आजरा शहरात नवीन परमिट परवानगी बंद करणे बाबत.- प्रादेशिक परिवहन कोल्हापूर. यांना आजरा तालुका रिक्षा मित्र मंडळचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहरात नवीन परमिट परवानगी बंद केले.बाबत रिक्षा मित्र मंडळ आजरा तालुका यांनी प्रादेशिक परिवहन कोल्हापूर यांना निवेदन दिले आहेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आजरा तालुका हा ग्रामीण भाग व शेतीप्रधान मागसलेला असून रिक्षा ने प्रवास करणारे प्रवासी खूपच कमी आहेत. तेंव्हा आजरा तालुक्यासाठी पन्नास परमीट असून ते पूर्ण झाले आहेत. तेव्हा पन्नास परमीट चालकाचे उदरनिर्वाह व बँकेचे कर्ज भागवणे कठीण झाले आहे. नवीन परमीट प्रमाणापेक्षा जास्त दिलेस सर्वांचा उदरनिर्वाह व बँकेचे कर्ज फेडणे गंभीर व कठीण आहे. तरी नवीन परमीट आजरा तालुक्यासाठी देणे बंद करणेत यावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर धनाजी ईलगे, महेश यादव, अजित नाईक, नासीर मुल्ला, तनवीर मकानदार यांच्या सह्या आहेत
या मागणीचे महत्त्वाचे मुद्दे
घरोघरी मोटरसायकल फोर व्हिलर असल्याने रिक्षा ने प्रवास करणारे खपच कमी आहेत
शासनाने स्क्रॅप आर्डर काढल्याने जुनी रिक्षा स्क्रॅप करून नवीन रिक्षा काढणे भाग पडले आहे कर्ज करून रिक्षा तर आनल्या परंतु नवीन परमीट चालू असल्याने रिक्षा वाढत चालल्या आहेत रिक्षा चे कर्ज फेडायचे कि घर खर्च चालवायचे हा मोठा प्रश्न आहे
पन्नास रिक्षा व्यवसायकाचे सह्या सह पत्र पाठवले आहे.
