HomeUncategorizedआधार अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली.- पुढच्या वर्षी 14 मार्च 2024 पर्यंत...

आधार अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली.- पुढच्या वर्षी 14 मार्च 2024 पर्यंत करू शकता मोफत अपडेट🟥पहिल्यांदाच आमदार ते थेट राजस्थानचे मुख्यमंत्री. – जाणून घ्या…🔴कोण आहेत भजनलाल शर्मा? -/ मराठा शब्द इतिहासातून मिटवण्याचे…👉आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक./शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळापत्रकात बदल.- 🟥अंतिम सुनावणी १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार👇

🛑आधार अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली.- पुढच्या वर्षी 14 मार्च 2024 पर्यंत करू शकता मोफत अपडेट
🟥पहिल्यांदाच आमदार ते थेट राजस्थानचे मुख्यमंत्री. – जाणून घ्या…🔴कोण आहेत भजनलाल शर्मा? -/ मराठा शब्द इतिहासातून मिटवण्याचे…👉आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक./
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळापत्रकात बदल.- 🟥अंतिम सुनावणी १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार👇

मुंबई:- प्रतिनिधी.

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे. आता, अंतिम सुनावणी १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
🅾️आज,दोन्ही गटांकडून उलट तपासणी साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज, 12 डिसेंबर रोजीच उलट तपासणी संपवण्याचे निर्देश दिले होते.आज,12 डिसेंबर रोजी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष नोंदवण्यात आली. आता, 13 डिसेंबरपासून ते तीन दिवस अर्थात 15 डिसेंबरपर्यंत लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरपासून सुरू होणार. अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत पूर्ण होणार आहे.
🟥उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. सातत्याने सकाळ आणि संध्याकाळी जवळपास दररोज सात तास सुनावणी घेऊन साक्ष पूर्ण झालेली आहे. आता पुढील कार्यवाही पूर्ण करून हे प्रकरण निकालासाठी बंद करण्याचे मी प्रस्तावित केले आहे. त्या अनुषंगाने सर्वांच्या सहकार्याने 20 तारखेपर्यंत हे कार्य पूर्ण करायचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
👉शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनीस प्रभू यांची उलट तपासणी शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी घेतली. त्यावेळी अँड. जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना व्हीपच्या मुद्यावर घेरले. प्रभू यांनी व्हीप जारीच केला नाही हे ठरवण्याच्या अनुषंगाने प्रश्न केले. जेठमलानी यांच्या प्रश्नांवर प्रभू यांनीदेखील जोरदार पलटवार केला. अॅड. जेठमलानी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विधीमंडळ कार्यालयीन सचिव विजय जोशी यांचीदेखील साक्ष नोंदवली. तर, ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी केली. अॅड. कामत यांच्या उलट तपासणीत शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीप मिळाला नसल्याचे म्हटले होते.

🛑’मराठा शब्द इतिहासातून मिटवण्याचे…👉आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक.
🟥भाजप आमदार नितेश राणे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला केला विरोध

नागपूर:-प्रतिनिधी.

मराठा आरक्षणावरून राज्यातलं राजकारण तापलं असतानाच याचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. भाजप आमदार नितेश राणे यांनी आमचा सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध आहे, अशी भूमिका मांडली.नितेश राणे यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध दर्शवला, तसंच मराठा शब्द इतिहासातून मिटवून टाकायचा प्रयत्न सुरू आहे का? असा संतप्त सवालही नितेश राणे यांनी विचारला. जरांगे पाटील आग्रही असतील तर त्यांची समजूत काढता येऊ शकते, असंही नितेश राणे म्हणाले, तसंच भुजबळ साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही ओबीसी विरोधात नाही, असं नितेश राणे विधानसभेत बोलले.

🛑महाविकासआघाडीवर टीका

दरम्यान नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून महाविकासआघाडी सरकारवरही निशाणा साधला. ‘सरकार असताना कोर्टात तारीख असायची तेव्हा यांचे वकील काय बोलायचे, आमची तयारी नाही. न्यायाधीशांनी यांच्या सरकारवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली, जरांगे पाटील यांना कोपर्डी प्रकरणात आम्ही स्वत: मदत केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची बिलकुल मानसिकता नव्हती. प्रामाणिकपणे कशी वसुली केली जात होती, त्याच प्रामाणिकपणे जर मराठा समाजासाठी काम केलं, असतं तर ही वेळ आली नसती,’ अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

🅾️जरांगेंवरही निशाणा.

मराठा समाजासाठी आम्ही सर्व जणांनी प्रयत्न केले आहेत. आम्ही सर्व राज्यभर सभा घेतल्या आहेत. आमच्या मराठा समाजालाही माहिती आहे, कोण प्रामाणिक आहे, मात्र आता जे सुरू आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र जी आणि गृहखात्यावर बोट कशी उचलता, घरं कशी फोडली गेली, घरं कशी जाळली गेली? एकाच व्यक्तीची संघर्ष यात्रा सुरू आहे, आमच्या एकाच व्यक्तीवर कशी टीका होते?’ असं म्हणत नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

🛑आधार अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली.- 🛑पुढच्या वर्षी 14 मार्च 2024 पर्यंत करू शकता मोफत अपडेट

🅾️ज्यांना आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे.मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर रोजी संपत होती. ती आता 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

