बुलडाणा अर्बन मॅनेजमेंट सर्विसेस प्रा. लि. कंपनीच्या वसूली अधिकाऱ्यांना .- कर्जदारकडुन धमकी आजरा पोलिसात गुन्हा नोंद.
आजरा.- प्रतिनिधी.

बुलडाणा अर्बन मॅनेजमेंट सर्विसेस प्रा. लि. कंपनीकडे कोल्हापूर जिल्हयाकरीता वसूली अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या
सौ. सुजाता अरुण मिसाळ, वय-55
सदर कंपनीकडील कर्जदार यांचकेडून थकीत कर्ज वसूली करणेचे काम तसेच कंपनीकडील सहकारी करीत असताना संबंधित अधिकारी फिर्यादी सौ मिसाळ यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे . दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
माहे सप्टेंबर २०२० मध्ये मुन्नी जावेद पटेल, रा पटेल कालनी आजरा यांनी सदर कंपनीकडून महिला बचत गट सदस्य म्हणून ३६,०००/- रूपये २४ महिन्याच्या मुदतीवर घेतले होते. सदर रकमेपैकी त्यांनी ५००/- रूपये इतकी रक्कम माहे जुलै २०२३ पर्यंत भरलेली असून उर्वरीत व्याजासह ४०,८१२/- रुपये रक्कम अदयापर्यंत भरलेली नसल्यामुळे
दि.१०/१०/२०२३ रोजी बुलडाणा बँकेचे केंद्रीय वसूली अधिकारी यांनी लेखी आदेश दिले वरून अतुल बाळकू कांबळे, वसूली अधिकारी यल्लाप्पा नाइक, ये.सी.एम. अमोघ काळे असे मुन्नी जावेद पटेल रा पटेल कॉलनी आजरा ता आजरा यांचेकडे कर्ज वसूलीकरीता गेलो. लो. त्यावेळी तेथे मुन्नी पटेल यांचे पती जावेद पटेल हे घरी होते त्यांना त्यांची पत्नी मुन्नी पटेल या घरात आहेत की अशी विचारणा केली असता जावेद पटेल यांनी ती घरात नाही, बाहेर गेली आहे. काय काम आहे ते सांगा असे बोलले. मी त्यांना कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कमेच्या परफेड करणेबाबत सांगून सदर कर्जात आम्ही आपणास सूट देवू आपण ते कर्ज भरा असे सांगितले. त्यावेळी जावेद पटेल यांनी आम्ही पैसे भरणार नाही। काय करायचे ते करा. असे म्हणून मला ” च्या आईचा”, “माझी कोण काय उपडायचे ते उपडा”, अशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांना मुन्नी पटेल या घरात आहेत का आम्ही स्वत बघतो असे म्हटल्यावर जावेद पटेल यानी दरवाजा ओढून घेवून म्हणाले की “दाराला हात लावून तर बघा तुम्हाला उभा चिरतो” असे म्हणून धमकी देवून माझेसह माझे सोबतचे कर्मचा-यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही तेथून निघून आलो. सदर घटनेचे केपनीचे कॅमेरा मधील व्हीडीओ मी तपास कामी आपणासमक्ष हजर करीत आहे. धमकी देवून माझेसह माझे सोबतचे कर्मचा-यांना शिवीगाळ केली. तरी माझी जावेद पटेल याचेविरुध्द तक्रार आहे. असे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याबाबत अधिक तपास आजरा पोलीस करत आहेत.
