HomeUncategorizedआमचा विचार न झाल्याने - कार्यकर्त्यांचा दबाव - व योग्य जागा नाही...

आमचा विचार न झाल्याने – कार्यकर्त्यांचा दबाव – व योग्य जागा नाही मिळाल्यास निवडणुकीला सामोरे जाणार.- शिंदेसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.

आमचा विचार न झाल्याने – कार्यकर्त्यांचा दबाव – व योग्य जागा नाही मिळाल्यास निवडणुकीला सामोरे जाणार.- शिंदेसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा दिवसापासून कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे बिनविरोध केल्यास कारखान्यावर निवडणुकीचा वाढणारा कर्जाचा बोजा. यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी ही भूमिका तालुक्यातील गटातटाचे नेते करत आहेत १ डिसेंबर रोजी माघार दिवस आहे. व बिनविरोध कारखाना करायचा याबाबत काल जागा वाटपाचा फार्मूला ठरला यामध्ये शिंदे सेना यांचा विचार मागणीप्रमाणे न झाल्याने आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष संजय पाटील म्हणाले.
राज्यात मुख्यमंत्री, व या मतदार संघात आमदार तसेच जिल्ह्यात दोन खासदार आमचे आहेत असे असताना देखील आमचा विचार होत नाही याचा अर्थ काय.
याबाबत आम्ही आमचे नेते व आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासमोर आमची भूमिका सांगून चर्चा केली आहे याबाबत जिल्हाभाजप नेते व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांना भेटलो व विचारणा केली व चार जागेची मागणी केली आहे त्यांच्याकडून आम्हाला कोणता प्रतिसाद मिळतो व आज रात्री पुन्हा आमदारांशी चर्चा करून उद्या सकाळपर्यंत आम्हाला योग्य अशा जागा नाही मिळाल्यास आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यामध्ये कार्यकर्त्यांचा दबाव वाढत चालला आहे व मागील पंधरा-वीस वर्षांपूर्वी पासून दोन-तीन वेळा तेच संचालक कशासाठी व अनेक गटाच्या बैठच्या झाल्या त्यामध्ये शिंदे गटाचा विचार झालेला नाही आम्हाला विचारात न घेता आपण परस्पर जागावाटप करून घेत असाल तर या गोष्टी आमच्या गटाला व कार्यकर्त्यांना मान्य नाहीत सर्वांना सोबत घेऊन जायला पाहिजे होते तसे न होता. माजी संचालकांचा फक्त विचार झाला यामुळे नव्याना जर संधी मिळत नसेल नगरपंचायत फार्मूलावर आम्हीही निवडणुकीच्या रिंगणात उतरू अशी भूमिका श्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली यावेळी इंद्रजीत देसाई, विजय थोरवत, अनिल डोंगरे, संतोष भाटले, दत्ता पाटील, काकासो देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.