HomeUncategorizedगोवा बनावटीची दारू सापळा रचून केली जप्त- राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई....

गोवा बनावटीची दारू सापळा रचून केली जप्त- राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. ( 6 लाख 72 हजार 800 रूपयांच्या मुद्देमालासह शंकर महादेव मंडले या संशयीताला घेतले ताब्यात.)

गोवा बनावटीची दारू सापळा रचून केली जप्त- राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. ( 6 लाख 72 हजार 800 रूपयांच्या मुद्देमालासह शंकर महादेव मंडले या संशयीताला घेतले ताब्यात.)


बांदा – प्रतिनिधी.

गोव्याहुन सातारा – गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची मोठ्याप्रमाणात वहातूक होणार असल्याची पक्की खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याने बांदा येथे सापळा रचून 6 लाख 72 हजार 800 रूपयांच्या मुद्देमालासह शंकर महादेव मंडले या संशयीताला ताब्यात घेतले. गोव्याहुन सातार्याला गोवा बनावटीच्या चोरट्या वहातुकीची पक्की खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी,संचालक सुनिल चव्हाण, अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा येथे सापळा रचून वहानानची तपासणी करताना सफेद रंगाची एम. एच. 11 ए.डब्ल्यू.0302 मारूती सुझुकी आली.गाडी थाबवुन तपासणी केली असता गाडीच्या मागच्या सिटवर व डिकिमध्ये गोवा बनावटीची वेगवेगळ्या प्रकाराची चोरटी दारू सापडुन आली.चोरट्या दारूवर कारवाई करून 1 लाख 72 हजार 800 रुपये किमंतीची दारू, 5 लाख रूपये किमंतीची कार मिळुन 6 लाख 72 हजार 800 रूपयांच्या मुद्देमालासह शंकर महादे मंडले रा.कार्वे कराड जि. सातारा या संशयीतावर कारवाई करून ताब्यात घेतले.सदरची कारवाई निरिक्षक संजय मोहिते, दु. निरिक्षक तानाजी पाटील, दु. निरिक्षक प्रदिप रास्कर सहा. दु. निरिक्षक गोपाळ राणे, जवान दिपक वायदंडे, वाहन चालक रणजित शिंदे यांनी केली. अधीक तपास प्रदिप रास्कर करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.