज्यामध्ये त्याने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीने निवडणूक जिंकल्यामुळे आपण दुखावलो गेल्याची भावना व्यक्त केली आहे.

तळीरामांसाठी झिंगाट निर्णय. रातभर बसा अन् सकाळी.
दारुची दुकानं आणि बार इतक्या वाजेपर्यंत सुरु राहणार.

ख्रिसमस डे साजरा केला जातोय. काही कार्यालयांमध्ये सिक्रेट सान्टा हा गंमतीशीर खेळ ख्रिसमसच्या आधीच खेळला जात आहे. कारण ख्रिसमसच्या दिवशी आणि या सणाच्या सुट्टीच्या निमित्ताने अनेकजण फिरायला जाणार आहेत.त्यामुळे आताच सणाचा उत्साह सर्वत्र पसरलेला आहे. असं असताना राज्य सरकारने मद्यप्रेमींना खूश करणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला मद्यप्रेमींना खूश ठेवण्यासाठी, तसेच ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट दिली आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने मुभा दिली आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1) (C) आणि कलम 143) (2) (H) (4) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आदेशानुसार, विदेशी मद्य विकणारं किरकोळ विक्रीचं दुकान, उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल -2 अनुज्ञप्ती, तसेच एफएळडब्ल्यू-2 प्रकारच्या दारुच्या विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत दारु विक्रीस मान्यता दिली आहे.

बीअर बार आणि क्लबसाठी पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा

बीअर बारला रात्री 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. विशेष म्हणजे क्लबला देखील रात्री मुभा असेल. क्लबसाठी पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

दारुच्या ‘या’ दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मुभा

विदेशी मध्य विकणाऱ्या किरकोळ विक्रीच्या दुकानास रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान खुलं ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर उच्च दर्जाची किंवा अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळाळेल्या दारुच्या दुकानांना रात्री साडे अकरा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान खुलं ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एफएलडब्ल्यू-2 प्रकारच्या मद्यविक्रेत्यांसाठी रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

‘या’ दुकांनाना पहाटे 5 वाजेपर्यंत सूट

एफएलबीआर-2 प्रकारच्या मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा असणार आहे. तर एफएल-3 (परवाना कक्ष)च्या मदिरायलायांना पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत दारुच्या दुकानांना मुभा असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.