अखिल भारतीय जनहित पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कोरवी उर्फ (कोरे ) यांची निवड.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर यल्लाप्पा कोरवी त्यांची अखिल भारतीय जनहित पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्ती अखिल भारतीय जनहित पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत श्री कोरवी यांना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याचे ठरले त्या अनुषंगाने श्री कोरवी यांची राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णा पाटील व महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष अमित चव्हाण यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री कोरवी यांनी यापूर्वी शिवसेना, मनसे या पक्षाच्या विविध पदावर काम केले आहे. त्यामुळे त्यांची ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या व चांगली पकड आहे. श्री कोरवी यांची या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
