पाटबंधारे खात्याच्या अन्यायी पाणीपट्टी वाढ विरोधात सोमवारी तालुक्यातील मोटार पंप धारक शेतकऱ्यांचा रवळनाथ मंदिर आजरा येथे मेळावा..
आजरा.- प्रतिनिधी.
पाटबंधारे खात्याने सर्व मोटरपंप धारकांना जलमापकयंत्र (वॉटर मीटर) बसविण्याच्या केलेल्या सक्तीविरोधात निर्णय करण्यासाठी आणि जलमापक यंत्र न बसवल्यास दहा पट दंडाची पाणी पट्टी शेतकऱ्यांवर लादणाऱ्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजरा तहसील कार्यलयावर मोर्चा काढला होता यावेळी तालुक्यातील सर्व मोटारपंप धारकांचा व्यापक मेळावा घेऊन लढ्याची पुढील दिशा व इरिगेशन फेडरेशन बनविण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तहसीलदार यांचे कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बाजूने सकारत्मक अहवाल पाठविण्याचा निर्णय झाला होता.
याबाबत या मेळाव्यात निर्णय करून फेडरेशन स्थापन करण्यासाठी सोमवार दि २५ डिसेंबर रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता रवळनाथ मंदिर, आजरा येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला तालुक्यातील सर्व मोटरपम्प धारक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉ संपत देसाई, अल्बर्ट डिसोझा, तानाजी देसाई, जोतिबा चाळके, संजय तरडेकर, संभाजीराव सावंत, बजरंग पाटील, आनंदराव कुंभार, उदय कोडक, प्रकाश मोरुस्कर, शंकर पाटील, दशरथ घुरे, नारायण भडांगे, यांनी केले आहे
