नाधवडेच्या माजी सरपंच गिताताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रबळ गटाचा परिवर्तन आघाडीला जाहीर पाठिंबा
के.पी.पाटील यांना आणखी एक मोठा धक्का
🛑श्री दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखाना.- 🛑पंचवार्षिक निवडणूक ( कौलगे ता.कागल येथील सभासदांच्या वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन.)
🛑 आजऱ्यात किल्ला स्पर्धा २०२३ चे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
🛑आजरा नगरपंचायत वाढीव कर – पाणीटंचाई खरंच याला कारणीभूत लोकप्रतिनिधी आहेत…का.?
कागल .- प्रतिनिधी..

कौलगे ता.कागल येथील सभासदांच्या वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार हसन मुश्रीफ यांनी भेटी घेतल्या आणि संवाद साधला.
यावेळी बोलताना श्री मुश्रीफ म्हणाले, श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी उभी केली आहे. तरी आपण सर्व सभासद बंधूंनी आमच्या या आघाडीला विमान या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले.


यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी संचालक प्रविणदादा पाटील, सुनिलराज सूर्यवंशी, गणपतराव फराकटे, रविंद्र पाटील, रंगराव पाटील, आपासो पाटील (AY), रणजीत मुडूकशिवाले, रावसाहेब खिल्लारी, माजी जिल्हा परिषद सदस्य अंबरीशसिंह घाटगे बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, माजी सभापती जयदीप पोवार, के.के.पाटील, हणमंत माने, अरुण पाटील, कृष्णात पाटील, शामराव मगदुम, नंदकुमार पाटील उपस्थित होते.

आजरा येथे किल्ला स्पर्धा २०२३ चे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
आजरा : – प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतचे नगरसेवक माजी अभिषेक शिंपी यांनी दीपावली सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांमधील सुप्तकलागुणांना वाव मिळावा व त्यांचा या निमित्ताने मोबाईल चा अतिरेक वापर टाळता यावा तसेच मातीशी असलेले आपले नाते कलाकृती निर्मितीच्या माध्यमातून घट्ट जुळलं जावं म्हणून किल्ला बनवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आपल्या आजरा शहरातील जवळजवळ १९ ते २० छोट्या मंडळानी किल्ला बांधण्यासाठी नोंदणी केली नोंदणी विनामूल्य होती. स्पर्धकांनी पाठ्यपुस्तकातील धड्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेले गड किल्ले समजावून घेऊन त्याची प्रतिकृती तयार करण्याचा अतिशय कष्टाने प्रयत्न केला. या सर्व किल्ल्यांची तज्ञ परीक्षकांमार्फत नुकतेच परीक्षण झाले व त्यातील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले किल्ले निवडले. या सर्व गुणवंत कलाकारांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ आज शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०३३ रोजी संपन्न झाला.
या स्पर्धेतील अनुक्रमे क्रमांक
प्रथम क्रमांक ..कुंभार गल्ली सौरभ गुरव रुपये पाच हजार व प्रमाणपत्र.,
द्वितीय क्रमांक.. सिद्धार्थ नगर सुशांत कांबळे .रुपये तीन हजार व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक. विभागून. नबापूर गल्ली प्रवीण भोसले.. रुपये एक हजार व प्रमाणपत्र.
तृतीय क्रमांक.. खंडोबा तालीम मंडळ कुणाल राजेश विभुते.. रुपये एक हजार व प्रमाणपत्र.
उर्वरित सर्व सहभागी एकूण १५ स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रत्येकी पाचशे रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले..
उत्तेजनार्थ स्पर्धक..
मोहित संभाजी नेवरेकर
अक्षय आनंद चिटणीस गोठण गल्ली
सिद्धेश संदीप नांदवडेकर सुतार गल्ली
अविनाश सुतार सुतार गल्ली
आयुष सुतार सुतार गल्ली
दीपक आनंद पोवार गांधीनगर
सिद्धार्थ शिवगंड चाफेगल्ली
वैभव जयवंत दोरूगडे
श्रीजीत सावंत रवळनाथ कॉलनी
आर्यन दोरूगडे सोमवार पेठ
समर्थ पांडुरंग पांगम पारपोलकर कॉलनी
कार्तिक रमेश दळवी.. चाळोबा गल्ली
कैवल्य बापट
या पारितोषिक वितरण समारंभासाठी खालील मान्यवर उपस्थित होते. यावेळी.अभिषेक शिंपी, अनिरुद्ध केसरकर परशुराम बामणे , अशोक पोवार, विक्रम पटेकर, धनाजी पारपोलकर, अमित खेडकर, इमरान सोनेखान, असिफ सोनेखान, विक्रम देसाई, संदीप पारळे, आनंदा कुंभार ओमकार माध्याळकर ,इब्राहिम इंचनाळकर, गोपाळ पाटील. आदी मान्यवर व विद्यार्थी, पालक या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले..

