HomeUncategorizedगर्जनाचा दणका आणि कामगार खाते भानावर ! किमान वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच...

गर्जनाचा दणका आणि कामगार खाते भानावर ! किमान वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार.- प्रकाश बेलवाडे. 🛑अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अंतिम सुगीची पिके भिजली पावसात( आजरा आठवडा बाजार अवकाळी पावसाने झोडपला.)🛑पाटबंधारे खात्याने केलेल्या अन्यायी पाणीपट्टी वाढीच्या विरोधात( सोमवारचा मोर्चा यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार.)

🛑गर्जनाचा दणका आणि कामगार खाते भानावर ! किमान वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार.- प्रकाश बेलवाडे. 🛑अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अंतिम सुगीची पिके भिजली पावसात
( आजरा आठवडा बाजार अवकाळी पावसाने झोडपला.)
🛑पाटबंधारे खात्याने केलेल्या अन्यायी पाणीपट्टी वाढीच्या विरोधात
( सोमवारचा मोर्चा यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धा
र.)

आजरा.- प्रतिनिधी.

पाटबंधारे खात्याने केलेल्या अन्यायी पाणीपट्टी वाढीच्या विरोधात आजरा तहसील कार्यालयावर सोमवारी काढण्यात येणार मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार आज किसान भवन येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम पाटील होते. या मोर्चाचे निमंत्रक कॉ संपत देसाई म्हणाले की अन्यायी पाणीपट्टी वाढ आणि महावितरणचा अनागोंदी कारभार शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. त्यामुळे पाटबंधारे आणि महावितरण या दोन्ही विभागांना धडकी भरेल असाच मोर्चा यावेळीं आपण संघटित करूया. कुणीही या आणि शेतकऱ्यांना कसेही हाका हे आता खपवून घेतले जाणार नाही. तालुक्यातील मोटरपम्पधारक शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. शांताराम पाटील म्हणाले तालुक्यातील शेतकरी आता जागा झाला असून शासनाला हा निर्णय मागे घ्यायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यामुळे कोणी आम्हला गृहीत धरू नये. यावेळी प्रकाश पाटील, दशरथ घुरे, बजरंग पाटील , सयाजी कोडक, सचिन देसाई शंकर पाटील, बाबू एडगे, संजय घाटगे, प्रकाश मोरुस्कर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा ठीक ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून तहसील कार्यलयाकडे निघेल.

🛑अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अंतिम सुगीची पिके भिजली पावसात
( आजरा आठवडा बाजार अवकाळी पावसाने झोडपला.)

आजरा.- संभाजी जाधव.

मागील पंधरा दिवसापासून आजरा परिसरात अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली होती. परंतु आजरा तालुक्यात फारसा अवकाळी पाऊस पडला नव्हता परंतु शेतकऱ्यांची अंतिम सुगी घरी येत असताना अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा नाचना, उशिरा येणारे भात व अल्प प्रमाणात भुईमूग सह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे तर आजरा शहरातील तालुक्याचा आठवडा बाजार शुक्रवार रोजी भरला जातो अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व्यापारी सह ग्राहकांना झोडपून काढले. पावसाळा जवळपास संपल्याने पावसापासून संरक्षण न केल्याने असुरक्षित आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली अंदाजे तीन तास चालू असलेल्या मुसळधार पावसाने व्यापाऱ्यांचे हाल झाले तर ग्रामीण भागातून येणारा ग्राहक यांची तारांबळ उडाली. नाचना व भात पिकांची काही प्रमाणात मळणी सुरू आहेत तर नाचना व भात पीक भिजल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

🛑गर्जनाचा दणका आणि कामगार खाते भानावर ! किमान वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार.- प्रकाश बेलवाडे.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

गर्जनाचा दणका आणि कामगार खाते भानावर किमान वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे शोषित कामगारांतर्फे यूनियनचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी गर्जना श्रमिक संघाने कामगार खात्याला कामगारांच्या हक्काच्या संरक्षणासाठी असणारे इन्स्पेक्शन होत. नसल्यावरून इशारा देऊन त्वरित सर्व कारखान्यामध्ये निरीक्षणे प्रस्तावित करण्यासाठी आग्रह केला होता.
कामगार खात्यातील आणि कामगार आयुक्तालयातील गलथान कारभारामुळे आणि कारखानदारांच्या फाय‌द्यासाठी जाणीवपूर्वक आवश्यक निरीक्षणे केली जात नव्हती.
गर्जना च्या हे लक्षात येताच आम्ही कामगार मंत्री, प्रधान सचिव, कामगार आयुक्त यांचेकडे २८ नोव्हेंबर २०२३ रोजी रीतसर पाठपुरावा केला.
त्याचा परिणाम म्हणून मागील दहा वर्षात कामगार खात्याने फक्त २५ इन्स्पेक्शन केली पण डिसेंबर २०२३ मध्ये तेवढीच म्हणजे एकूण २१ इन्स्पेक्शन प्रस्तावित केली आहेत. यामध्ये सु‌द्धा जाणीवपूर्वक काही कारखान्यांना टाळले आहेच. पण लवकरच शेवटच्या कामगाराला न्याय मिळेपर्यंत गर्जना श्रमिक संघ लढा देणार असून वेळ पडल्यास न्यायालयात सुद्धा दाद मागू पण कामगारांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या राजकीय तसेच सर्व कारखानदारांवर वाचक बसेल असे आंदोलन करू
कामगार खात्याने घेतलेल्या पुढाकाराबद्दल आज आम्ही त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहोत.
तसेच आमच्या पाठपुराव्याला साद देऊन कार्यवाही केल्याबद्दल राज्यातील शोषित कामगारांतर्फे यूनियन चे अध्यक्ष श्री. बेलवाडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.