HomeUncategorizedकारखाना निवडणुकीत मडिलगे केंद्रावरील बोगस मतदान करणाऱ्या आरोपींच्या गुन्ह्यात वाढ व्हावी.- चाळोबा...

कारखाना निवडणुकीत मडिलगे केंद्रावरील बोगस मतदान करणाऱ्या आरोपींच्या गुन्ह्यात वाढ व्हावी.- चाळोबा आघाडी उमेदवारांचे.- आजरा पोलीस स्टेशनला निवेदन.

कारखाना निवडणुकीत मडिलगे केंद्रावरील बोगस मतदान करणाऱ्या आरोपींच्या गुन्ह्यात वाढ व्हावी.- चाळोबा आघाडी उमेदवारांचे.- आजरा पोलीस स्टेशनला निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

कारखाना निवडणुकीत मडिलगे केंद्रावरील बोगस मतदान करणाऱ्या आरोपींच्या गुन्ह्यात वाढ व्हावी. याबाबत चाळोबा आघाडी उमेदवारांनी आजरा पोलीस स्टेशनला उमेदवार भिकाजी गुरव व इतर २० उमेदवार यांनी आजरा पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा कारखाना निवडणूकीत
मडीलगे येथे दि.१७/१२/२०२३ रोजी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. गवसे च्या पंचवार्षिक निवडणुकीत बनावट आधारकार्डचा वापर करून मतदान केलेल्या व आपल्याकडे गुन्हा नोंद असलेल्या आरोपींच्यावर भा.दा.वी.स. कलम ४६५, ४६३, ४६४, ४६७,४६८,, ४२०, ३४ अंतर्गत FIR मध्ये वाढ करणे बाबत. निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बनावट आधारकार्ड छापून त्याचा उपयोग मतदानासाठी करत असताना मडीलगे येथील बूथ क्र. १८ वर तीन जणांना पकडण्यात आले त्यावर आपले मार्फत कारवाई सुरू आहे. परंतू संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये बरेच बनावट आधार कार्डचा वापर करून बोगस मतदान झाले. बाबतची माहिती संबंधित आरोपींनी दिलेली असून आपण आपले मार्फत कारवाई केलेल्या तीनही आरोपींनी मतदान प्रतीनिधी व उपस्थित असलेल्या पोलिसांच्या तसेच इतर मतदारांच्या समोर जवळ जवळ ३५० ते ४०० बनावट आधारकार्ड तयार करून त्याचा उपयोग कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदानासाठी केले असलेचे सर्वासमक्ष कबुल केले आहे. त्यांचेकडे बनावट आधारकार्ड व त्यांची खरी आधारकार्ड सर्वांसमक्ष आपले कडे सुपूर्द केली आहेत. व मतदान करणेसाठी आम्हाला कोणी सांगितले त्या व्यक्तीचे नाव सांगून यांनी गाडी भाड्याने देवून व रोख पैसे देवून मतदान करणेसाठी आम्हाला मडीलगे व बाकीच्याना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून दिले आहे. अशी कबुली मतदान प्रतिनिधी, उपस्थित पोलिस व मतदारांच्या समोर दिली आहे. त्यामुळे आपले पोलिस स्टेशनकडे नोंद असलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीकडे बनावट आधारकार्ड कशी आली, ती कुठे तयार केली, त्यासाठी कोणती यंत्रणा वापरली, त्यामध्ये कोण कोण सहभागी होते. त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. सदरचा गुन्हा हा भविष्यात वेगवेगळे गुन्हे घडनेस कारणीभूत ठरणार असल्यामुळे सदर आरोपीच्यावरती भा.दा.वी.स. कलम मध्ये वाढ करणेत यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर. उमेदवार अशोक चराटी, उमेश आपटे, प्रकाश चव्हाण, अभिषेक शिंपी, विजय देसाई, राजेंद्र सावंत, दशरथ अमृते, सहदेव नेवगे, अंजना रेडेकर, सुधीरकुमार पाटील संजय पाटील सुनील शिंत्रे आनंदराव बुगडे सुरेश सावंत सुनीता रेडेकर, संगीता माडभगत, अशोक तर्डेकर, मल्लिकुमार बुरुड, जनार्दन टोपले व संभाजी पाटील यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.