Homeकोंकण - ठाणेसंविधान सन्मान परिषद आयोजित.- भारतीय संविधान संवर्धन व लोकजागर अभियान मार्फत २६...

संविधान सन्मान परिषद आयोजित.- भारतीय संविधान संवर्धन व लोकजागर अभियान मार्फत २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन कोळिंद्रे गावात साजरा. / निधन वार्ता.सुशिला अमृतराव देसाई यांचे वयाच्या ८४ वर्षी दुःखद निधन.

संविधान सन्मान परिषद आयोजित.- भारतीय संविधान संवर्धन व लोकजागर अभियान मार्फत २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन कोळिंद्रे गावात साजरा. / निधन वार्ता.
सुशिला अमृतराव देसाई यांचे वयाच्या ८४ वर्षी दुःखद निधन.

आजरा. – प्रतिनिधी.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट, कोळिंद्रे आणि संविधान सन्मान परिषद यांच्या वतीने भारतीय संविधान संवर्धन व लोकजागर अभियान मार्फत २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन कोळिंद्रे गावात साजरा करण्यात आला. सुरवातीला संविधान अभिमान रॅली कॅन्डल मार्च घेऊन गावात अतिशय उत्साहाने काढण्यात आली यावेळी संविधानाबाबत आणि संविधानातील मूल्यांबाबत घोषणा देण्यात आल्या. यामध्ये मुला मुलींचे स्त्री पुरुष कार्यकर्ते व लोक उपस्थित होते.

कोळिंद्रे ग्रामपंचायत भारत देशाच्या नकाशा काढून त्या नकाशाभोवती पेटत्या मेणबत्ती ठेवून चित्रकला करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायत संविधान सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये मुला मुलींनी संविधान गीते व सादर करण्यात आली. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मुला-मुलींनी तयारी करून संविधान गीते सादर केली आणि कार्यक्रमांमध्ये एक जोश निर्माण केला. या सभेमध्ये बोलताना समीर खेडेकर म्हणाले, भारतीय संविधान बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच का निवडले कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे अखंड भारताला घेऊन जाण्याची क्षमता होती. त्यांच्या विद्वत्तेच्या मुळेच संविधान बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मुस्लिम समाजासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिलेले आह. यानंतर सुरेश बुगडे सर म्हणाले, याच काळात संविधानाच्या जागर करण्याची गरज का निर्माण झालेली आहे. कारण हा जो काळ आहे. हा हुकूमशाहीकडे जाणारा काळ आहे लोकशाही तोडून ठोकशाहीकडे जाणारा काळ आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा जागर होणे गरजेचे आहे आणि तो करण्यासाठी कोळिंद्रे गावात आपण एकजुटीने हा कार्यक्रम करत आहोत. मात्र नुसता कार्यक्रम करून उपयोगाचे नाही तर भारतीय संविधानानुसार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार व्यवहार ही झाला पाहिजे.
त्यानंतर संग्राम सावंत म्हणाले, संविधानाचा प्रचार वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांच्यामध्ये संविधानाची ओळख होण्यासाठी भारतीय संविधान संवर्धन व लोकजागर अभियानाची सुरुवात केलेली आहे. संविधानानुसार देशाचा कारभारची अंमलबजावणी व्हावी. तसेच हे संविधान नाचे संवर्धन करणे ही गरज आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यमान उपसरपंच सदाशिव हेब्बाळकर बोलताना म्हणाले, हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम घेतलेला आहे संविधान दिन साजरा करताना भारतीय नागरिकाची मान उंचवणारा दिवस आहे. आपणा सर्वजण संविधान दिनाच्या निमित्ताने एकत्र आलो.हे महत्त्वाचे आहे. इथून पुढेही ग्रामपंचायत आपणास अशा कार्यक्रमासाठी मदत करेल.
प्रमुख उपस्थिती म्हणून मनोहर पाटील ग्रा.प. सदस्य; नंदा जाधव व मेघा जाधव ग्रा.प. सदस्या तसेच शंकर उगाडे, विष्णू वाके, तानाजी बुगडे, अरुण भोगले, संतराम कुराडे, अण्णा सावंत, शिवाजी उंडगे,अशोक बुगडे, महादेव सुतार, संजय कांबळे, लक्ष्मी कांबळे, जयश्री कांबळे,पूजा कांबळे, तुळसा कांबळे,मंगल कांबळे अक्षय कांबळे यांच्या मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन नारायण कांबळे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीत म्हणून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट, कोळिंद्रे आणि संविधान सन्मान परिषद व कोळिंद्रे ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले होते.

निधन वार्ता.
सुशिला अमृतराव देसाई यांचे वयाच्या ८४ वर्षी दुःखद
निधन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील सेवानिवृत्त शेती अधिकारी जयसिंगराव अमृतराव देसाई जिजामाता कॉलनी आजरा यांच्या मातोश्री सुशिला अमृतराव देसाई यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन बुधवारी दि २९ रोजी सकाळी ९ वा. नबापूर हिरण्येकेशी घाट येथे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.