🛑होनेवाडी ( ता.आजरा) ग्रामपंचायत सदस्य सौ.वर्षा चव्हाण यांचा मनसेत प्रवेश.
🛑मनसे जनहित पदाधिकारी नियुक्ती जाहीर.
🛑गडहिंग्लज विभागातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.- समरजितसिंह घाटगे.
(🛑 कडगावमध्ये पावणे दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ.👇)
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

कागल विधानसभा मतदारसंघात सर्वसमावेशक विकासकामांसाठी निधी व शासनाच्या योजना गट-तट न पाहता राबवित आहोत.गडहिंग्लज विभागातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
कडगाव ( ता.गडहिंग्लज ) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. घाटगे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ज्योतिबा देवालायजवळील ओढ्यावरील व कुर्लेकर वसाहती जवळील जुना गारगोटी रस्त्यावरील पूल अशा दीड कोटी रुपयांच्या दोन पुलांचा, श्री.रेणुका मंदिर परिसर काँक्रिटीकरण व अंगणवाडी दुरुस्ती अशा पावणे दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ केला.
अध्यक्षस्थानी माजी सरपंच रावसाहेब पाटील-कुर्लेकर होते. श्री.
घाटगे पुढे म्हणाले,गडहिंग्लज-उत्तूर आजरा उपविभागावर विकासकामांसाठी निधी देताना विद्यमान लोकप्रतिनिधींनी अन्याय केल्याची भावना कार्यकर्ते सातत्याने व्यक्त करतात.विकासकामांचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण कागल विभागापेक्षाही या विभागासाठी जादा निधी उपलब्ध करून दिला आहे.हा निधी देताना प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक शाळा,अंगणवाडी,रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी योजना यांना प्राधान्य दिले आहे.यापुढेही आणखी निधी उपलब्ध करून देऊ.
पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील म्हणाले, भाजपच्या माध्यमातून समरजितसिंह घाटगे यांनी गतवर्षी पिण्याच्या पाण्यासाठीची साडेआठ कोटी रुपयांची योजना मंजूर केली, तर आता पावणेदोन कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला आहे. कोणतेही संविधानिक पद नसताना सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या समरजितसिंह घाटगेंना आमदार म्हणून निवडून देऊया.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे,तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपिठावर संजय बटकडली, अनंत कुलकर्णी, संग्रामसिंह घाटगे, करंबळीचे सरपंच अनुप पाटील आदी उपस्थित होते. स्वागत अजित जामदार यांनी केले.शहाजी पाटील यांनी आभार मानले.
चौकट.
परिवर्तन अटळ…!
समरजितसिंह घाटगे यांचा गट-तट न पाहता सर्वसमावेशक कामाचा धडाका पाहता विधानसभेच्या निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.या परिवर्तनात कागलकरांच्या पुढे आजरा-गडहिंग्लजकर असतील.असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी व्यक्त केला.
होनेवाडी ( ता.आजरा) ग्रामपंचायत सदस्य सौ.वर्षा चव्हाण यांचा मनसे प्रवेश.
आजरा..- प्रतिनिधी.

होनेवाडी ता. आजरा येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. वर्षा चव्हाण यांनी मनसेप्रमुख, हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महिला कार्यकर्त्यांसह मनसे जनहित जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. सौ. चव्हाण यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत त्यांची मनसे प्रदेश सरचिटणीस व जनहित अध्यक्ष किशोर शिंदे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख जयराज लांडगे आणि कोल्हापूर जनहित जिल्हाध्यक्ष.परशुराम बामणे यांनी मनसे जनहितच्या आजरा तालुका संघटक पदी निवड केली.
त्यांच्या आजच्या या निवडीने महिला कार्यकर्त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच सर्वांनी निवडीबाबत समाधान व्यक्त केले.
मनसे जनहित पदाधिकारी नियुक्ती जाहीर.
आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,मनसे प्रदेश सरचिटणीस व जनहित अध्यक्ष किशोर शिंदे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जनहित कक्ष पदाधिकारी नियुक्ती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी) यांनी आज जाहीर केली.
सौ.पूनम संजय भादवणकर-परुळेकर.
कोल्हापूर जिल्हा संघटक (ग्रामीण) .रिक्सन डिसोझा.
आजरा तालुका अध्यक्ष, .प्रशांत सुरेश गजरे (साजन्नवार)
आजरा शहर अध्यक्ष. सौ.शोभा युवराज कांबळे.
आजरा शहर संघटक, .सागर कांबळे.आजरा तालुका उपाध्यक्ष, सौ.वर्षा चव्हाण.आजरा तालुका संघटक, सौ.वर्षा जोतिबा पाटील.
आजरा तालुका उपसंघटक, सौ.दिक्षा सूर्यकांत भादवणकर.
बुरुडे शाखा संघटक, सौ.दीपाली दिगंबर सामंत.
चंदगड तालुका संघटक अशा निवडी करण्यात आल्या आहेत

