🛑संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांची – आजरा तहसील कार्यालयासमोर दि.२९ रोजी मोर्चाने – लाक्षणिक उपोषण. कॉम्रेड शिवाजी गुरव
🛑राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर- बांदा महामार्ग वरील दुरूस्ती बाबत.- आजरा शहर वासियांचे तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आजरा तहसील कार्यालयासमोर दि.२९ रोजी मोर्चाने येवून लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिनांक १२ रोजी आजरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी आम. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी आंदोलनाच्या दरम्यान महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप बैठक घेतली नाही. शिवाय खाजगी जमिनी संपादन करताना २०२३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे एन्.ए दराच्या रेडी रेकणरच्या पाचपट दराने दर निश्चित केल्याशिवाय कोणतेही महामार्गाचे काम करू नये अशी मागणी आहे त्यामुळे महामार्गाचे चालू काम बंद करण्यात यावे. तसेच दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील अधिवेशनावर महाराष्ट्रातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला त्यावेळी बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे व महसूल मंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर बैठकीमधून राज्य पातळीवर सर्व महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्यासाठी योग्य तो निर्णय होईलच तोपर्यंत भूसंपादनाची मनमानी पैशाची नोटीस काढण्यात येऊ नये. अशा प्रकारे योग्य दर न ठरवता काढलेल्या नोटिसा स्वीकारल्या जाणार नाहीत तसा ठराव शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. तहसील कार्यालयातील आमदारांसोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्तांतामध्ये काही मुद्दे आले नाहीत. त्याची दुरुस्ती करून इतिवृत्त तयार करून देण्याचे ठरले असताना सुद्धा महामार्गाचे अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ते इतिवृत्त चर्चेतील सर्व मुद्द्यासह देण्यात यावे. शेतकऱ्यांची रस्ता बांधकामासाठीची सर्व माहिती संघटनेला देण्यात यावी, तसेच रस्ता बांधणाऱ्या कंपनीसोबत सरकारने केलेल्या एम.ओ. यु कराराची प्रत संघटनेला देण्यात यावी रस्त्याच्या दुतर्फा बळजबरीने जमिनी घेऊन महामार्ग बनवला आहे. त्या शेतकऱ्यांना त्यांच्या रस्ता रुंदीकरणासाठी वापरलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा. सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या नावे असणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यात यावे जर अशा शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही तर बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वावर कंपनी यावेळी टोल वसुली करेल त्यामध्ये मिळणाऱ्या पैशातील वाटेकरी हे संकेश्वर बांधा महामार्ग लगत धारक शेतकरी राहतील ही जाहीर मागणी शेतकऱ्यांची आहे याची नोंद घ्यावी. खाजगी वाटाघाटीने जमिनी संपादन करता येतात याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. वरील सर्व मागण्यांच्या कडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि. २९ रोजी तहसील कार्यालय आजरा यांचे कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यासाठी मोर्चाने येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर कॉम्रेड शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, गणपती येसणे.
निवेदनाच्या प्रती १) मा. प्रांताधिकारी सो, आजरा- भुदरगड.२) मा. उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक दोन कोल्हापूर, ३) मा.पोलीस निरीक्षक सो, आजरा. यांना देण्यात आल्या आहेत.
🛑राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर- बांदा महामार्ग वरील दुरूस्ती बाबत.- आजरा शहर वासियांचे तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर- बांदा महामार्ग वरील दुरूस्ती बाबत.- आजरा शहर वासियांचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर चालू आहे. तरी या महिनाअखेर होणारा ख्रिसमस सण व वर्षाअखेर असल्याने या मार्गावरून गोव्याकडे होणारी वाहनांची वाहतूक त्याचबरोबर साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. याचा त्रास व होणारे अपघात हे आजरेकर वासियांना त्रासदायक आहेत. या समस्या लक्ष्यात घेऊन मडीलगे ते आजरा एम.आय.डी.सी पर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ती आपण तातडीने दुरुस्त करून घेण्याविषयी आपण संबंधीत विभागांना लवकरात लवकर सूचना द्याव्यात.
त्याचप्रमाणे साळगाव रस्ता पासून आजरा च्या दरम्यान उभी असणारी (पार्कीग) असणारी वाहाणे काढणे संदर्भात आपल्या स्तरावर योग्य ते नियोजन व्हावे म्हणजे होणारे अपघात व वाहतुकीची समस्या याचे निवारण होईल याबाबत सोमवार दि. १८/१२/२०२३ रोजी सकाळी ठीक ११.०० वा. तहसीलदार कार्यालय आजरा येथे निवेदन देण्यासाठी आजऱ्यातील बहुसंख्य नागरीक उपस्थितत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आजरा शहरवासीयांच्या सह्या आहेत.
