HomeUncategorizedआजरा साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून कोणतीही अडवणूक होणार नाही.- आमदार सतेज पाटील...

आजरा साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून कोणतीही अडवणूक होणार नाही.- आमदार सतेज पाटील ( पत्रकार परिषदेत दिली माहिती. )

आजरा साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून कोणतीही अडवणूक होणार नाही.- आमदार सतेज पाटील ( पत्रकार परिषदेत दिली माहिती. )

आजरा.- प्रतिनिधी..

आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. एका गटाच्या माघारीचा निर्णय झाला नाही. त्यामुळे निवडणूक लागली पण आजरा कारखान्याची तिसऱ्या निवडणुकीत आमचा सहभाग असून कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी व कारखाना चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी जिल्हा बँकेकडून कोणतीही अडवणूक होणार नाही. व यासाठी कोणती अडचण येणार नाही. अशी माहिती आजरा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मंत्री व आमदार सतेज पाटील बोलताना म्हणाले राजकारणातील समीकरणे वेगवेगळे असतात व बदलता देखील परंतु कारखाना वाचवण्यासाठी बिनविरोध साठी आमदार विनय कोरे ( सावकार ) व मी प्रयत्न केले होते. यापुढे कारखाना चांगल्या पद्धतीने चालून व्याजाचा बोजा कमी होत नाही तोपर्यंत कारखाना कर्जातून बाहेर पडणार नाही. त्यासाठी कर्जाचाच बोजा कमी करत आणल्यास निश्चितपणे कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो यासाठी राज्याची व केंद्राची मदत घेऊन प्रयत्न केले जातील असे बोलताना आमदार श्री पाटील म्हणाले.
यावेळी जि .प. चे माजी उपाध्यक्ष, जयवंतराव शिंपी,
चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार सुनील शिंत्रे, अशोक चराटी, उमेश आपटे, श्रीमती अंजनाताई रेडेकर, सो.सुनिता रेडेकर, सौ. संगीता माडभगत, दशरथ अमृते, मलिककुमार बुरुड, अभिषेक शिंपी जनार्धन टोपले, सर्व उमेदवार तसेच विलास नाईक, विजयकुमार पाटील, युवराज पोवार सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.