चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून – सुळे. ता. आजरा.
आजरा.- प्रतिनिधी.
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून सुळे. ता. आजरा येथे घटना घडली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. यातील
हकीकत आरोपी व मयत हे नात्याने पती पत्नी आहेत. यातील आरोपीत हा मयत हिचे चारित्र्यावर संशय घेत असलेने त्यांचेत वाद होत होते. वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी याने त्यांची पत्नी यातील मयत हिचेशी घरगुती किरकोळ कारणावरुन भांडण करुन, तिचे चारित्र्यावर संशय घेवून तिचे डोकीत काही तरी मारुन तिला जिवे ठार मारले आहे, म्हणून यातील फिर्यादी यांनी फिर्यादी जबाब दिलेने वरीलप्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे यातील
फिर्यादी पांडुरंग धोंडीबा वळतकर, रा. तावरेवाडी, ता. गडहिंग्लज, जि.कोल्हापूर असुन
आरोपी संभाजी ईश्वर पोवार, सुळे ता.आजरा, जि. कोल्हापूर
गुन्ह्यातील मयत सौ. सुमन संभाजी पोवार, वय ४५ रा. सुळे ता. आजरा गुन्ह्यातील हत्यार कोणत्यातरी अज्ञात हत्याराने गुन्ह्याचा तपास मा. सपोनि सो करीत आहेत. दाखल अंमलदार :- पासई श्री.के.डी. ढेरे तपास अधिकारी सपोनि एस. के. हारुगडे आहेत.
