HomeUncategorizedआजरा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी ज्यादा करवाढ भरू नये आजरा नगरपंचायत माजी सर्व...

आजरा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी ज्यादा करवाढ भरू नये आजरा नगरपंचायत माजी सर्व नगरसेवक यांचे नागरिकांना आवाहन. 🛑 आजरा तालुका संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन ग्रामसेवक संघटनेना निवेदन आजरा तालुका बैठकीत निर्णय.

आजरा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी ज्यादा करवाढ भरू नये आजरा नगरपंचायत माजी सर्व नगरसेवक यांचे नागरिकांना आवाहन. 🛑 आजरा तालुका संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन ग्रामसेवक संघटनेना निवेदन आजरा तालुका बैठकीत निर्णय.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत, आजरा यांनी आपल्या मालकीच्या इमारतीवर, खुले भूखंड अथवा भाडेकरूकडून घेण्यात येणाऱ्या भाड्यावर मालमत्तेची जागेवर मोजणी व तपासणी करून कर आकारणी प्रस्तावित केली आहे. याबाबतीत इमारतीचे किंवा जागेचे भांडवली मूल्य नगरपंचायत, यांनी नोटीस जारी केले व नागरिक संतप्त झाले या अनुषंगाने आजरा रहिवासी यांनी आजरा नगरपंचायतवर मोर्चा काढून वाढीव करवाढीचा जाब विचारला व सदर कारवाढ कोणत्या आधारे केली तसेच या करवाढीच्या ठरावासाठी कोणते नगरसेवक सूचक व अनुमोदक आहेत. याबाबत काही नागरिकांनी जो प्रश्न उपस्थित केला. त्या अनुषंगाने आजरा नगरपंचायत चे सर्व माजी नगरसेवक यांनी शुक्रवार दि २४ पत्रकार परिषद घेऊन सूचक व अनुमोदक या संदर्भातली माहिती दिली. मुळात करवाढ बाबत कोणताही विषय मागील पाच वर्षात नगरपंचायत मासिक सभेत आलेला नाही. यामुळे सूचक व अनुमोदक हा विषय येतच नाही. तर भांडवली मूल्यांकन करण्यासाठी विषय होता. करवाडीचा विषय कधीच आला नसताना मग नगरसेवकावर आरोप कशासाठी मुळात आमचाच विरोध हा करवाढीसाठी आहे.यामुळे आजरा गावच्या व सद्याच्या शहराच्या इतिहासात ही पहिली व तीही इतक्या मोठ्या प्रमाणात सक्तीची कर वसुली वाढ करून जनतेवर अन्याय केला आहे. यामुळे स्थानिक रहिवासी इतक्या मोठ्या रकमेमुळे भयभीत झाले आहेत. याबाबत दिलेला आदेश रद्द करण्यात यावा व ही इतकी मोठी कर आकारणी कोणत्या आधारे कशी काय होऊ शकते याचा जाब आजरा नगरपंचायत नगरसेवक यांनी अधिकारी श्री चौगुले यांनी विचारत नागरिकांना पूर्वीप्रमाणे कर भरावा वाढीव कर भरू नये असे आवाहन आजरा रहिवासी यांना आजऱ्याचे सर्व माजी नगरसेवक यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत अशोक चराटी, विलास नाईक, संभाजी पाटील सिकंदर दरवाजकर, अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे, अभिषेक शिंपी सह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या श्री शिंपी यांनी आभार मानले.

आजरा तालुका संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ऑनलाईन ऑफलाइन काम बंदच राहणार संघटनेचा निर्णय


आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील संगणक परिचारक वतीने शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी संगणक परिचालक संघटना आजरा तालुका यांचेमार्फत रामतीर्थ आजरा येथे संपाबाबत पुढील रूपरेषा व संघटनेच्या पुढील नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित आजरा तालुका दोन्ही ग्रामसेवक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष अशोक सानप, उपाध्यक्ष संदीप चौगुले दुसऱ्या संघटनेचे अध्यक्ष सचिन गुरव, सहकारी दिग्विजय देसाई या सर्वांनी उपस्थित राहून आजरा तालुका संगणक परिचालक संघटनेला चांगले मार्गदर्शन केले. भुदरगड तालुका संगणक परिचालक संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तम मोरे तसेच संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष चंदगड तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संगणक परिचालक संघटना गडहिंग्लज चे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते. आजरा तालुका संघटनेचे अध्यक्ष अर्जुन मिसाळ , उपाध्यक्ष सूर्याजी पाटील, सचिव सुनील धडाम, खजिनदार नितेश पाटील त्याचबरोबर आजरा तालुक्यातील सर्व संगणक परिचालक दिपाली शिरगुपे, जयश्री पुंडपळ, सरिता पाटील, अनिता ढोणूक्षे, स्मिता कांबळे,सुरेखा मगदूम, प्राजक्ता फगरे, शारदा गुरव, नीता कबीर, श्रावण चौगुले, बावतीस बारदेसकर, संभाजी पाटील, सचिन इलगे, महादेव बेंदके, बाळू कुंभार , संदीप भगूत्रे, प्रेमानंद पोवार, भरत पाटील, गोकुळ तेजम, सुधीर फडके, संदीप सरोळकर, शरद बोटे, सारिका संकपाळ इत्यादी सर्व उपस्थित होते. यावेळी आजरा तालुका दोन्ही ग्रामसेवक संघटना यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. शासनाने आजपर्यंत आश्वासने दिली आहेत पण कार्यवाही कोणत्याही प्रकारची झाली नाही.जोपर्यंत शासनाकडून संघटनेच्या मागण्या मान्य केला जात नाही व ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तालुक्यातील सर्व संगणक परिचालक आपले ऑनलाइन व ऑफलाईन कामकाज पूर्णपणे बंद राहील असा निर्णय संगणक परिचालक संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.