HomeUncategorizedभारताने सेमी फायनलच्या विजयाचा रचला भक्कम पाया.- कोहली - श्रेयसच्या शतकाने धावांचा...

भारताने सेमी फायनलच्या विजयाचा रचला भक्कम पाया.- कोहली – श्रेयसच्या शतकाने धावांचा डोंगर( टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा. ) 🟥व्हॉट्सॲपचं नवं फिचर लाँच!ग्रुपबरोबर करता येणार व्हॉईस चॅट.

भारताने सेमी फायनलच्या विजयाचा रचला भक्कम पाया.- कोहली – श्रेयसच्या शतकाने धावांचा डोंगर
( टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा. ) 🟥व्हॉट्सॲपचं नवं फिचर लाँच!ग्रुपबरोबर करता येणार व्हॉईस चॅट.

मुंबई :- प्रतिनिधी.

विराट कोहलीचे महाशतक आणि श्रेयस अय्यसच्या शतकांच्या जोरावर भारताने सेमी फायनच्या विजयाचा भक्कम पाया रचला आहे. कोहलीने यावेळी आपेल ५० वे शतक साजरे करत सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. कोहली बाद झाल्यावर श्रेयसने आपेल शतक साजरे केले. त्यामुळेच भारताने या सामन्यात धावांचा डोंगर रचला आणि त्यामुळे त्यांनी विजयाचा पाया रचल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी ११३ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ११७ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. श्रेयसने यावेळी ७० चेंडूंत १०५ धावांची धमाकेदार शतकी खेळी साकारली. भारताने यावेळी ३९७ धावा करत विजयाचा पाया रचला.

रोहित टॉस जिंकत प्रथम फलंदाजीला आला आणि त्याने एकामागून एक फटक्यांची अतिषबाजी केली. रोहीतने यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासून कडक प्रहार करायला सुरुवात केली. घरच्या मैदानावर फक्त २९ चेंडूत ४७ धावा केल्या. मात्र स्पर्धेतील चौथे अर्धशतक त्याला पूर्ण करता आले नाहीत. मीड ऑफच्या दिशेने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात टिम साउदीच्या चेंडूवर तो बाद झाला. रोहितने या खेळीत ४ चौकार आणि चार षटकार मारले. घरच्या मैदानावर फक्त २९ चेंडूत ४७ धावा केल्या. मात्र स्पर्धेतील चौथे अर्धशतक त्याला पूर्ण करता आले नाहीत. मीड ऑफच्या दिशेने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात टिम साउदीच्या चेंडूवर तो बाद झाला. रोहितने या खेळीत ४ चौकार आणि चार षटकार मारले. इतकेच नाही तर रोहितने एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा गेलचा विक्रम मोडला. गेलने २०१५च्या वर्ल्डकपमध्ये २६ षटकार मारले होते.

आता रोहितच्या नावावर २७ षटकार झाले आहेत. २३व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुभमन रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. मुंबईत प्रचंड उकाडा असून फार वारा देखील नाही. गिलच्या मदतीला फिजिओ मैदानात आले होते. मात्र फिजिओसोबत चर्चा करून गिलने मैदान सोडले. गिलने ६५ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकारांसह ७९ धावा केल्या. गिल मैदानाबाहेर गेल्यावर फलंदाजीला आलेल्या श्रेयसने यावेळी शतक झळकावले. त्यामुळेच भारताला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली.तर कोहली आणि श्रेयस यांच्या शतकांच्या जोरावर भारताने या सामन्यात न्यूझीलंडपुढे विजयासाठी ३९८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

🟥व्हॉट्सॲपचं नवं फिचर लाँच!ग्रुपबरोबर करता येणार व्हॉईस चॅट.

मुंबई – प्रतिनिधी.

व्हाॅट्सॲप एक सोशल मीडिआ प्लॅटफॉर्म; ज्यामुळे घरबसल्या एकमेकांना संदेश पाठवणं, लांबच्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधणं, घरबसल्या स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ आवडत्या व्यक्तीला पाठवणं, तसेच कामासंबंधित अनेक गोष्टी करणे शक्य होते.

🟥👉मेटाच्या मालकीचा असणारा व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या युजर्सना नवनवीन फिचर्स, इंटरेस्टिंग अपडेट लाँच करून देत असतो. आतापर्यंत आपण सगळ्यांनी ग्रुप चॅट, ग्रुप व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉलिंग अशा वेगवेगळ्या फिचर्सचा अनुभव घेतला. पण, आता सगळ्यांना ‘ग्रुप व्हॉईस चॅट’ या नव्या फिचरचासुद्धा अनुभव घेता येणार आहे. मेटाने (Meta) ‘ग्रुप व्हॉईस चॅट ‘Voice Chat With Large Group’ लाँच केला आहे. या फिचरमध्ये तुम्ही ग्रुपमधल्या सदस्यांशी लाईव्ह संवाद साधू शकता. तसेच या ग्रुप व्हॉईस चॅटमध्ये ३३ ते १२८ जण एकत्र संवाद साधू शकतात.

🛑व्हाट्सॲपच्या अधिकृत एक्स (ट्विटर) वर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मेटा मालकीचे मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ ग्रुप संवादासाठी सोईस्कर ग्रुप व्हॉईस चॅट फिचर लाँच करण्यासाठी तयार आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. ‘व्हॉईस मेसेज’ हा फिचर आधीपासून होताच, पण ‘ग्रुप व्हॉईस चॅट’ फिचरचा अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. यामध्ये तुम्ही एकापेक्षा अनेक लोकांशी आवाजाच्या मदतीने लाईव्ह संवाद साधू शकणार आहात.

ग्रुप वॉईज चॅट कसे सुरू कराल ?

🔺१. ज्या ग्रुपबरोबर तुम्हाला ‘व्हॉईस चॅट’ करायचे आहे, तो ग्रुप ओपन करा.
🔺२. त्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक वेव आयकॉन
(Wave Icon) दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा.
🔺३. मग ‘व्हॉईसचॅट’ यावर क्लिक करा. त्यानंतर ग्रुप वॉईज चॅट सुरू होईल.
४. तसेच व्हॉईस चॅटमधून बाहेर पडण्यासाठी एक्सवर (X) क्लिक करा

यात ३२ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात. ग्रुप व्हॉईस चॅट फिचर प्रत्येक ग्रुपसाठी शक्य असणार आहे. या फिचरमुळे कोणालाही पर्सनल कॉल न करता एकाचवेळी तुम्ही अनेकांशी लाईव्ह संवाद साधू शकता, बोलू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.