आजरा सहकारी साखर कारखाना निवडणूक रणधुमाळीला सुरुवात.
श्री. चाळोबा देव शेतकरी विकास आघाडी वतीने उत्तुर विभागातील उमेदवारांचा जोमकाई देवीला व भादवन येथील श्री मल्लिकार्जुन देवालयात नारळ ठेवून प्रचार शुभारंभ संपन्न. श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी वतीने आजऱ्यात श्री रवळनाथ मंदिर तर मडीलगेत भावेश्वरी देवीला नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ संपन्न.) ( प्रचाराच्या शुभारंभात अपक्ष उमेदवार शांताराम पाटील यांचाही प्रचार शुभारंभ संपन्न.)
आजरा.- प्रतिनिधी.
श्री. चाळोबा देव शेतकरी विकास आघाडी

आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणूक रणधुमाळी ला सुरुवात झाली असून दोन्ही आघाडीकडून प्रचाराचा नारळ ठेवून देवाचा आशीर्वाद घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उत्तुर विभागातील श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा दि.०५ रोजी जोमकाई देवी व भादवण येथील श्री रवळनाथ देवाला नारळ ठेवून प्रचार शुभारंभ करण्यात आला.

यावेळी चव्हाणवाडी येथील उमेदवार प्रकाश चव्हाण यांनी उपस्थित याचे स्वागत व प्रास्ताविक करत निवडणूक का लागली कोणी लावली व आता हा कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आपण हाती घेतलेले काम हे सभासदांनी सर्व करण्याच्या उमेदवारांना विजयी करून कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून कारखानाचा स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्यासाठी कपबशी या चिन्ह समोरील बटन दाबून विजयी करावे असे विनंती व आवाहन केले.
यावेळी जीपचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे माजी संचालक उमेश आपटे यांनी या कारखान्यात फक्त राजकारण चालले आहे फक्त मला आमच्या गटाला सर्व संचालक पदे पाहिजेत आमची सर्व डोकी संचालक म्हणून असावी अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे परंतु सभासदांनी कोणती डोकी कामाचे आहेत ही आपण तपासून सभासदांनी आमच्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी प्रा. सुनिल शिंत्रे.,अशोक चराटी, अंजनाताई रेडेकर, सुनिता रेडेकर, मलिककुमार बुरुड, विठ्ठल उत्तुरकर, भिकाजी गुरव, जनार्दन टोपले, अभिषेक शिंपी सौ माडभगत यांनी मनोगत व्यक्त केले तर भादवण येथील प्रचार शुभारंभ सभेत संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना कारखाना कोणत्या दिशेला चालला आहे अन्य प्रोजेक्ट होण्यासाठी केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने अशोक चराटी यांच्या माध्यमातून कारखान्याला चांगला निधी व येणाऱ्या काळात कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून मदत मिळू शकते. सुनील शिंत्रे चेअरमन असताना किंवा यापूर्वी काही संचालकांनी कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला व केडीसी बँकेला ७० कोटी भरल्यानंतर केडीसी बँकेच्या सहकार्यामुळे कारखाना पुन्हा चालू झाला. याबद्दल बँकेचे आभार पण हे ७० कोटी भरण्यासाठी कोणकोणत्या माजी संचालकांनी सहभाग घेतला व कर्ज मिळू नये म्हणून कोणी पैसे देऊ नये यासाठी कोणी प्रयत्न केला. हे तालुक्यातील सर्व सभासदांना माहिती आहे. त्यामुळे या आघाडीचे सर्व उमेदवार हे कारखाना चालवण्याच्या दृष्टीने व कर्जमुक्त करण्यासाठी पुढे आले आहेत त्यामुळे सर्वांना कपबशी चिन्हावर बटन दाबून विजय करावे असे आवाहन केले यावेळी अशोक चराटी म्हणाले केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे निवडणूक लढवण्यापूर्वी व पॅनल उभा करण्यापूर्वी आम्ही वरिष्ठ नेत्याकडून शब्द घेतला आहे की अन्य प्रोजेक्टसाठी मदत व कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी यापुढे सहकार्य करावे व त्या पद्धतीने दिलेल्या शब्द वरिष्ठ नेते पाळणार आहेत. परंतु यासाठी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करणे ही सभासदांची जबाबदारी आहे. आपण सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन चराटी यांनी केले. यावेळी श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या परस्परविरोधी आम्ही असणारे उमेदवार एकत्र येण्यामागचे कारण हा कारखाना वाचला पाहिजेत सभासद कामगार व कारखान्याच्या हितासाठी आम्ही एकत्र येण्याची भूमिका आमदार सतेज पाटील व सावकार आमदार विनय कोरे यांच्या आदेशाप्रमाणे व सहकार्याने या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत कारखाना वाजवायचा असेल तर अशोक चराटी यांच्या माध्यमातून केंद्रातून व राज्यातून भरघोस निधी आणता येईल व अन्य प्रोजेक्ट उभा करत कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी ही सभासदांची राहील यासाठी कपबशी या चिन्हा समोरील बटन दाबा व सर्व च्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा व ही आजरा साखर कारखाना आजरा तालुक्याचे दैवत वाचवण्यासाठी सर्व सभासदांनी पुढे या असे आवाहन श्रीमंती रेडेकर यांनी केले. यावेळी सुनीता रेडेकर, जनार्दन टोपले मलिककुमार बुरुड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आघाडीचे सर्व उमेदवार सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद घाटगे यांनी आभार मानले.
श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी वतीने आजऱ्यात श्री रवळनाथ मंदिर तर मडीलगेत भावेश्वरी देवीला नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ.)
आजरा.- प्रतिनिधी.-