🔴आधार प्राधिकरण UIDAI ने अधिकृत अपडेटमध्ये मुदत वाढवण्याची माहिती दिली. प्राधिकरणाने सांगितले की, नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता आधार अपडेटची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत कोणतेही शुल्क न भरता My Aadhaar पोर्टलद्वारे आधार अपडेट केले जाऊ शकतात. प्राधिकरणाने सांगितले की 15 डिसेंबर 2023 पासून पुढील 3 महिन्यांसाठी म्हणजे 14 मार्च 2024 पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🟥ऑफलाईन अपडेटसाठी इतके शुल्क आकारले जाते

माय आधार पोर्टलवर आधार तपशील अपडेट करण्याची मोफत सुविधा उपलब्ध होती. जर एखाद्या वापरकर्त्याने ऑनलाीन ऐवजी आधार केंद्रावर जाऊन आधार ऑफलाईन अपडेट केला तर त्याला 25 रुपये शुल्क भरावे लागेल. आता मुदत वाढवून दिल्यावरही तीच व्यवस्था कायम राहणार आहे. म्हणजेच मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइन बाबतीतच उपलब्ध होईल.

🔴या प्रकरणांमध्ये आधार अपडेट करणे आवश्यक आहे

यासाठी वापरकर्त्याला myAadhaar पोर्टल म्हणजेच https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. अनेक प्रकरणांमध्ये आधार तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा पत्ता बदलला असेल तर तो अपडेट केला पाहिजे. आधार प्राधिकरण त्या वापरकर्त्यांना त्यांचे आधार अपडेट करण्यास सांगत आहे, ज्यांच्यासाठी युनिक आयडेंटिटी तयार होऊन 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

🔴आधार ऑनलाइन अपडेट करण्याची प्रक्रिया:-

🟥आधार पोर्टलला भेट द्या.

🔺लॉग इन केल्यानंतर, नाव/लिंग/जन्म तारीख आणि पत्ता अपडेट वर क्लिक करा.

🔺कोणताही पत्ता/नाव/लिंग अद्यतनित करणे आवश्यक आहे, ते निवडा आणि पुढे जा.

🔺अद्ययावत पुराव्याची प्रत अपलोड करा.

🛑अद्याप कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत.14 मार्चनंतर 25 रुपये भरावे लागतील.

🔺पेमेंट पर्याय पूर्ण होताच, एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला संदर्भ क्रमांक मिळेल.

🟥पहिल्यांदाच आमदार ते थेट राजस्थानचे मुख्यमंत्री. – जाणून घ्या…🔴कोण आहेत भजनलाल शर्मा?

राजस्थान:-वृत्तसंस्था

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या नावांची घोषणा होताच राजस्थानमधील निवडणूक निकालापासून सुरू असलेली राजकीय सस्पेंस संपुष्टात आली आहे.सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे भजनलाल शर्मा यांच्या नावाची कुठेही चर्चा झाली नाही. अनेक मोठी नावे शर्यतीत गणली जात होती मात्र भाजपने भजनलाल शर्मा यांच्या नावाची राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी घोषणा केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. याआधी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने नवीन नावं देऊन सर्वांनाच चकित केलं. राजस्थानमध्येही असाच प्रकार घडला.

🔴राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा असतील. 56 वर्षीय भजनलाल शर्मा पहिल्यांदाच सांगानेरमधून निवडणूक जिंकून आमदार झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी झालेल्या फोटो सेशनमध्ये ते चौथ्या रांगेत बसले होते. काही वेळाने भाजपने राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी त्यांच्या नावाची घोषणा केली.माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांची एकमताने निवड झाली. भजनलाल शर्मा ब्राह्मण समाजातील आहे. ज्यांची राजस्थानमध्ये 7 टक्के लोकसंख्या आहे. मोठ्या कालखंडानंतर राजस्थानला ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला आहे.

🟥भजनलाल शर्मा हे संघाच्या जवळचे..

भजनलाल शर्मा हे सामान्य वर्गातील आहेत. ते पदव्युत्तर आहेत. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप या दोघांच्याही जवळचे मानले जातात. ते दीर्घकाळ संघाशी निगडीत असून त्यांचे संघाशी अतूट नाते आहे. पक्षावरही त्यांची चांगली पकड आहे. भजनलाल शर्मा राजस्थान भाजपचे चार वेळा महामंत्री राहिले असून ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांना अमित शहा तसेच जेपी नड्डा यांचे निकटवर्तीय मानले जाते.

🅾️भरतपूरचे रहिवासी…

56 वर्षीय भजन लाल शर्मा मूळचे भरतपूरचे निवासी आहेत. मात्र ते जयपूर येथील जवाहर सर्किलवर राहतात. त्यामुळे ते बाहेरचे असल्याचा आरोप केला जात होता. मात्र त्यांनी सांगानेर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. पक्षाने त्यांना प्रथमच जयपूर जिल्ह्यातील संगनेर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. जिथून ते जिंकून आमदार झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपने विद्यमान आमदार अशोक लौहाटी यांचे तिकीट रद्द करून 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भजनलाल शर्मा यांना तिकीट दिले होते.

10 वर्षापासून प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत

भजनलाल शर्मा हे 10 वर्षांपासून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. यापूर्वी ते मंडळाचे अध्यक्षही होते.

गेल्या निवडणुकीत पक्षाने दिले नव्हते तिकीट…

2003 मध्ये त्यांनी भरतपूरच्या नबाई मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना सहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2018 मध्ये शर्मा यांनी भाजपकडून तिकीट मागितले होते, परंतु पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.