दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी सणासुदीला येत असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त.- मनसे जनहित जिल्हाध्यक्षांचा आजरा नगरपंचायत अधिकाऱ्यांना इशारा.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहरातील रवळनाथ कॉलनीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले नवीन गटार व नव्याने सुरु असलेली नळ पाईपलाईनचे काम पूर्ण झाले,असून रहिवासी नागरिकांना ऐन दिवाळीत पिण्यायोग्य असे चांगले पाणी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी सणासुदीला येत असल्याने स्थानिक त्रस्त रहिवाशी यांनी मनसे जनहित जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी) यांच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले व कर निरीक्षक निहाल नाईकवाडी यांना घेराव घालून आजरा नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करत दुर्गंधीयुक्त दूषित पाणी भेट दिले. येत्या ३-४ दिवसांत पिण्यासाठी योग्य अश्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास आजरा नगरपंचायतसमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण त्रस्त स्थानिक नागरिकांसह सुरू करणार असल्याचा इशारा मनसे जनहित जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी) यांनी प्रशासनास दिला.यावेळी स्थानिक रहिवासी श्री.आजगेकर, मेजर जाधव, श्री. सावरकर,अशोक गाईंगडे,विश्वास हेरेकर, मनीष टोपले व मराठा प्रतिष्ठानचे सतीश बामणे,अतुल पाटील,सुभाष कांबळे,रवी कांबळे उपस्थित होते.




