आजरा नगरपंचायतच्या नव्या कराने आजरा वासियांना दिवाळीच्या तोंडावर धडकी.- आजरा शहरातील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात
आजरा. – संभाजी जाधव.
आजरा नगरपंचायत, आजरा यांनी आपल्या मालकीच्या इमारतीवर, खुले भूखंड अथवा भाडेकरूकडून घेण्यात येणाऱ्या भाड्यावर मालमत्तेची जागेवर मोजणी व तपासणी करून कर आकारणी प्रस्तावित केली आहे. याबाबतीत इमारतीचे किंवा जागेचे भांडवली मूल्य (Capital value) अथवा करआकारणी मध्ये (Assessment) तसेच नावात काही चुक असल्यास, त्याबाबत आपली कोणतीही तक्रार, हरकत असल्यास, सदर कारणे नमूद करून योग्य / सक्षम पुराव्यासह ती लेखी मा. मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत, आजरा यांचेकडे, यादीचे जाहीर प्रकाशन केलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत आजरा नगरपंचायत, आजरा येथे द्यावी, व त्याची पोचपावती घ्यावी.

वरील मुदतीत आपल्याकडून विधिग्राह्य लेखी हरकत अर्ज प्राप्त न झाल्यास, प्रस्तावित केलेली कर आकारणी आपणास मंजूर आहे असे समजण्यात येवून यापुढे आपली याबाबत कोणतीही तक्रार दाखल करून घेण्यात येणार नाही. किवा ऐकली जाणार नाही, आपले नावे नगरपंचायतद्वारा केलेली प्रस्तावित कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
वरील वर्षाकरीता केलेली कर आकारणी पाहावयाची असल्यास आपणास किंवा आपण नियुक्त केलेल्या अभिकर्त्यास कार्यालयीन वेळेत स्वतःच्या मालकीचे इमारत व जागेवरील करआकारणी चा तपशील नगरपंचायत कार्यालयात कर संग्राहकाकडे कार्यालयीन वेळेत पाहावयास मिळेल, तसेच कारण व पुराव्यासहित विधिग्राह्य लेखी आक्षेप अर्ज विहीत नमुन्यात कार्यालयीन वेळेत स्विकारले जाणार आहेत..

अनाधिकृत बांधकामांना मालमत्ता कराची आकारणी केल्यामुळे अनाधिकृत बांधकाम नियमित झाले असे समजण्यात येऊ नये, मालमत्ता कराच्या आकारणीमुळे नगरपंचायत कायद्याने असलेल्या अनाधिकृत बांधकामाविरुद्ध करावयाच्या कायदेशीर कार्यवाहीस किंवा हक्कास कोणतीही बाधा येत नाही.
सन २०२३-२४ व त्यापुढे सुधारित करआकारणी नुसार बिले देण्यात येणार आहेत.
मालमत्तेच्या मोजमापात व वापरात बदल आढळून आल्यास त्यानुसार कर आकारणीत बदल होऊ शकतो.
उपरोक्त मालमत्तेचा मालकी हक्क शासकीय जमिन, इमला, नझुल, सरकारी जागा इ. असल्यास मालमत्ता धारकाचे नाव भोगवटादार म्हणुन संबोधण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे मालमत्तेच्या मालकी हक्काच्या नोंदीत मालमत्ता सर्व्हेक्षणाच्या नोंदीत अथवा करमुल्यनिर्धारणात कुठलीही त्रुटी असल्यास, कुठलीही पूर्व सुचना न देता दुरुस्ती करण्याचे अधिकार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १२३ अन्वये मुख्याधिकारी यांच्या द्वारे राखून ठेवण्यात येत आहे.

सदर देयकातील मालमत्ता धारकाचे नाव व भोगवटादाराचे नाव हे केवळ प्रस्तावित कर आकारणी करिता मर्यादीत असुन यास मालकी हक्का संबधातील पुरावा अथवा दस्त म्हणुन गृहीत धरु नये.
सदर नोटिस मध्ये मानवी अथवा संगणकीय चूका असल्यास सुधारित नोटीस देण्याचे अधिकार राखून वरील नोटिस बजावण्यात येत आहे.
(टीप – मालमत्ता धारकाच्या नावात बदल किवा त्रुटी असल्यास लेखी अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्र जोडावेत.)
खरेदीखत नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे
१) सिटी सर्वे /सात-बारा उतारा झेरॉक्स २) ५रु कोर्ट फी तिकीट ३) इंडेक्स-२ झेरॉक्स ४) हमीपत्र (फ्लॅट धारकांसाठी) ५) सोसायटीचे प्रमाणपत्र व नकाशा ६) खरेदी खताचे दोन प्रत ७) कर भरलेली पावती ८) या नोटिसची झेरॉक्स, सर्व कागदपत्रे दोन प्रतीत / सत्यप्रत, कोणतेही कागदपत्र नोटरी चालणार
नाही.

अशा आशयाची नोटीस आजारा शहरातील जागा मालक रहिवासी यांना देण्यात आली आहे यामुळे आजरा गावच्या व सध्याच्या शहराच्या इतिहासात ही पहिली करा मध्ये इतकी मोठी वाढ झाली आहे.

यामुळे येथील स्थानिक रहिवासी इतक्या मोठ्या रकमेमुळे भयभीत झाले आहेत व ही इतकी मोठी कर आकारणी कोणत्या आधारे कशी काय होऊ शकते याचा जाब आजरा नगरपंचायत यांना विचारण्यात येणार असल्याचे व आजरा शहरात याबाबत मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. पण आवाज उठवायचा कोणी याबाबतची संभ्रमावस्था दिसत आहे पण नक्कीच आजरा शहरातील तरुण पिढी आजरा नगरपंचायतला घेरावा घालणार हे मात्र निश्चित. परंतु अद्यापही आजरा नगरपंचायत मधील माजी लोकप्रतिनिधी शांतच का? येणाऱ्या नगरपंचायत च्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये मतदारांसमोर
जायचं असेल तर मोठ्या प्रमाणात होत असलेली करवाढ ही थांबवण्यासाठी पुढे आले पाहिजेत अशी आजरा शहरातील नागरिकांचे मत आहे.
आजरा नगरपंचायत चे नवीन कर
वृक्ष कर रू – ३४७
रोजगार हमी कर- ३४७
घन कचरा संकलन शुल्क- ३६०
शिक्षण कर रू.३४७
एकूण कर रू.५७८४/ ८४५५ (संकलीत कर रू.) असा आहे.
