आजरा साखर निवडणूक रणधुमाळी. 🛑कारखाना चालवण्याची धमक फक्त राष्ट्रवादीत आहे.- मोठे व खोटे बोलणाऱ्यांनी ही निवडणूक लादली – मंत्री मुश्रीफ.
【 🛑जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा उत्तुर जि.प. मध्ये कारखाना प्राचाराचा झंझावात..】
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक या निवडणुकीच्या अनुषंगाने श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विषेश सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दि. ९ रोजी उत्तूर विभागात दौरा आयोजित करण्यात आला होता. दि ९ रोजी दिवसभरात भादवणवाडी, जाधेवाडी, खोराटवाडी, मासेवाडी, सोहाळे, पेंढारवाडी, आर्दाळ, हालेवाडी, वडकशिवाले, मडिलगे, भादवण या गावात मतदाराच्या गाढीभेटी व प्रचार सभा झाल्या यावेळी मडिलगे येथील जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत व प्रस्तावित सरपंच बापू निऊगरे यांनी केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ म्हणाले. हा कारखाना चालवण्याची धमक फक्त राष्ट्रवादीत आहे. मोठे व खोटे बोलणाऱ्यांनी ही निवडणूक लागली व अशोक चराटी चेअरमन असताना साडेतीन कोटीचे कर्ज थकले व खाते एन पी मध्ये गेले त्यावेळी साडेतीन कोटी भरा म्हणून सांगितले असता आमचे मानले नाही व कारखाना बंद पडला व नंतर ८० कोटी भरल्यानंतर शंभर कोटी रुपये मंजूर झाले. यानंतर कारखान्याचे मूल्यांकन ११० कोटी व कारखाना व कर्ज १३५ ही निवडणूक न परवडणारे असताना माझ्या संचालनाची डोकी कसा होईल हा विचार झाला व ही मंडळी चेअरमन पदासाठी एकत्र आले आहेत. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी करा मी हा कारखाना चालवून दाखवतो. असे श्री नाम. मुश्रिफ म्हणाले.

माजी आमदार के पी पाटील म्हणाले बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन खासदार आमदार माझ्या विरोधात असताना देखील मतदारांनी योग्य तो कौल दिला. माझं देखील विमान चिन्ह होतं त्यामुळे तुमच्या विरोधात कोण आहे. हे न पाहता विमान चिन्ह आहे. हे लक्षात ठेवा. मागील वेळी एका भाड्याने हा कारखाना भाड्याने दिला. व यानंतर कारखाना बंद पाडण्याचे पाप अशी यांनी केले कामगारांनी अंगावर जाऊन ढकलून दिले तरी अजून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे अण्णा – भाऊंचा या कारखान्यात काही संबंध नाही. ही दौलत बळकवण्याचे काम दोन नंबर धंदे करणारे हे काम करत आहेत. अशी जोरदार टीका माजी आमदार पाटील यांनी केली.

यावेळी केडीसी संचालक सुधीर देसाई म्हणाले कारखाना अडचणीत आहे म्हणून आम्ही बिनविरोध करण्याची घोषणा केली यापूर्वीच सुनील शिंत्रे विरोधी आघाडीला मिळाले होते. तर चराटी यांनी हमारे पास बहुत पैसा है असे म्हणतात कारखाना बंद पडला. असे कर्तृत्व असताना आम्ही बिनविरोध करत असताना अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत. व कारखाना आर्थिक अडचणीत सोडून पळ काढत आहेत. अशी टीका केली त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्याने ही निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका श्री रवळनाथ विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले.
चराटी गटातील माजी संचालक दिगंबर देसाई यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. यामुळे त्यांचा अर्ज राहिला व अपक्ष उमेदवारी झाली. परंतु त्यांनी जाहीर माघार व जाहीर पाठिंबा दिला. यावेळी श्री. रवळनाथ आघाडीला दिला. यावेळी श्री देसाई बोलताना म्हणाले. अशोक चराटी यांच्यासोबत दोन वेळा संचालक झालो. ज्या जयवंत शिंपींचा मी दोन वेळा पराभव केला. त्या शिंपी यांच्या मुलग्यासाठी माझी उमेदवारी नाकारली. यामुळे माझा जाहीर पाठिंबा या आघाडीला असल्याचे जाहीर केले.
यावेळी उमेदवार वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, दीपक देसाई यांनी मनोगत व्यक्त करत मतदारांना पूर्ण आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी संभाजी तांबेकर यांनी निवडणूक कोणामुळे लागली व हा कारखाना कोण कर्जमुक्त करून चांगल्या पद्धतीने चालू शकतो. तर पाणी प्रकल्पामुळे ऊस उत्पादन वाढले आहे हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास मंत्री हसन मुश्रीफ यांचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही आजरा साखर कारखाना फक्त राष्ट्रवादी व हसन मुश्रीफ चालवु शकतात त्यामुळे खोट्या आश्वासनांना अफवांना बळी पडू नये व विमान चिन्हावर शिक्का मारून आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन श्री तांबेकर केले.


यावेळी विष्णुपंत केसरकर यांनी अशोक चराटी यांच्यावर जोरदार टीका करत कारखान्याचे खरे वाटोळे हे चराटी यांनी लावली आहे. दुसऱ्याला नाव ठेवणार आणि स्वतःच कर्तृत्व असावे ज्या कामगारांनी लाथा बुक्क्यांनी मारून कारखान्यातून बाहेर काढलं गाडी काढून घेतली. याची थोडी देखील लाज नाही यांनी व सुनील शिंत्रे यांनी गाडी किती किलोमीटर फिरवली याचा अभ्यास करावा चराठी यांनी आजरा नगरपंचायत साठी गाडी जास्त फिरवली तर सुनील शिंत्रे यांनी कारखान्याची गाडी मी वापरणार नाही म्हणत किती किलोमीटर फिरवली ते तपासावे यांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये असे श्री केसरकर म्हणाले.
यावेळी मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत कवळेकर, सुनील देसाई उमेदवार रचना होलम, राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
