कारखाना कर्जमुक्त करणार हे सांगत नाहीत फक्त कारखाना आम्हीच चालवु शकतो.- अपप्रचार व सभासदांची दिशाभूल- समरजीत घाटगे (मडिलगेत श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार सभेला उस्फुर्त प्रतिसाद.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा सहकारी कारखाना कर्जमुक्त करणार हे सांगत नाहीत फक्त कारखाना आम्हीच राष्ट्रवादीत कारखाना चालवु शकते पण कसा चालणार याचे ध्येय धोरण व्हिजन त्यांच्याजवळ काहीच नाही. फक्त भुलथापा मारत आहेत. हि अपप्रचार व सभासदांची दिशाभूल असल्याची शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे मडिलगेत श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार सभेला अध्यक्ष स्थानावरून संबोधित करताना म्हणाले दि.१३ रोजी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच शिवाजी गुरव यांनी केले.
या सभेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
श्री घाटगे पुढे म्हणाले की. कारखान्यामध्ये ऊस वाढीसाठी प्रयत्न झाला पाहिजेत व यापेक्षा पुढे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस हा आपल्या कारखान्याला गेला पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर यामध्ये कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्याला घालण्यासाठी काही संचालक अधिक प्रयत्न करत असतात अशा संचालकांना तुम्ही निवडून देणार का.? निवडणुकीच्या प्रचारार्थ माध्यमांच्या बातम्या मी वाचत आलो माझ्या वाचनात असं काही वाचलं नाही जे राष्ट्रवादी कारखाना कर्जमुक्त करून चालवु शकते. त्यामुळे आपण फक्त कपबशी कुठे आहे. त्या ठिकाणीच मतदान करावं.

तर कुणीतरी याच व्यासपीठावरून “भाड्याने कारखाना भाड्याने चालवायला दिला असं वक्तव्य केलेले देखील वाचलं.” शिंपी साहेब आपण जर हा कारखाना त्यावेळी ब्रिज कंपनीला चालवला दिला असता तर हे वक्तव्य झालं नसतं. आपण रेणुका शुगर ला चालवायला देऊन कारखाना वाचवला व हा कारखाना वाचवताना आपले महाराष्ट्रातून कौतुक झाले. हे त्यांना सहन होणार नव्हतं यामुळे अशा टिकाकडे दुर्लक्ष करून आपण यापुढेही हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा याकडे लक्ष द्यावे.
सभासदांनी आपल्या बाजूने कौल दिल्यास मी स्वतः व जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते यांच्या मदतीने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून शब्द घेतला आहे. की कारखान्याला कमी व्याजदराची कर्ज घेऊन हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवणारच पण यासाठी सभासद आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे लागेल व कपबशी या चिन्हावर शिक्का मारून पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन श्री घाटगे यांनी केले.
उमेदवार अशोक चराटी म्हणाले प्रचार दरम्यान माझ्यावर या विभागातील उमेदवार आरोप करत आहेत कामगारांनी बाहेर काढलं कर्ज भागवले नाही, कारखाना अडचणीत ठेवून राजीनामा दिला या आरोपाचे उत्तर दिलं चराटी म्हणाले की कामगारांना पुढे करून मला घेरावा घालायला लावून माझ्याकडून राजीनामा मागितला गेला. यानंतरच मी राजीनामा दिला मी राजीनामा स्वतः दिला नाही. हे काही संचालकांचे शडयंत्र होते. सर्वांना माहिती आहे. व देशात साखरेचे उतरले यामुळे कर्ज वाढले व्याज वाढले बदनामी करायचं आहे. तुम्ही विरोधी आरोप करत आहेत पण हा कारखाना ही आघाडी केंद्राच्या भाजपच्या माध्यमातून चालू शकते सहकार मंत्री अमित शहाकडे राष्ट्रवादी लवकर जाईल की भाजप जाईल हे तुम्ही सांगावे आम्ही वरिष्ठ नेत्याकडून शब्द घेतला आहे. की हा कारखाना आम्ही चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आर्थिक मदत देऊ त्यामुळे फक्त राष्ट्रवादी हा कारखाना चालू शकत नाही आम्ही सक्षम आहोत ही हमी श्री .चराटी यांनी सभासदांना प्रचार सभेत दिली.
