प्रमुख मार्गासह ग्रामीण भागात बस फेऱ्या चालू कराव्या.- आजरा आगाराकडे.- जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी – जनहित पार्टी यांची निवेदनाने मागणी.
आजरा.-प्रतिनिधी.
आजरा कोल्हापूर, पेरणोली, कडगाव, गारगोटी, बिद्री मार्गे व आजरा पणजी, मडगाव चंदगड दोडामार्ग, म्हापसा पणजी वास्को एस.टी. सुरु करनेबाबत अखिल भारतीय जनहित पार्टीचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांच्या नेतृत्वाखाली आजरा आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की. आजरा हे तालुक्याचे ठिकाण असून गोवा- कोकणला जोडणारे मुख्य ठिकाण असून आजरा येथील बसस्थानका वरुण राज्यात अनेक ठिकाणी गाड्या सोडल्या जातात पण तालुक्यातून वरील दोन मार्गावर एकही गाडी सोडली जात नाही. आजरा ते कोल्हापूर जाताना मध्ये कर्नाटक लागते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महिला व जेष्ठ नागरिकांना दिलेली सवलत मध्ये लागणन्य कर्नाटक पट्ट्यात घेता येत नाही. तेथे तिकीट आकारणी केली जाते. तसेच आदमापुर येथे बाळूमामा दर्शनाला जाणारे भक्त किंवा करवीर राधानगरी येथे जाणारे प्रवासी प्रांत कार्यालयात कामासाठी जाणारे प्रवासी नागरिक यांना एकही गाडी नाही. गाडी बदलत त्यांना जावे लागते तरी या मार्गावर ज्यादाची एक गाडी सोडून प्रवाश्यांची व्यवस्था करावी गाडी सकाळी सोडून त्याच मार्गे परत यावी. तसेच गोवा येथे अनेक तरुण कामासाठी आजरा येथून गेले आहेत त्यांचे कायम गावी येणे जाने असते परंतु या मार्गावर एकही गाडी नाही यामुळे त्यांना गावी येणे जाणे अवघड होते तसेच येथील ख्रिश्चन समाज तसेच मराठा / वैश्य / ब्राम्हण यांचे नाते संबंधी या भागात आहेत. त्यांना जाणे येणे फार मोठ्या वळणाचे फेरे मारून करावे लागत आहे. तरी या मार्गावर ही गाडी सुरू करावी सकाळचे वेळी या मार्गावर गाडी सोडून ती परत सायंकाळी । रात्री येथे परत यावी. वरील मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी कोणतीही स्पर्धा (वडाप खाजगी वाहतूक) नाही. त्यामुळे यामार्गावर एस.टी. वाहतूक फायदेशीर होणार आहे तरी याचा विचार करून गाड्या सोडणेत याव्या. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अनिल केसरकर, प्रकाश काबळे, राहीम खेडेकर, शशिकांत वाजंत्री, शाहिद मुल्ला, श्रीधर कळेकर, शिवराज लोखंडे, आसिफ मुल्ला, सिकंदर अंकलिकर, उदय चव्हाण, शरद लोखंडे, रोहित कोरवी सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती
एकनाथ शिंदे, (मुख्यमंत्री व परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य.) हसन मुश्रीफ, (कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री ) प्रकाश आबिटकर, ( आमदार आजरा -भुदरगड) राजेश पाटील (आमदार आजरा चंदगड) जिल्हाधिकारी कोल्हापूर, तहसिलदार, आजरा, जिल्हा वाहतूक नियंत्रक कोल्हापूर यांना देण्यात आल्या आहेत.
