HomeUncategorized५१ व्या आजरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पार्वती शंकर विद्यालय उत्तूरचा डंका प्राथमिक...

५१ व्या आजरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पार्वती शंकर विद्यालय उत्तूरचा डंका प्राथमिक मध्ये साईश आमनगी प्रथम तर माध्यमिक मध्ये आदित्य पाटील प्रथम.🛑आपलं व मातीचं तुटलेलं नातं जोडण्यासाठी सहयाद्री व किल्ल्यावर जायें लागेल.- दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके.👇

🛑५१ व्या आजरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पार्वती शंकर विद्यालय उत्तूरचा डंका प्राथमिक मध्ये साईश आमनगी प्रथम तर माध्यमिक मध्ये आदित्य पाटील प्रथम.
🛑आपलं व मातीचं तुटलेलं नातं जोडण्यासाठी सहयाद्री व किल्ल्यावर जायें लागेल.- दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके.👇

आजरा : – प्रतिनिधी.

आपलं व मातीचं तुटलेलं नातं जोडण्यासाठी सहयाद्री व किल्ल्यावर जायें लागेल. सह्याद्री समजून घेतल्याशिवाय शिवचरित्र समजणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी केले. ते आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या व्याख्यानमालेत सह्याद्री स्वराज्य आणि श्री शिवराय या विषयावर पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर होते. वाचनालयाचे संचालक वामन सामंत यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.. डॉ. अमोल आडके यांचा वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. बाचुळकर यांच्या हस्ते तर प्रायोजक जनता सहकारी गृहतारण संस्थेचे संचालक व आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादले यांचा शाल स्मृतीचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार उपाध्यक्षा गीता पोतदार यांच्या हस्ते करण्यात आला. अफजलखानाचा वध शाहिस्तेखानाची बोटे तोडली व शिवराज्याभिषेक म्हणजे शिवचरित्र आहे का? असा सवाल डॉ. आडके यांनी केला. सह्याद्री व शिवचरित्र देऊन जिवंत ठेवणारी माणसं आजही जिवंत आहेत. सह्याद्रीच्या दऱ्या खो-यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मावळ्यांच्या रुपात सापडलेली माणसं म्हणजे रत्ने आहेत. शिवचरित्र गंभीर नाही पण ते समजून घ्या. शिवचरित्र इतके मोठे आहे त्याला अन्य कोणात्या शब्दाची गरज नाही व ते शब्दात पकडता ही येत नाही इतके छत्रपती शिवाजी महाराज मोठे आहेत. त्यासाठी गडकोट सह्याद्री व किल्ले फिरले पाहिजेत. आपण सह्याद्री व गडकोट किल्ले फिरू शकलो नाही तर आपण करंटे आहोत असेही डॉ. अडके म्हणाले.
औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांचा आवाज घुमला. त्यामुळेच ते सह्याद्रीच्या शिखरांवरचे राजे आहेत. त्यांना शब्दात पकडता येत नाही इतके मोठे आहेत असेही डॉ. अमर अडके यांनी सांगितले. व्याख्यानमालीस मधुकर क्रमित जी.एम. पाटील संभाजी बापट प्रकाश देसाई डॉ. मारुती डेळेकर षडानन देशपांडे वाचनालयाचे कार्यवाह सदाशिव मोरे सहकार्यवाह विनायक आमणगी संचालक सुभाष विभुते विजय राजोपाध्ये रवींद्र हुक्केरी महंमदअली मुजावर विठोबा चव्हाण कुंडलिक नावलकर डॉ. अंजनी देशपांडे विद्या हरेर सुचेता गड्डी यासह नागरिक उपस्थित होते. फोटोकॅप्शन आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या व्याख्यानमालेत बोलताना दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी केले.

५१ व्या आजरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पार्वती शंकर विद्यालय उत्तूरचा डंका प्राथमिक मध्ये साईश आमनगी प्रथम तर माध्यमिक मध्ये आदित्य पाटील प्रथम.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती आजरा व बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे याच्या संयुक्त विद्यमाने १९ डिसेबर ते २१ डिसेबर या कालावधीत पार पडले या प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जनता एज्युकेशन सोसायटी चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अनिल देशपांडे होते तीन दिवसीय प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथ दिंडी ने कार्यक्रमाची सुरुवात झाली सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अर्जुन आबिटकर सो उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन अशोक चराटी होते यावेळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या समारंभाला गट विकास अधिकारी शरद मगरसो, दिनेश शेटे, आजरा अर्बन बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकर, शिक्षक बॅंक संचालक बोलके सर, विस्तार अधिकारी विलास पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला द्वितीय सत्रात मा प्राचार्य कल्याणराव पुजारी गडहिंग्लज यांचें व्याख्यान झाले तर विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली तिसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे.

प्राथमिक गट विद्यार्थी..- प्रथम- साईश योगेश आमनगी पार्वती शंकर विद्यालय उत्तूर
व्दितीय – वेदांग विद्याधर शिदें यशराज कुणाल पोतदार व्यंकटराव हायस्कूल आजरा
तृतीय -संस्कार किरण कांबळे रोझरी इंग्लिश स्कूल आजरा
प्राथमिक विभाग शिक्षक
प्रथम -सुनिल पांडूरंग कामत विद्यामंदिर वाटंगी
व्दितीय -दशरथ शामराव कांबळे विद्यामंदिर दाभिल
तृतीय -विठोबा लक्ष्मण शेवाळे विद्या मंदिर कोवाड
माध्यमिक विभाग विद्यार्थी.
प्रथम – आदित्य मारुती पाटील पार्वती शंकर विद्यालय उत्तूर
व्दितीय -वेंदात वसंत नरके व अभिजित लक्ष्मण सावंत पंडित दिनदयाळ आजरा
तृतीय -तुषार चंद्रकांत कांबळे व रुपेश राजेंद्र कांबळे आजरा महाविद्यालय आजरा.

माध्यमिक विभाग शिक्षक. – प्रथम – रोहिता विवेक सावंत आजरा हायस्कूल आजरा
व्दितीय -किरण केरु कांबळे आजरा हायस्कूल आजरा
तृतीय – सुनिल मारुती चव्हाण केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी
प्रयोग शाळा परिचर.
प्रथम – इम्रानखान आसदखान जामदार उत्तूर विद्यालय उत्तूर
व्दितीय – नरसिंह जोतिबा परीट राजाभाऊ केसरकर हायस्कूल निगुडगे

प्राथमिक विभाग प्रश्नमंजुषा.
प्रथम क्रमांक – कन्या विद्यामंदिर उत्तूर
व्दितीय क्रमांक व्यंकटराव हायस्कूल आजरा
तृतीय क्रमांक. आजरा हायस्कूल आजरा
माध्यमिक विभाग प्रश्नमंजुषा.

प्रथम क्रमांक पार्वती शंकर विद्यालय उत्तूर
व्दितीय क्रमांक आजरा हायस्कूल आजरा
तृतीय क्रमांक आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड
सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक के व्ही येसणे, अनिकेत चराटी, गवसेच्या सरपंच सौ रेखा पाटील, विस्तार अधिकारी विलास पाटील, पेरणोली सरपंच सौ प्रियांका जाधव, शिवाजी पाटील, मारुती मुगुटकर, आय. टी. आय.चे प्राचार्य दिग्विजय भूतल सर्व प्राथमिक माध्यमिक शाळाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे यांनी केले सुत्रसंचलन अनिल कांबळे यांनी तर आभार संतोष कालेकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.