🛑विरोधी गटाची निवडणुकीतून माघार पण अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका.- अशोक चराटी.- चराटी, शिंपी, रेडेकर, शिवसेना सुनील शिंत्रे गट यांची पत्रकार परिषद
आजरा.- प्रतिनिधी.

कारखाना अडचण ठेवून जाणीवपूर्वक बिनविरोध मध्ये सहभाग न घेता निवडणूक प्रक्रियेतून माघार घेऊन अपक्षांना पाठिंबा देण्याची भूमिका विरोधकांची असल्याचे समजते. पण आमची निवडणूक लागल्यास निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे. अशी भूमिका पत्रकार परिषदेत श्री चराटी यांनी मांडली. आमदार सतेज पाटील, विनयजी कोरे सावकार यांनी बिनविरोधचा तयार केलेला गटातटाचा फार्मूला व शिंपी गट, चराटी, अंजनाताई रेडेकर गट, शिवसेना सुनील शिंत्रे.,शेतकरी संघटना या सर्व गटांना योग्य अशा जागा देऊन हा निर्णय काल झाला होता. याच पार्श्वभूमीवर हे सर्व एकत्र गट कशासाठी आलो याबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती. स्वागत व प्रास्ताविक माजी चेअरमन सुनील शिंत्रे यांनी केले. यावेळी चराटी म्हणाले भविष्यात कारखान्याचे कर्ज कमी करण्याचे आमचे धोरण आहे.. ही निवडणूक लावण्याची भूमिका विरोधकांची असली तरी अपक्ष उमेदवारांनी सहकार्य केल्यास ही निवडणूक लागणार नाही। व कर्जाचा बोजा वाढणार नाही. यासाठी सर्वांनी विचार करावा शेतकरी संघटनेच्या ऊस दरवाढीच्या मागणीला आमचा विरोध नाही. पण आजची कारखान्याची परिस्थिती अडचणीची आहे. पण आम्ही योग्य सादर देऊ सद्या १५० कोटी कर्ज आहे. निवडणूक लागल्यास पुन्हा कर्ज वाढेल यामध्ये आम्ही दहा कोटी कर्ज कमी करण्याचे धोरण आहे. परंतु अपक्षाने यामध्ये मदत करावी व सहकार्याची भूमिका घ्यावी असे श्री चराटी बोलताना म्हणाले.


यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी चेअरमन सुनील शिंत्रे म्हणाले सद्या राज्यातील देशातील कारखाने चालवणे अडचणीचे आहे. सर्वांच्या सहकार्याने मागील गळीत हंगाम सहकार तत्त्वावर चालवण्यास यशस्वी झालो यामध्ये खऱ्या अर्थाने कामगार तसेच मदत केलेल्या सर्व बँका व संस्था, सभासदांचे सहकार्य लावल्याने कारखाना चालू झाला पण सद्यस्थितीला कारखान्याच्या निवडणुकीतून कारखाना अडचणीत ठेवून बाजूला जाणे व कारखाना अडचणीत आणणे चुकीचे होईल यासाठी परिस्थितीचा सामना करून कारखाना कर्जातून बाहेर काढणे महत्त्वाचे असेल हा सर्व विचार आम्ही देखील करत आहोत तसा विचार अपक्ष उमेदवार यांनी करावा व निवडणुकीतील माघार घ्यावी. तरच ही निवडणूक लागणार नाही. व कारखान्यावर कर्जाचा बोजा होणार नाही. आमच्या पॅनलची रचना ही सभासद व कामगार यांच्या हिताची रचना असणारे पॅनल आहे. यामध्ये एखाद्या अपक्षाचा जरी फॉर्म माघार घेण्याचा राहिला तरीही देखील कारखान्याची निवडणूक लागू शकते. उद्यापर्यंत अपेक्षा आहेत की चांगले निर्णय घेऊन कारखाना होईल सध्या ६० कोटी रुपये ऊस बिलासाठी मंजूर झाले आहेत. ऊस उत्पादक सभासद यांनी चिंता करू नये आपले बिल वेळेवर दिले जाईल तेही इतर कारखान्यात प्रमाणे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. असे श्री शिंत्रे बोलताना म्हणाले.
यावेळी श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी मागील कार्यकालाचा आढावा घेत म्हणाल्या शेतकरी ऊस उत्पादक कामगारांना वाऱ्यावर सोडून बाहेर पडण्याची आमची भूमिका मुळीच नाही आमची क्षमता आहे अन्य प्रोजेक्ट सुरू करून असा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आम्ही आजरा साखर कारखाना आजरा तालुक्याची दौलत वाचवु यासाठी एकत्र आलो आहोत सर्वांनी कारखाना वाचनासाठी अपक्ष आणि सकारात्मक भूमिका घेऊन कारखाना व बोजा वाढवणे यासाठी माघार घ्यावी कामगार युनियनने देखील बिनविरोध व्हावा. अशी भूमिका घेतली आहे. एका विचाराने एकत्र आलो आहोत एका विचाराने कारखाना चालवून दाखवू असे श्रीमंती रेडेकर म्हणाल्या.
या पत्रकार परिषदेत माजी चेअरमन जयवंतराव शिंपी, माजी संचालक मलिककुमार बुरुड, विलास नाईक राजेंद्र सावंत तानाजी देसाई, जनार्दन टोपले, दशरथ अमृते तसेच संभाजी पाटील युवराज पोवार, अभिषेक शिंपी, अनिरुद्ध केसरकर सह शिंपी, चराटी, रेडेकर, सर्व गटाचे उमेदवार पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी आभार मानले.

