HomeUncategorizedमडिलगे मतदान केंद्रावर बोगस मतदान तीन तास गोंधळ.- आधार कार्ड तयार केलेले...

मडिलगे मतदान केंद्रावर बोगस मतदान तीन तास गोंधळ.- आधार कार्ड तयार केलेले यांच्यावर कारवाई व चौकशी व्हावी. व या गटातील फेर मतदान करण्याची चाळोबा आघाडीची पत्रकार परिषदेत व निवडणूक अधिकारी यांच्याकडे मागणी.

मडिलगे मतदान केंद्रावर बोगस मतदान तीन तास गोंधळ.- आधार कार्ड तयार केलेले यांच्यावर कारवाई व चौकशी व्हावी व या गटातील फेर मतदान करण्याची चाळोबा आघाडीची मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड गवसे पंचवार्षिक निवडणूक २०२३ या निवडणुकीचे मतदान दि १७ रोजी होते.
तालुक्यात सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान चालू असताना काही ठिकाणचा किरकोळ वाद वगळता मडिलगे तालुका आजरा येथे दुपारी तीन वाजता दरम्यान
हिरलगे ता. गडहिंग्लज येथील तीन- चार आपण मतदार असल्याचे सांगत मतदान केंद्रात दाखल झाले होते. याबाबतचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये आढळतील. दरम्यान पोलिंग एजंट संदीप पाटील यांनी एक मतदारास मतदान करण्यास दिले त्या व्यक्तीचे आधार कार्ड बोगस असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी सदर मतदान करण्याची संधी दिली असे श्री पाटील यांचे मत आहे परंतु अन्य तीन व्यक्ती मतदान केंद्राच्या खोली बाहेर हातामध्ये बोगस आधार कार्ड घेऊन असताना श्री पाटील यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. व माझी तक्रार घ्या हे बोगस मतदार बोगस आधार कार्ड घेऊन आले आहेत व त्यांच्या कारवाई करा असे सांगितले या प्रकारानंतर दिवसभर केंद्रात सायंकाळी मतदान संपेपर्यंत धुमसुम होती.
सायंकाळी मतदान वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावर श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार केंद्रामध्ये येऊन झालेल्या प्रकारची चौकशी करत त्यांनी आरोपींच्या वर कारवाई करावी अशी मागणी केली असता

केंद्रातील अधिकारी यांनी संबंधित मतदारांनी मतदान केले पण त्यांचे आधार कार्ड तपासण्याची आमच्याकडे मशीन नाही. यामुळे ते कार्ड बोगस असल्याचे आम्हाला समजले नाही. व ज्यांच्याकडे बोगस आधार कार्ड आहे त्यांनी मतदान न केल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही अशी उत्तरे दिली याबाबत संबंधित उमेदवारांनी आपली व्यथा मांडली असता मुख्य निवडणूक अधिकारी यांनी यावर आम्ही अभ्यास करून कारवाई करतो परंतु सद्यस्थितीला जे मतदार बोगस करण्यासाठी आले होते त्यांच्यावर कारवाई करण्याची हमी मुख्य कार्यकारी निवडनुक अधिकारी यांनी दिली. परंतु उमेदवार यांनी या विभागातील फेर मतदान घेण्याची मागणी केली होती. काल रात्री संबंधित आरोपी यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
याबाबत श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार यांनी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या घटनेचा निषेध करत लोकशाहीला काळीबा फासणारी, अवमान करणारी ही घटना असून जर आधार कार्ड बोगस करून असे प्रकार घडत असेल तर सहकारी संस्थेच्या निवडणुका घेऊ नये अंदाजे या निवडणुकीत दोन हजार मतदान भोगत झाली आहे व या मतदानाची ओळखपत्र ही आधार कार्ड कोणी तयार केली याचा मुख्य सूत्रधार कोण आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली या पत्रकार परिषदेत श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार भिकाजी गुरव उमेश आफटे प्रकाश चव्हाण तसेच आघाडी प्रमुख तसेच उमेदवारअशोक चराटी सुनील शिंत्रे मलिककुमार बुरुड अभिषेक शिंपी जनार्दन टोपले, संजय पाटील तसेच बिनविरोध उमेदवार संभाजी पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख युवराज पवार आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने केंद्रावर जमा झाले होते.
यावेळी सुनील शिंत्रे, अशोक चराटी, अभिषेक शिंपी, उमेश आफटे, भिकाजी गुरव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत झालेले घटनेचा निषेध केला व या विभागातील फेर मतदान व जोपर्यंत बोगस मतदान बाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत निवडणूक निकाल लांबीवर ठेवावा अशी मागणी केली.

श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार देसाई यांची प्रतिक्रिया

झालेल्या बोगस मतदान घटनेवर व चाळोबा आघाडीने घेतलेली पत्रकार परिषद व केलेल्या आरोपाबाबत विरोधी आघाडीचे उमेदवार दीपक देसाई यांना विचारणा केली असता त्यांनी बोगस आधार कार्ड घेऊन मतदान आलेल्या मतदारांचा आमचा कोणताही संबंध नाही. या केंद्रावर आमच्याच काही मतदारांचे बोगस मतदान करण्यात आले आहे. सदर मतदार केंद्रावर गेल्यानंतर त्यांचे मतदान झाले होते . तर काही मयत मतदारांचे मतदान देखील विरोधी आघाडीने खात्रीणीशी केले आहे .याबाबतची तक्रार आम्ही निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.