HomeUncategorizedश्री सरस्वती वाचनालयास "आदर्श वाचनालय "पुरस्कार प्रदान. / पाटबंधारे खात्याच्या मीटर सक्ती...

श्री सरस्वती वाचनालयास “आदर्श वाचनालय “पुरस्कार प्रदान. / पाटबंधारे खात्याच्या मीटर सक्ती आणि अन्यायी पाणी पट्टी वाढ निर्णयाविरोधात सोमवारी किसान भवन आजरा येथे व्यापक बैठक

🛑श्री सरस्वती वाचनालयास “आदर्श वाचनालय “पुरस्कार प्रदान.

आजरा.- प्रतिनिधी.

🛑स्व. राजारामबापू देसाई यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्य श्री सरस्वती वाचनालय व सांस्कृतिक मंडळ, मडिलगे ता. आजरा या ग्रंथालयास स्व. राजारामबापू देसाई फौन्डेषन, आजरा यांचे मार्फत ” आदर्श वाचनालय “पुरस्कार वितरण मा. प्राचार्य डॉ. यशवंत संभाजीराव पाटणे (साहित्यिक) अध्यक्ष, पुणे विभाग ग्रंथालय संघ यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले !!

🛑सदरचा पुरस्कार वाचनालयाचे अध्यक्ष जनार्दन नेऊन्गरे, कार्यवाह एम. डी. पाटील, उपाध्यक्ष विजय परुळेकर, खजिनदार राजेंद्र कुंभार, संचालक रघुनाथ येसणे, आनंदा कडगांकर, जनार्दन पाटील, गणपती आयवाळे, दत्तात्रय देसाई, संचालिका सुमित्रा येसणे, सुवर्णा पवार, वाचनालयाचे ग्रंथपाल सुर्यकांत चोडणकर, सहाय्यक ग्रंथपाल मारुती मोहिते, लिपिक सुदर्शन चोडणकर, शिपाई जोतीबा निऊन्गरे, यांचे उपस्थितीत शाल, आदर्श वाचनालय शिल्ड व मानपत्र देऊन वाचनालयाचा सत्कार करण्यात आला !! वाचनालय इतर “अ” वर्गामध्ये असून, वाचनालयात २४,६०० इतकी ग्रंथ संपदा आहे.

वाचनालयात दैनिके १९, साप्ताहिके १२, पाक्षिके ५, मासिके ६५ नियमितपणे येतात. वाचनालयात सर्व

प्रकारची पुस्तके असून, स्पर्धा परीक्षेतील पुस्तकांचा मडिलगे गांवचे विध्यार्थी लाभ घेत असून, नुकताच

विनायक वजरेकर हा विध्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने

उत्तीर्ण झाला आहे. व त्याची मंत्रालयातील महसुलपदी निवड झालेली आहे. कांही विध्यार्थी

बी.एस.एफमध्ये देश सेवेत रुजू झालेली आहेत. मराठी शाळेतील अनेक विध्यार्थी विविध परीक्षेत

राज्यातून, जिल्ह्यातून आघाडीवर आहेत. परंतु आतापर्यंत एकही विध्यार्थी क्लासवन अधिकारी किंवा 🛑मोठ्या हुध्यावर का जात नाही. ही चिंतनाची बाब होती. ती विनायक वजरेकर याना मिळालेल्या उत्तुंग यशातून दूर झाली. वाचनालयाच्या माध्यमातून अनेक विध्यार्थ्यांची स्वप्ने सत्यात उतरत आहेत. सदरची

🛑बाब ही “मडिलगे ” गांवास अभिमानास्पद आहे !!

वाचनालयाचे कार्यवाह एम. डी. पाटील यांनी वाचनालयास पुरस्कार वितरीत केल्याबद्दल स्व. राजारामबापू देसाई फौन्डेशन आजरा चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य व सयोन्जक यांचे मनापासून आभार मानले.

🛑पाटबंधारे खात्याच्या मीटर सक्ती आणि अन्यायी पाणी पट्टी वाढ निर्णयाविरोधात सोमवारी किसान भवन आजरा येथे व्यापक बैठक.

आजरा-प्रतिनिधी.

महाराष्ट्रातील पाणी उपसा करणाऱ्या सहकारी व खाजगी पंप धारकांना मीटर बसवण्याची सक्ती केली असून पाणीपट्टीत अन्यायी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विचार करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवार दि २७ नोव्हेंबर रोजी किसान भवन आजरा येथे तालुक्यातील मोटरपम्प धारक शेतकऱ्यांची व्यापक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. महाराष्ट्र जलनियमन प्राधिकरणाने अचानक प्रचंड अशी अन्यायी पाणीपट्टी वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे विजेचे वाढते दर त्यात मोटारपंपाला वॉटर मीटर (जलमापक) बसविण्याची सक्ती केली आहे. जलमापक (वॉटर मीटर) न बसवल्यास पाणीपट्टी तीन ते चार पट जादा आकारली जाणार आहे. याबाबत आवाज उठवण्यासाठी सर्व मोटर पंप धारकांना सोमवारी ठीक ११ वाजता किसान भवन येथे जमावे असे आवाहन संपत देसाई, संजय तरडेकर, दशरथ घुरे, भीमराव माधव, सयाजी कोडक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.