🛑आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखाना निवडणूक बाबत आजरा मनसेने आपली भुमिका प्रसिद्धीपत्रका द्वारे माहिती दिली. दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा दिवसापासून कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे बिनविरोध केल्यास कारखान्यावर निवडणुकीचा वाढणारा कर्जाचा बोजा. यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी ही भूमिका तालुक्यातील गटातटाचे नेते करत आहेत १ डिसेंबर रोजी माघार दिवस आहे. व बिनविरोध कारखाना करायचा याबाबत काल जागा वाटपाचा फार्मूला देखील ठरला परंतु यामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मनसेला बाजूला ठेवण्यात आले आम्ही देखील कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे निवडणुका सामोरे जाण्याचे नाही व त्या प्रवाहात देखील राहायचं नाही असं ठरवलं होतं परंतु काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज भरले आहेत.
सद्यस्थितीला कारखान्यातील माघार नंतर राहिलेले उमेदवार व यामधील काही गटातटाचे उमेदवार यांचे मत कारखाना आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी कारखाना बिनविरोध व्हावा व निवडणुकीचा ८० लाख रुपये होणारा खर्च निवडणुकीवर बोजा पडू नये हीच भूमिका ऐकायला मिळते. परंतु याबाबत सभासद कामगार किंवा तालुक्यातील अन्य लहान मोठे पक्ष यांचा विचार तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी न करता आपणच त्यात संचालक असावं आपल्याच गटाची सत्ता असावी व सर्व कारभार एखादी आपण पाहावा ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून बिनविरोधचा राजकीय ड्रामा करण्याचे धोरण दिसते.
मागील कारखाना चालू होत असताना चालू करण्यामध्ये आमचं देखील काही योगदान आहे ही काही मंडळी विसरली आहेत.
आजरा मनसेची देखील इच्छा आहे तालुक्यातील ही मोठी संस्था तालुक्याचे दैवत आहेत ही संस्था व्यवस्थित चालावी सभासदांना याचा चांगला लाभ मिळावा पण कारखाना आर्थिक अडचणीत आहे म्हणून कामगारांनी अर्धा पगार देखील सोडला पण सभासदांच्या पदरी दीपावलीच्या तोंडावर सभासदांना साखर देखील दिली नाही. मग हे सभासद व कामगारांचे योगदान देखील आहे. अशा अनेक कारखाना चालावा यासाठी मदत करणाऱ्या सभासद व हितचिंतकांचा विविध संस्थेच्या पदाधिकारी यांचा विचार झाला पाहिजे होता किमान उमेदवारी नसेल ना पण मनसेसारख्या पक्षाला कारखाना बिनविरोध बाबत आपली भूमिका व आपला पाठिंबा बिनविरोधात राहावा यासाठी बोलणं गरजेचे होते पण आम्हाला त्या ठिकाणी स्थान दिले नाही यामुळे आम्हाला देखील आज वाटते या कारखान्याची संचालक कोण असावे हे सभासदाने ठरवावे व योग्य उमेदवारास आजारा मनसे पाठिंबा देईल. पण कारखाना पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी हा एक राजकीय ड्रामाच केला आहे. मग अपक्ष उमेदवारांनी करायचं काय त्यांच्या लोकशाहीने दिलेल्या अधिकारावर गदा आणायचे काम व बेदक्कल करण्याचे काम काही राजकीय मंडळी करत आहेत. यामुळे योग्य तो तोडगा काढून योग्य उमेदवारांना या कारखान्यात संधी द्यावी. अन्यथा निवडणुकीला सामोरे जावे लागल्यास आजरा मनसे त्यावेळी आपली भूमिका नक्कीच योग्य पद्धतीने जाहीर करेल
याची नोंद सभासदांनी घ्यावी.
असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष परशुराम बामने, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, वि. सेना जि. उपाध्यक्ष अश्विन राणे, ता. उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, अंकुश लोहार, यांच्या सह्या आहेत.
