Homeकोंकण - ठाणे७४ व्या संविधान दिन सोहळा निमित्य आजऱ्यात मनुस्मृति या विषयावर प्रदीर्घ व्याख्यान.-...

७४ व्या संविधान दिन सोहळा निमित्य आजऱ्यात मनुस्मृति या विषयावर प्रदीर्घ व्याख्यान.- नागरिकांनी लाभ घ्यावा.

७४ व्या संविधान दिन सोहळा निमित्य आजऱ्यात मनुस्मृति या विषयावर प्रदीर्घ व्याख्यान.- नागरिकांनी लाभ घ्यावा.

आजरा.- प्रतिनिधी.

२६ नोव्हेंबर, १९४९ या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान मा. जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन लोकसभेचे अध्यक्ष मा. राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भारत या राष्ट्राला स्वतःचे लिखित संविधान बहाल करण्याचे काम ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटना समितीने केले. २ वर्षे ११ महिने १८ दिवस इतका प्रदीर्घ काळ घेऊन जगातील सर्वोत्तम लिखित संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्या देशाला मिळाले.
या निमित्ताने आजरा येथील उर्दू हायस्कूल सभागृहात प्रमुख व्याख्याते प्राचार्य आनंद मेनसे व व प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे.
२६ जानेवारी १९५० रोजी प्रत्यक्ष अंमलात आलेल्या या संविधानाने आपल्या देशातील सर्व नागरिकांना राजकीय आर्थिक, सामाजिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा आणि धर्म उपासनेचे स्वातंत्र्य दिले. दर्जाची व संधीची समानता दिली. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता जोपासणाऱ्या बंधुत्वतेची हमी दिली. याच राज्यघटनेने गाव संरचनेपासून केंद्राची राजकीय संरचना न्याय व्यवस्था, सैनिकी आणि पोलीस यंत्रणा उभी केली. खऱ्या अर्थाने आजच्या आधुनिक भारताचा पाया संविधान हेच राहिले आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि इतर कल्याणकारी योजना, अनेक मुलभूत सोयी सुविधा आपल्या घरादारात पोहचल्या; त्या फक्त आणि फक्त संविधानामुळेच…
…!

आज हे कल्याणकारी संविधान धोक्यात आहे म्हणून संविधानाला मानणाऱ्या आणि आरक्षित संरक्षित झालेल्या सर्वच मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, इतरमागासगर्वीय, मुस्लीम, ख्रिश्चन, लिंगायत, बौध्द आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांक अशा सर्वच स्त्री-पुरूषांना हे आवाहन करण्यात येते की, संविधानाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवार दि. २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित संविधान दिन या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा आणि संविधान वाचविण्याच्या लढाईचा भाग व्हा…… !
संविधान की मनुस्मृती या विषयावर

संविधान दिन सोहळा निमंत्रक –

वंचित बहुजन युवा आघाडी, सेक्युलर मुव्हमेंट, भारतीय बौध्द महासभा, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, श्रमिक मुक्ती दल ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीमिन (एमआयएम), कास्ट्राईब कर्मचारी संघटना, दलित मानवी हक्क संरक्षक संघटना, मुक्ती संघर्ष समिती बहुजन मुक्ती पार्टी, वंचित बहुजन महिला आघाडी, फुले-शाहू-आंबेडकर संविधान संर्वधन विचार मंच, शाळा बचाव कृती समिती, सर्व श्रमिक संघ
सर्व संविधानवादी पक्ष व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते, आजरा तालुका

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.