HomeUncategorizedराधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये अडसाली व पुर्व हंगामी ऊस एकरी ६० टन...

राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये अडसाली व पुर्व हंगामी ऊस एकरी ६० टन उत्पादकता वाढ टप्पा-२ स्पर्धेचे आयोजन : आमदार प्रकाश आबिटकर

राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये अडसाली व पुर्व हंगामी ऊस एकरी ६० टन उत्पादकता वाढ टप्पा-२ स्पर्धेचे आयोजन : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी


स्वर्गीय सुशिलादेवी आनंदराव आबिटकर ॲग्रीकल्चर फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने राधानगरी विधानसभा मतदार संघातील राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील शेतकरी बांधवांकरीता अडसाली व पुर्व हंगामी / सुरू ऊसाकरीता एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ टप्पा-२ अभियानाची सुरवात केली असून जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राधानगरी विधानसभा मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकरी बांधकवांना प्रोत्साहन मिळावे याकरीता स्वर्गीय सुशिलादेवी आनंदराव आबिटकर ॲग्रीकल्चर फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ मोहिमेचे आयोजन मागील वर्षापासून करण्यात येत आहे. एकरी ६० टन ऊस उत्पादकता मोहिमेच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात जनजागृती करुन शेती क्षेत्राशी संबंधित सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. यामध्ये राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांकरीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यासाठी वेगवेगळी स्पर्धा असणार आहे. तसेच कमीत-कमी १० गुंठे क्षेत्र असावे. सदरचा शेतकरी ७/१२ धारक असावा अशा अटी आहेत.

यामध्ये पुर्व हंगामी/सुरु ऊसाकरीता प्रथम क्रमांक २५ हजार, व्दितीय क्रमांक १५ हजार, तृतीय क्रमांक ११ हजार व उत्तेजनार्थ ७ हजार असे बक्षिस देण्यात येणार आहे.

तसेच अडसाली ऊसकरीता प्रथम क्रमांक ११ हजार, व्दितीय क्रमांक ७ हजार, तृतीय क्रमांक ५ हजार असे बक्षिसे देण्यात येणार असून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक यांचेकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.