HomeUncategorizedभगवान श्रीकार्तिकस्वामी दर्शन यात्रा, आजरा - निंगुडगे. सोमवार दि. २७ नोव्हेंबर २०२३...

भगवान श्रीकार्तिकस्वामी दर्शन यात्रा, आजरा – निंगुडगे. सोमवार दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात होणार साजरी.

भगवान श्रीकार्तिकस्वामी दर्शन यात्रा, आजरा – निंगुडगे. सोमवार दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात होणार साजरी.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील निगुडगे येथे सोमवार दि. २७ नोव्हेबर २०२३ रोजी, कृत्तिका नक्षत्र पर्वणीयोगावर मुहूर्त – सूर्योदयाच्यापूर्वी पहाटे ५ वाजलेपासून दर्शन शुभारंभ होत असून दुपारी ०१.३५ वाजेपर्यंत दर्शनाचा सुमंगल पर्वणीकाळ आहे. तरी भगवान श्रीकार्तिकस्वामींचे दर्शन घ्या ! आपल्या इच्छा पूर्ण होतील असे आवाहन समस्त भक्तांना निमगुडगे ग्रामस्थांनी केले आहे.

भगवान श्रीकार्तिकस्वामी निंगुडगे.
स्थळ : दक्षिण काशीतील अतिपुरातन भगवान श्रीकार्तिकस्वामीचे देवस्थान मौजे निंगुडगे, ता. आजरा.

धर्मशास्त्र निर्णयः-
कार्तिक्यां कृत्तिकायोगे यः कुर्यात्स्वामिदर्शनम् । सप्तजन्मभर्वद् विप्रो धनाढ्यो वेदपारगः ।।
इति कार्तिकेय दर्शनमुक्तं श्रीस्कंदपुराणे काशीखंडे ।
भावार्थ: – कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्राचा योग असताना जे मानव अर्थात स्त्री, पुरुष तथा ऋषिमुनी, तपस्वी, योगी, योगिनी व देवाधिदेव आदी भगवान श्रीकार्तिकस्वामींचे दर्शन घेतात, ते सात जन्मांपर्यंत धनवान व वेद जाणणारे विद्यान (ज्ञानी) होतात; असे श्रीस्कंदपुराणांतर्गत काशीखंडात सांगितले आहे.

तरी भाविकांनी विशेषतः – स्त्रियांनीही दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा व पुण्य संपादन करावे, वर्षातून फक्त एकदाच ह्या दुर्मिळ पर्वणीयोगावर स्त्रिया श्रद्धापूर्वक भक्तिभावाने दर्शन घेतात.

मनोभावी दर्शनाचे लाभ. –

भगवान श्रीकार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यास, धंदा-व्यवसाय व व्यापारात भरभराट होईल. सकल धनदौलत- पैसा अडका तथा लक्ष्मी-ऐश्वर्याची प्राप्ती होईल. परीक्षेत यश मिळेल. समाजसेवकांचे मनोरथ पूर्ण होईल.

फलश्रुती :- वरील दिवशी दर्शन घेतल्यास, अनन्य साधारण लाभ होतो; अन्यथा नाही. असे शास्त्रवचन आहे. स्त्री-पुरुषांनी

भक्तिभावाने भगवान श्रीकार्तिकस्वामींचे दर्शन घेऊन त्यांची करुणा भाकल्यास तथा प्रतिवर्षी दर्शनाचा लाभ घेतल्यास, तुमच्या
आर्थिक परिस्थितीत लक्षणीय वाढ होत राहील. लक्ष्मी म्हणजे पैसा मिळविण्याचे विपुल मार्ग तुम्हांस मिळतील. जुने येणे, उधारी

वसूल होईल. कर्ज फिटेल, न्यायालयातील निर्णय तुमच्या बाजूने लागतील. अकारण अडलेले प्रमोशन मिळेल, योग्य ठिकाणी

बदली-बढती मिळेल. परीक्षेत सुयश मिळेल. निवडणुकीत यथाशक्य विजय प्राप्त होईल, धंदा व्यवसाय, व्यापारात बरकत येईल; हाती पैसा खेळू लागेल. वर्षभर यथाशक्ती सत्पात्री दानधर्म करावा.

विशेषतः वरील दुर्मिळ पर्वणीयोगावर स्त्रियांनी भगवान श्रीकार्तिकस्वामींचे दर्शन अवश्य प्यावे: पुढे वर्षभर ह्या दर्शनाचा चांगला स्वानुभव येईल. पत्नी समवेत पुरुषांनी दर्शन घ्यावे: सर्वप्रकारे भरभराट होईल. समाधान मिळेल. सर्व मनोरथ पूर्ण होतील.

महाप्रसादाचे आयोजन.-

दासोह- महाप्रसाद-अन्नदान : सोमवार दि. २७ नोव्हेंबर, २०१३ रोजी सकाळी ९ वाजलेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसाद चालू राहील. ह्यात आपणही सहभागी होऊन अन्नदानाचे महापुण्य संपादन करावे. यथाशक्ती आर्थिक-धन-धान्य वगैरे वस्तुस्वरूपात दान करून अन्नछत्राचे कार्य वृद्धिंगत करावे.

दर्शनयोग पर्वणी कालात, श्रीशिवलीलामृत ग्रंथातील तेराव्या अध्यायाचे पारायण करावे. अष्टकस्त्रोत, प्रज्ञावर्धनस्त्रोत्र पठण करावे. भगवान श्रीकार्तिकस्वार्मीना, गुलाबाची पांढरी फुले, पांढऱ्या फुलांचा हार, श्रीफळ, पांढरे तीळ अर्पण करावेत.
पांढरे पेढे, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
संयोजक समस्त ग्रामस्थ मौजे निंगुडगे, ता. आजरा. यांनी भाविक भक्तांनी शांततापूर्वक दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.