श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी वतीने आजऱ्यातील श्री रवळनाथ मंदिरात तर मडीलगेत भावेश्वरी देवीला नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित सभासदांना राष्ट्रवादीच्या पॅनल ची रचना व निवडणूक चिन्ह याबाबतची माहिती देण्यात आली स्वागत व प्रास्ताविक सरपंच बापू निऊगरे यांनी केले. यावेळी उत्तुर विभागाचे राष्ट्रवादीचे युवा नेते संभाजी तांबेकर यांनी श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीला आजरा साखर कारखाना निवडणूक का लढवावी लागली. याबाबत माहिती दिली व आघाडीच्या सर्व उमेदवारांना विमान या चिन्हावर मतदान करून आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना ज्ञानदेव पोवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक लढवून कारखान्याला आर्थिक कर्जात टाकायचे नव्हते यासाठी बिनविरोध कारखाना करण्याचे धोरण होते परंतु अशोक चराटी यांनी कारखाना आर्थिक अडचण सोडून राष्ट्रवादी बाजूला जात आहे अशी टीका व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ही निवडणूक लढवणे भाग पडले आहे ही निवडणूक आता रिंगणात उतरलो आहे तर लढावे लागेल व जिंकावे लागेल यासाठी आपण सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले.
या विभागाचे उमेदवार दीपक देसाई यांनी सभासदांना आपण गावातील व इतर नेत्यांना कल्पना देऊनच ही निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे येथील सर्व पॅनलच्या उमेदवारांना आपण मतदान करावे व पुन्हा आजरा साखर कारखान्यात मडिलगेतील उमेदवार विजयी करून पाठवावा अशी विनंती सभासदांना केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता. अध्यक्ष अनिकेत कवळेकर, तसेच प्रकाश कांबळे, सखाराम येसने, बबन कातकर, भाऊसाहेब पाटील, महादेव जाधव, सह सभासद महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
【आजरा येथील श्री रवळनाथ मंदिर येथे श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या वतीने प्रचाराचा नारळ ठेवून शुभारंभ करण्यात आला..

प्रचार शुभारंभ प्रसंगी श्री रवळनाथ विकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घेऊन देखील पुन्हा निवडणुकीत उतराव लागलं कारण कारखाना अडचणीत आहे तरीही कारखाना सोडून बाजूला जात आहेत व अपक्षांना पाठिंबा देण्याची भूमिका असल्याचे आरोप झाले व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूकला सामोरे जावे लागले
असल्याचे यामुळे आता ही लढाई राष्ट्रवादीच्या व पालकमंत्री हजर मुश्रीफ यांच्या अस्तित्वाची आहे यासाठी सर्व सभासदांनी कामाला लागावे व या आघाडीला सर्व उमेदवारांनी प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन सर्व उमेदवारांनी यांनी केले
त्यावेळी आघाडीचे सर्व उमेदवार कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.】
अपक्ष उमेदवार शांताराम पाटील यांच्याही प्रचाराचा नारळ श्री रवळनाथ मंदिरात ठेवून प्रचारांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ही निवडणूक आपण अपक्ष असलो तरी शेवटपर्यंत लढणार व जिंकणार असल्याची भूमिका श्री पाटील यांनी मांडली यावेळी सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.
