Homeकोंकण - ठाणेआजरा कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी. - हीच भूमिका.- शिंपी / चराटी गट..(...

आजरा कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी. – हीच भूमिका.- शिंपी / चराटी गट..( पत्रकार परिषदेत दिली माहिती. )

आजरा कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी. – हीच भूमिका.- शिंपी / चराटी गट..( पत्रकार परिषदेत दिली माहिती. )

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ही शिंपी व चरटी गटाची भूमिका स्पष्ट आहे. याबाबत शनिवार दि २५ रोजी पत्रकार परिषदेत दोन्ही गटाच्या नेतेमंडळी यांनी माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक मलिककुमार बुरुड यांनी केले यावेळी बोलताना अशोक चराटी म्हणाले आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध बाबत वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या भेटीगाठी चालू आहेत. सद्यस्थितीला चराटी गटाच्या नऊ जागा आहेत. व शिंपी गटाच्या तीन जागा असा एकूण बारा जागा आमच्या दोन्ही गटाच्या असून आम्हाला बिनविरोध मध्ये समाधानकारक जागा दिल्यास आम्ही देखील कारखान्याच्या हितासाठी एक पाय मागे येणार आहोत. याबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचा आम्ही आदर करतो परंतु आमच्या भावनेचा देखील विचार व्हावा. कारखाना बिनविरोध बाबत आम्ही उमेदवारांचे अगोदरच आमच्या दोन्ही गटाच्या एकूण सर्वच उमेदवारांचे माघारीचे अर्ज अगोदरच घेतले आहेत. वरिष्ठ नेते मंडळी यामध्ये नाम. हसन मुश्रीफ, आम. सतेज पाटील, खास. संजय मंडलिक, धनंजय महाडिक, आम. विनय कोरे ( सावकार ), प्रकाश आबिटकर, राजेश पाटील यांच्याशी चर्चा चालू आहे कारखाना आर्थिक अडचणीत आहे यामुळे पुन्हा निवडणुकीचा आर्थिक बोजा पडून पुन्हा कारखाना अडचण येऊ नये अशी आमच्या दोन्ही गटाची भूमिका आहे परंतु आम्हाला देखील समाधानकारक जागा दिल्या पाहिजेत सत्य स्थितीच्या जागा पाहता यानुसार जागावाटप व्हावा व कारखाना बिनविरोध व्हावा परंतु होऊ घातलेल्या निवडणुकीतील संचालक मंडळ हे एक विचाराचे असायला हवं चालू वर्षातील हंगाम अडचणीचा जाणार आहे. यामध्ये अधिक क्रसिंग झाले पाहिजेत सध्या १४२ कोटी कर्ज आहे. यामध्ये निवडणूक लागल्यास पुन्हा ८० ते ९० लाख रुपये कर्ज होईल व कारखान्याच्या कर्जामध्ये अधिक वाढ होईल यासाठी कारखाना कसा बिनविरोध होईल याकडेच आमचे सर्व लक्ष आहे. आमच्या दोन्ही गटातील उमेदवारांची माघार घेण्याची जबाबदारी आमची राहील परंतु एक विचाराची लोक जर संचालक मंडळात नसतील तर दुफळी निर्माण होऊ शकते व याचा फटका कारखान्याला बसतो.
त्यामुळे कारखाना बिनविरोध करण्यास आमच्या दोन्ही गटाची तयारी असल्याचे शिंपी व चराटी गटांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत दशरथ अमृते उपस्थित होते दिगंबर देसाई यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.