किल्ल्याच्या एकूण परीक्षणाबाबत हायस्कूलचे शिक्षक आर पी होरटे यांनी आपले विचार मांडले तसेच या किल्ला स्पर्धेच्या नियोजनाचा उद्देश अभिषेक शिंपी माजी नगरसेवक व संचालक आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
सूत्रसंचालन श्री पी व्ही पाटील
यांनी केले. एम ए पाटील यांनी आभार मानले..
आजरा नगरपंचायत वाढीव कर – पाणीटंचाई खरंच याला कारणीभूत लोकप्रतिनिधी आहेत…का.?
संपादकीय- संभाजी जाधव.

आजरा नगरपंचायतचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला आणि प्रशासकीय यंत्रणेने वाढीव करायची घोषणा केली ही घोषणा नगरपंचायत अँक्टनुसार बरोबर असली तरीही नगरपंचायत सेवा सुविधा व सद्यस्थितीला वाढीव कर हा जनतेसाठी वाढत्या महागाईला पोषक नाही. यामुळे आजरा रहिवासी या वाढीव कराला विरोध करत आहेत. हे बरोबर असले तरीही नगरपंचायत हवी तर नियमानुसार व नगरपंचायत वाढीवनीतीनुसार हा कर भरणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. मग या करायला लोकप्रतिनिधी कसे जबाबदार याबाबतचा मागील पाच वर्षात मासिक सभेमध्ये कोणत्याही प्रकारचा ठराव झाला नसल्याचे समजते व याबाबत माजी नगरसेवक यांनी आपली वाढीव कराला विरोध असेल व वाढीव कर नागरिकांनी न भरता पूर्वीपासून असलेला कर भरावा असे आवाहन देखील केले आहे. तरीही आजरा शहरवासीयांमध्ये काहींचा नगरसेवक यांच्यावर रोष दिसत आहेत. राजकारण म्हणून हा रोष योग्य असला तरी या ठिकाणी अन्य कोणीही लोकप्रतिनिधी असते तरीही कर वाढ कोणीही थांबू शकलं नसतं नगरपंचायत तरतूद व नगरपंचायत अँक्ट नुसार हा कर वाढत असतोच मग हा कर सध्या होत असल्या विरोध म्हणजे आजचं मरण उद्यावर असंच आहे. शेवटी नगरपंचायत म्हणून वाढीव कर हा येणारच तर दुसरीकडे विकास कामाच्या माध्यमातून काही प्रभागातून निकृष्ट दर्जाचे काम झाले अन्य काही प्रभागात कामे झाले नाहीत. नगरसेवकांनी दुर्लक्ष केले अशाही चर्चा होत आहेत. यामध्ये नवीन पाईपलाईन मुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. यामध्ये दूषित गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिक नगरपंचायत दुर्लक्ष असल्याचे बोलत आहेत. परंतु अंदाजे ४८ वर्षांपूर्वीची जुनी पाईपलाईन ही जीर्ण झाली आहे. सिमेंट पाईप सडल्याने व रस्ता खराब झाल्याने अवजड वाहने रस्त्यावरून गेल्यास काही प्रमाणात पाईप लिकेज होते व नगरपंचायत मध्ये पाणी पुरवठा विभागाकडे सद्यस्थितीला तीन कर्मचारी आहेत यापूर्वी ग्रामपंचायत असताना अंदाजे दहा-पंधरा कर्मचारी होते. त्यातून काही निवृत्त झाले व पूर्वीप्रमाणे नगरपंचायत असल्यामुळे कर्मचारी भरणे हे नगरपंचायतच्या हातात नसते. त्यामुळे अन्य काही कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सदर तीन कर्मचारी पाणी लिकेज व अन्य पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा सांभाळत आहेत राष्ट्रीय महामार्गाचे व नवीन जॅकवेलचे काम चालू असल्याने हिरण्यकेशी नदीवर मागील काही दिवसात पुलाचे काम चालू असताना पाणी अडवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने केले त्यामुळे पाणी गढूळ येत होते तर दुसऱ्या ठिकाणी जॅकवेल चे काम चालू असल्याने पाणी अडूनच जॅकलीन चे काम होऊ शकते नदीच्या पाण्यामध्ये जॅकवेल बांधता येत नाही. हे सर्वांनाच समजते परंतु यामुळे आणखी पाणी कडू झाली आणखी आजरा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना गढूळ पाणी येते व नगरपंचायत चे लक्ष नाही. यामुळे नेमकं आजरा नगरपंचायतचा कारभारच दूषित आहे. की नगरपंचायत होऊन पाच वर्षाचा कालावधी झाला आहे. अजून प्रशासकीय यंत्रणे कडून नगरपंचायत मध्ये सुधारणा झालेली नाही. या साठी काही कालावधी लागेल या गोष्टी काही समजून घेणे देखील गरजेचे आहे. परंतु हा आजरा रहिवासी यांनी आजरा नगरपंचायत वरिष्ठ प्रशासन नगर रचना विभाग यांच्याकडे दाद मागितली पाहिजे. नगरपंचायत दिला परंतु नगरपंचायत च्या सेवा सुविधा अद्याप योग्य प्रमाणात उपलब्ध नाहीत. मग आमची ग्रामपंचायतच बरी असं म्हणणे योग्य राहील यासाठी नगररचना विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे दात मागितले पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी काय केलं किंवा त्यांना नगरपंचायत म्हणजे काय समजायलाच पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. यामध्ये प्रशासनाबरोबर आजरा नगरपंचायतच्या सेवा सुविधांसाठी मुबलक निधी मिळवण्यात व प्रशासनाला लोकप्रतिनिधींची भूमिका व प्रभागातील नागरिकांची सेवा आम्ही कशी करू अशा काही गोष्टींमध्येच नगरपंचायत लोकप्रतिनिधींचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे याबाबत पुढील भावी नगरसेवक यांना नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून गेल्यानंतर आजरा नगरपंचायत प्रशासकीय योजनेचा कारभार कसा आहे व यासाठी काय करावे लागेल हे निश्चितपणे समजेल पण यासाठी आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करत बसणे म्हणजे आजरा शहराचा रखडलेला विकास होणार नाही..
नाधवडेच्या माजी सरपंच गिताताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रबळ गटाचा परिवर्तन आघाडीला जाहीर पाठिंबा
के.पी.पाटील यांना आणखी एक मोठा धक्का
गारगोटी प्रतिनिधी,