यावेळी जि. प. चे अध्यक्ष उमेश आफटे म्हणाले आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा आम्ही हा कारखाना कसा चालू शकतो सभासदांच्या हिताचे निर्णय कसे घेऊ शकतो ऊस क्षेत्र वाढून आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस हा आपल्या कारखान्याला कसा येईल याकडे लक्ष दिले पाहिजेत पण या प्रचार सभेत मी एक शब्द देतो तीन हजार मयत सभासद आहेत. त्या मयत सभासदांची वारस नोंद झालेली नाही. किंवा सभासदांनी केली नसावी तर त्या प्रत्येक सभासदाच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना त्यांचा हक्क देण्यासाठी आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे श्री आफटे बोलताना म्हणाले.
जि प चे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी म्हणाले आपण चेअरमन असताना हा कारखाना कोणत्या पद्धतीने व कसा चालला हे सर्व सभासदांना माहिती आहे. कोणी सांगण्याची गरज नाही ज्या माजी आमदाराला मी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला ते आमदार माझ्यावर भाड्याने कारखाना दिला अशी टीका करून गेले पण मी याबाबत टीका करणे हे माझ्यावर संस्कार नाहीत त्यामुळे हा कारखाना यापुढेही देखील कसा चालवता येईल यासाठीच माझा प्रयत्न असणार आहे त्यामुळे आपण कपबशी या चिन्हावर शिक्का मारून पॅलेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन श्री शिंपी यांनी केले.
भावेश्वरी संस्था समूहाचे प्रमुख व उमेदवार भिकाजी गुरव बोलताना विरोधकांनी राष्ट्रवादीची भीती आम्हाला घालू नये आम्ही देखील राष्ट्रवादीचे काम केले आहे. सर्वसामान्य माणसाला मोठे करण्याचे काम केले आहे. दुसऱ्या पक्षाची असेना पण दीपक देसाई यांना पंचायत समितीची उमेदवारी देऊन निवडून दिलं यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच केलं पण त्या माणसाला तिची जाण राहिलेली नाही. पण एखाद्या माणसाला राजकारणात संधी देण्याची काम केले. यापुढेही सामान्य माणसाला राजकारणात मोठे करण्याचे काम करणार आहे. मडीलगेतून श्री चाळोबा देव विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करावे असे आवाहन श्री गुरव यांनी केले.


यावेळी हनुमान संस्था समूहाचे प्रमुख के. व्ही. येसणे म्हणाले निवडणुका येत राहतील आरोप प्रत्यारोप होतील पण आपण कोणामुळे घडलो हा विसर पडत असेल तर त्याची आठवण सभासदांनी करून दिली पाहिजे. पण ही आघाडी वेगवेगळ्या पक्षाची लोक एकत्र आणून देवानेच घडवली आहे त्यामुळे खरोखरच केंद्र सरकारच्या माध्यमातून हा कारखाना फक्त ही आघाडी वाचू शकते यामध्ये चुकीचं काहीच नाही आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन श्री येसणे यांनी केले.
यावेळी लोकमान्य संस्था समूहाचे प्रमुख जनार्दन निऊगरे म्हणाले कारखाना वाचवण्यासाठी शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे व खास.धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून अशोकअण्णा चराटी व सर्व उमेदवार यांच्या मदतीने वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्याने केंद्रात जाऊ शकतात राष्ट्रवादी भविष्यात जाऊ शकत नाही मग भाजपच्या नेत्यांचे काम लवकर होईल की राष्ट्रवादीच्या हा फरक ओळखावा विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये व कपबशीचे नावाची का मारून आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावी असे आवाहन केले.
प्रचार सभेला रेडेकर समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर मडिलगेतील श्री हनुमान समूह, श्री भावेश्वरी समूह, श्री लोकमान्य समूह, महिला समूह, या सर्व समूहाचे प्रमुख , आघाडीचे सर्व उमेदवार तसेच भाजप, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक सभासद, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवार श्री प्रकाश चव्हाण यांनी आघाडीला कपबशी चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करत आभार मानले.
