HomeUncategorizedदूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा माजी आमदार के. पी. पाटलांची बाजी.

दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा माजी आमदार के. पी. पाटलांची बाजी.

दूधगंगा वेदगंगा बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा माजी आमदार के. पी. पाटलांची बाजी.

कोल्हापूर : प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत लागले होते या निवडणुकीवरच पुढील विधानसभा देखील कोणाकडेही ठरणार आहे या कारखाना निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या सत्ताधारी पॅनेलने सर्वच्या सर्व 25 जागा अधिक मताने जिंकत या कारखान्यावर आपलं अस्तित्व सिद्ध केले आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलला पराभव सामोरे जावे लागले. परंतु संमिश्र असा निकाल लागेल असा अंदाज व्यक्त होत होता या कारखान्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनेल तर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, समरजीत घाटगे, ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेल रिंगणात होते. गेले पंधरा दिवस कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या भुदरगड, कागल, राधानगरी व करवीर तालुक्यात प्रचाराचा मोठा धुराळा उडाला होता. रविवारी कारखान्यासाठी चुरशीने 89% मतदान झाले साऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीचा निकाल हाती आला यामध्ये सत्ताधारी गटाने सरासरी 5500 ते 6500 मताधिक्याने सर्व 25 जागेवर विजय होत एकतर्फी विजय मिळवला आहे.

उमेदवार निहाय मतदान पुढील प्रमाणे….

सत्ताधारी गट….

उत्पादक गट क्रमांक एक राधानगरी :

राजेंद्र पाटील : 27235, राजेंद्र भाटळे : 26823, राजेंद्र मोरे : 27767

उत्पादक गट क्रमांक दोन राधानगरी :

दीपक किल्लेदार : 26876, दत्तात्रेय पाटील : 26619, उमेश भोईटे : 27884

उत्पादक गट क्रमांक तीन कागल :

गणपतराव फराकटे : 27267, रणजीत मुडुकशिवले : 25999, सुनीलराव सूर्यवंशी : 27126

उत्पादक गट क्रमांक चार कागल :

प्रवीणसिंह पाटील : 28552, रवींद्र पाटील : 27438, रंगराव पाटील : 27341

उत्पादक गट क्रमांक पाच भुदरगड :

पंडितराव केणे : 26942, मधुकर देसाई : 27127, राहुल देसाई : 27489, के. पी. पाटील : 28693

उत्पादक गट क्रमांक सहा भुदरगड :

सत्यजित जाधव : 29101, धनाजीराव देसाई : 27845, केरबा पाटील : 26995

उत्पादक गट क्रमांक सात करवीर :

संभाजीराव पाटील : 27384

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी :

रामचंद्र कांबळे : 27926

महिला राखीव प्रतिनिधी :

क्रांती उर्फ अरुंधती पाटील : 27467

रंजना पाटील : 26612

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :

फिरोजखान पाटील : 27360

भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी :

रावसो खिलारी : 28308

परिवर्तन आघाडी :

उत्पादक गट क्रमांक एक
विठ्ठलराव खोराटे : 20807, ए. वाय. पाटील : 21700, नंदकिशोर सूर्यवंशी : 20565

उत्पादक गट क्रमांक दोन राधानगरी :

एकनाथ पाटील : 20209, अशोक फराकटे : 20439, युवराज वारके : 20118

उत्पादक गट क्रमांक तीन कागल :

बाबासाहेब पाटील : 21616, संजय पाटील : 19165, बालाजी फराकटे : 20807

उत्पादक गट क्रमांक चार कागल :

जयवंतराव पाटील : 21120
रणजितसिंह पाटील : 20792
चंद्रशेखर सावंत : 20281

उत्पादक गट क्रमांक पाच भुदरगड :

अर्जुन आबिटकर : 22748
दत्तात्रय उगले : 19682
मदनराव देसाई : 18966
नाथाजी पाटील : 19374

उत्पादक गट क्रमांक सहा भुदरगड :

पांडुरंग डेळेकर : 20247
के. जी. नांदेकर : 20758
विलास बेलेकर : 19888

उत्पादक गट क्रमांक सात करवीर :

सुमित चौगुले : 22009

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी :

बाळकृष्ण भोपळे : 21491

महिला राखीव प्रतिनिधी :

कावेरी पाटील : 21559

संपदा पाटील : 20600

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :

विजय बलुगडे : 21572

विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी :

तानाजी सणगर : 20657

अशी दोन्ही आघाडी उमेदवारांची पडलेली मते आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.