HomeUncategorizedअन्यायी पाणीपट्टी वाढ आणि जलमापक यंत्राची सक्ती रद्द करावी - सोमवारी पाटबंधारे...

अन्यायी पाणीपट्टी वाढ आणि जलमापक यंत्राची सक्ती रद्द करावी – सोमवारी पाटबंधारे खात्याच्या विरोधात आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा.

अन्यायी पाणीपट्टी वाढ आणि जलमापक यंत्राची सक्ती रद्द करावी – सोमवारी पाटबंधारे खात्याच्या विरोधात आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा.

आजरा-प्रतिनिधी.

अन्यायी पाणीपट्टी वाढ आणि जलमापक यंत्राची सक्ती रद्द करावी याबरोबरच महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात सोमवार दि ४ रोजी आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आज किसान भवन येथे झालेल्या मोटरपंप धारक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा होते.
यावेळी बोलताना मेळाव्याचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई म्हणाले की राज्य सरकारचे पाटबंधारे खाते आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. जलमापक यंत्रांची सक्ती करून शेतकऱ्यांच्या पाणी वापराच्या नैसर्गिक हक्कावरच गदा आणू पाहतय, शेतकऱ्यांचे पाणी पळविण्याचा असाच प्रयत्न २०१४ साली झाला होता. सत्ताधारी आणि विरोधी असलेल्या २८८ आमदारांनी एकत्र येत रात्री १२ वाजता पाण्याचे अग्रक्रम बदलून पिण्याच्या पाण्यानंतर शेती ऐवजी उद्योगांना पाणी देण्याचे धोरण आखले. शेतकऱ्यांच्या पाण्यावरच मध्यरात्री दरोडा घातला. याविरोधात श्रमिक मुक्ती दलाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी संघर्ष करून सरकारला धोरण बदलायला लावले. त्यामुळे यावेळी सुध्दा शेतकरी हा निर्णय बदलायला भाग पाडतील.
माजी सभापती अल्बर्ट डिसोझा म्हणाले, कुठलाच शेतकरी पाणी फुकट मागत नाही, पण अन्यायी पाणीपट्टी शेतकरी खपवून घेणार नाही. तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन पाटबंधारे खात्याचा हा निर्णय आपण बदलायला भाग पाडूया. सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन या लढ्यात शेतकऱ्यांनी सामील व्हावे.
कॉ संजय तरडेकर म्हणाले तालुक्यातील कुठल्याच धरणाला कालवे नाहीत त्यामुळे आम्ही पाणी मोटर बसवून उचलून घेतो. त्यामुळं पासल पाणी आणि उचलून घेयलेलं पाणी याची पाणीपट्टी समान असता कामा नये. याविरोधात सर्वांनी मिळून आवाज उठवूया.
यावेळी संभाजी सावंत, प्रकाश मोरुस्कर, कॉ शांताराम पाटील, हरिबा कांबळे, निवृत्ती कांबळे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मेळाव्याला बाबुराव नाईक, जोतिबा चाळके, सर्जेराव देसाई, बजरंग पाटील, उदय कोडक, संकेत सावंत, सचिन देसाई, संभाजी पाटील, शंकर पाटील, सुनील पाटील , दशरथ घुरे, मारुती पाटील, बाळासाहेब कोडक यांच्यासह मोटरपंप धारक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. सुरेश शिंगटे यांनी स्वागत केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.