Homeकोंकण - ठाणेव्यंकटरावमध्ये एन.सी.सी. दिवस उत्साहात संपन्न.🛑लक्ष्मीपूजन निमित्य ठेवलेली रोख रक्कम / दागिने लंपास...

व्यंकटरावमध्ये एन.सी.सी. दिवस उत्साहात संपन्न.🛑लक्ष्मीपूजन निमित्य ठेवलेली रोख रक्कम / दागिने लंपास करणारा चोरटा अखेर गजाआड.

🛑व्यंकटरावमध्ये एन.सी.सी. दिवस उत्साहात संपन्न.
🛑लक्ष्मीपूजन निमित्य ठेवलेली रोख रक्कम / दागिने लंपास करणारा चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात.

आजरा.- प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये २६ नोव्हेंबर एनसीसी दिवस तसेच भारतीय संविधान दिवस उत्साह संपन्न झाला. विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच शिस्त व एकता ही मूल्ये रुजवण्याचे कार्य 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर या विभागामार्फत आमच्या व्यंकटराव प्रशालेमध्ये संस्थान काळापासून दिवंगत एन.सी.सी. ऑफिसर एस.डी चव्हाण यांनी १९६६ ते १९८५ पर्यंत एनसीसी विभाग समर्थपणे सांभाळला , त्यानंतर एनसीसी ऑफिसर श्री सुनील देसाई ३१ वर्षे सेवा व सध्या सेवेत असणारे श्री महेश पाटील यांनी एन.सी.सी. विभागामधून आजरा तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना आजपर्यंत शिस्त लावत व त्यांच्यामध्ये मातृ पितृ ,देश व मातृभूमी यांचेबद्दल अपार प्रेम रुजवून देश सेवेसाठी सैन्यदल, पोलीस ,नेव्ही, इत्यादी विभागात काम करण्याची प्रेरणा दिली आहे…
या एनसीसी दिनानिमित्त शिवराज महाविद्यालयामध्ये एम ए चे शिक्षण घेत असणारी नरेवाडी या गावची सुकन्या कु. सुकन्या सुबराव रणदिवे नुकतेच दिल्ली येथे झालेल्या एनसीसी संचलनामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे हस्ते ट्रॉफी स्वीकारण्याचा बहुमान मिळविला.. या एनसीसी विद्यार्थिनीला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले.. त्यांचा सत्कार प्रशालेचे माजी प्राचार्य , संचालक व माजी एनसीसी ऑफिसर सुनील देसाई यांची हस्ते करण्यात आला . सुकन्या हिने आपल्या मनोगतामध्ये एनसीसी मधील विविध परीक्षा, कॅम्पस यशस्वीपणे पार करत असताना घेतलेल्या कष्टाची तसेच आपल्या जिद्दीचे कथन प्रशालेतील एनसीसी कॅडेटना केले.. (विद्यार्थी व विद्यार्थिनी)
त्यानंतर माजी एनसीसी ऑफिसर ज्याने ३१वर्षे एनसीसी सांभाळली श्री सुनील देसाई यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या कार्यकाळात एनसीसी मधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त बाणवत मार्गदर्शन केले व अनेक विद्यार्थी आज अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. व त्याप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून अभ्यास व परिश्रम करण्याचे आवाहन केले.
प्राचार्य आर जी कुंभार यांनीही आपल्या मनोगतामध्ये सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यातील फार कमी शाळेमध्ये एनसीसी हा विषय आहे आणि सध्या मुलींची सुद्धा एन.सी.सी.सुरू आहे. यामध्ये खेडोपाड्यातील मुलीही स्वतःला सिद्ध करत पुढे जाऊन सैन्य व पोलीस दलात सेवा करण्याचे ध्येय उराशि बाळगून एन सी सी चे शिक्षण घेत आहेत. याचे कौतुक वाटते असे सांगितले. व एनसीसी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भारतीय संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेत आपल्या ज्ञानाचा परिपूर्ण वापर करून भारतीय संविधान लिहिले . या संविधानाची एक प्रत सर्वांच्या घरी असणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी एनसीसी गीत गायिले.. घेतल्यानंतर २६/११ रोजी मुंबई येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान पोलीस तसेच नागरिक यांचेप्रति दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, एम एम देसाई श्रीम.ए बी.पुंडपळ, कलाशिक्षक कृष्णा दावणे, क्रीडा शिक्षक सुनील पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक एनसीसी ऑफिसर महेश पाटील यांनी केले.. सूत्रसंचालन पी व्ही पाटील यांनी तर आभार श्री एम एम देसाई यांनी मानले.

🛑लक्ष्मीपूजन निमित्य ठेवलेली रोख रक्कम / दागिने लंपास करणारा चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात.

आजरा.- प्रतिनिधी.

खोराटवाडी ता. आजरा येथील लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेली दागिने व पैसे दुकानदाराच्या किराणा दुकानामध्ये पुजलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह ९० हजारांवर रोकड लांबवणाऱ्या संतोष सखाराम शिंदे (वय ४५ रा. हिरलगे ता. गडहिंग्लज) याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शिंदे याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
१२ नोव्हेंबर रोजी रात्री शिंदे यांना दुकानाची कौले काढून ९० हजार रुपये रोख व सुमारे ४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती.
याबाबत खब-यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिंदे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सदर प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक चौकशी करता शिंदे हा व्यसनी असल्याचे समजते अधिक तपास आजरा पोलीस करत आहेत..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.