नाधवडे (ता.भुदरगड) येथील राष्ट्रवादी पक्षाचा मुख्य प्रबळ गट व हुतात्मा स्वामी-वारके सुत गिरणी मुदाळचे माजी व्हा.चेअरमन आणि नाधवडेचे सलग २० वर्षे सरपंच पद भूषविलेले स्वर्गीय संभाजीराव पाटील यांच्या पत्नी माजी सरपंच व विद्यमान सदस्या श्रीमती गिताताई संभाजीराव पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीकरीता राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीला जाहीर पाठींबा देत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थित आबिटकर गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ‘बिद्री’ चे चेअरमन व माजी आमदार के.पी.पाटील यांना आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
स्वर्गीय संभाजीराव पाटील यांचा आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघात मोठा जनसंपर्क होता आणि आजही त्यांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र संभाजीराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाची माजी आमदार के.पी.पाटील यांच्याकडून मोठी परवड झाली आहे. जणू या गटाला त्यांनी वाळतच ठाकले होते. जातात कुठे? माझ्याच पाठीमागे गुमान येणार आहेत. या आविर्भावात के.पीं.नी त्यांना साधे विचारात सुध्दा घेतले नाही. के.पीं.च्या ‘वापरा आणि फेकून द्या’ नितीला संभाजीराव पाटील गटाचे कार्यकर्ते अक्षरक्ष: कंटाळले होते. याबाबत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांमधून सतत असंतोष खदखदत होता. आम्हांला एकवेळ पद राहू द्या, पण आमचा योग्य सन्मान राखा. एवढीच माफक आपेक्षा त्यांचे कार्यकर्ते के.पीं यांच्याकडे व्यक्त करत होते. पण के.पींनी आयुष्यभर स्वर्गीय संभाजीराव पाटील यांचा राजकारणासाठी वापर करुन घेतला, मात्र त्यांच्या निधनानंतर यांचा आपल्याला उपयोग होणार नाही अशी भूमिका के.पीं.नी घेत सतत सापत्न भावाची या गटाला वागणूक दिली गेली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्यांमधून तीव्र नाराजीबरोबर असंतोष व्यक्त होत होता. अखेर के.पी.च्या अपमानास्पद वागणूकीला कार्यकर्त्यांनी कंटाळून के.पीं.ना राजकीय रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने स्वर्गीय संभाजीराव पाटील यांच्या पत्नी माजी सरपंच व विद्यमान सदस्या श्रीमती गिताताई पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकत्यांनी ‘बिद्री’ साखर कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर व आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदार संघात राबविलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर आमदार आबिटकर यांच्या सोबत जाण्याचा एकमुखी निर्णय घेत असंख्य कार्यकर्त्यासह गटात जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे माजी आमदार के.पीं पाटील यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी कोकण केसरी के.जी.नांदेकर, निवासराव देसाई (आण्णाजी), माजी संचालक दत्ताजीराव उगले, कल्याणराव निकम, सुर्याजीराव देसाई, वसंतराव प्रभावळे, टी.एस.देसाई (आण्णा), मदनदादा देसाई, भाजपा नेते नाथाजी पाटील, विलास बेलेकर, शामराव पाटील, युवानेते ऋषिकेश पाटील, विश्वास पाटील, धोंडीराम पाटील, तानाजी पाटील, अमर पाटील, भीमराव पाटील, आनंदराव पाटील मेजर, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, रघुनाथ पाटील, कुंडलिक पाटील, तानाजी पाटील, संतोष पाटील, आनंदा कांबळे, संजय पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
