Homeकोंकण - ठाणेआजरा कारखाना आर्थिक अडचणीत व. कामगार, सभासदांच्या हितासाठी निवडणुकीतून माघार. घेण्याची तयारी...

आजरा कारखाना आर्थिक अडचणीत व. कामगार, सभासदांच्या हितासाठी निवडणुकीतून माघार. घेण्याची तयारी – जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई. राष्ट्रवादी ता. अध्यक्ष.- मुकुंदराव देसाई.

आजरा कारखाना आर्थिक अडचणीत व. कामगार, सभासदांच्या हितासाठी निवडणुकीतून माघार. घेण्याची तयारी – जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई. राष्ट्रवादी ता. अध्यक्ष.- मुकुंदराव देसाई.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. यासाठी अधिक निवडणुकीचा खर्चाचा कर्जात बोजा वाढू नये व कामगार, सभासदांच्या हितासाठी आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, व राष्ट्रवादी काँग्रेसचे ता. अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी माहिती दिली. यामध्ये
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार आजरा साखर कारखाना निवडणुकीतून कारखान्याचे हीत डोळ्यासमोर ठेवून कारखान्यावर खर्चाचा अतिरिक्त बोजा होऊ नये यासाठी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई व जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी स्पष्ट केले. कारखाना अडचण असताना सत्ता संघर्षाचा परिणाम आजरा कारखान्याला पोषक नसून पुन्हा कारखाना आर्थिक अडचणीत येऊ नये यासाठी हा निर्णय घेत असल्याचे मुकुंदराव देसाई व सुधीर देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले बहुतांशी उमेदवार उपस्थित होते.
दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या निर्णयामुळे कारखाना निवडणुक राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. या निर्णयावर कितपत ठाम राहणार यावर ही आता पुढचे भवितव्य अवलंबून रहाणार हे मात्र निश्चित.

यामध्ये काही अपक्ष उमेदवार यांचा विचार सत्तेमध्ये नाही. झाल्यास किंवा काही उमेदवारांनी अर्ज माघार नाही घेतल्यास ही निवडणूक लागणार आहे. मग आपण यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर श्री देसाई यांनी आमचा उद्देशच बिनविरोध करण्याचा आहे. व निवडणुकीतून माघार घेण्याचा आहे. यामुळे अन्य सभासद उमेदवारांच्या समजूती काढणे किंवा त्यांनी स्वतः समजून घेऊन माघार घेणे हे कारखान्याच्या हितासाठी होईल यामुळे सद्यस्थितीला आम्ही कारखाना बिनविरोध होऊन विरोधकांना एक हाती कारभार करावा व कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवावा अशी आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. आमच्या गटाचे किंवा राष्ट्रवादीचे सर्व उमेदवारांची माघार घेण्याची जबाबदारी आमची राहील असे बोलताना म्हणाले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.