आजरा नगरपंचायतच्या नव्या सभागृहात नूतन लोकप्रतिनिधींनीच्या ठरावानंतर मिळकतधारकांच्या करवाढीसंदर्भात निर्णय घेण्याचे कृती समिती सदस्य व नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय. – कृती समिती
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायतने जुन्या कराप्रमाणे आकारणी करून आजरा नगरपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकी नुतन लोकप्रतिनिधीच्या सभागृहातील ठरावनंतर मिळकतधारकांच्या करवाढीसंदर्भात निर्णय घेण्याचे कृती समिती सदस्य व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले. त्यामुळे आजरावासीयांना दिलासा मिळाला आहे. नगरपंचायत अन्यायी करवाढ कृती समिती सदस्यांशी आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुर्वे, करनिर्धारण अधिकारी नायकवडी, प्रशासनाधिकारी चौगुले यांच्याशी कराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी अॅड. शैलेश देशपांडे आणि सर्व सदस्यांनी कर आकारणीमधील विविध त्रुटी आणि चुकीची आकारणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सध्या जुन्या पद्धतीनुसार कर आकारणी करून नवीन नगरपंचायत अस्तित्वात
येईपर्यंत कोणतीही करवाढ केली जाऊ नये, यावर सर्वांचे एकमत झाले. त्यासंदर्भात शासनाकडे तशी विनंती करण्याचे नगरपंचायत प्रशासनाने मान्य केले आहे. यावेळी कर आकारणी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने प्रक्रियेची पुन्हा पडताळणी करावी. भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणीऐवजी कर मूल्यावर आधारित कर आकारणी योग्य होईल का, याची पडताळणी करावी.
आजरा येथे नगरपंचायतीत करवाढीसंदर्भात चर्चा करताना कृती समिती सदस्य व अधिकारी यांनी आकारलेले सर्व उपकर रद्द करावेत. ग्रामपंचायत कालावधीतील बांधकामांवर कोणत्याही प्रकारची सक्ती आकारण्यात येऊ नये.
आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी कृती समिती अध्यक्ष परशुराम बामणे, प्रा. सुधीर मुंज, दत्तराज देशपांडे, संदीप पारळे, अतुल पाटील, रवींद्र तळेवाडीकर, पांडुरंग सावरकर, दिनकर जाधव, अभिषेक रोडगी आदी उपस्थित होते.
【 आजरा नगरपंचायत च्या नव्या सभागृहात नूतन लोकप्रतिनिधींच्या ठरावानंतरच पुढील करवाढीच्या. संदर्भातील चर्चा व ठरावानंतर निर्णय व्हावा. श्री बामने.
नगरपंचायत मध्ये झालेल्या कृती समितीच्या बैठकीत ४०% पेक्षा अधिक कर आकारू नये व नव्या नगरपंचायत च्या सभागृहात लोकप्रतिनिधी यांच्याशी सभागृहात चर्चा होऊन मगच करवाढीचा निर्णय व्हावा. असा निर्णय कृती समितीच्या बैठकीत झाला होता. “परंतु नव्या सभागृहात करवढीचा निर्णय व्हावा”. अशी कोणतीही चर्चा व निर्णय झालेला नाही. हा आजरा नागरिकापर्यंत पोहोचलेला मेसेज हा चुकीचा असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी बोलताना सांगितले.】
