🛑अशोक चराटी यांनी अण्णा – भाऊंच्या मागे संस्था चालवुन जनतेमध्ये विश्वास संपादन केला आहे. – माजी मंत्री भरमुआण्णा पाटील.
( अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा ६६ वा वाढदिवस उत्साहात संपन्न.)
🛑जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ऊस दराबाबत चालू असलेल्या आंदोलनात तोडगा काढावा.- सरपंच परिषद मुंबईची पालकमंत्र्यांना निवेदनाने मागणी
आजरा. – प्रतिनिधी.

अशोक चराटी यांनी अण्णा – भाऊंच्या मागे संस्था समुह चांगल्या पध्दतीने चालवुन जनतेमध्ये विश्वास संपादन केला. असल्याचे मत अण्णा – भाऊ संस्था समूह समितीच्या वतीने अशोक चराटी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री भरमुआण्णा पाटील म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक विजयकुमार पाटील यांनी केले. माजी मंत्री श्री पाटील बोलताना पुढे म्हणाले अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख श्री चराटी यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती व काम करण्याची वृत्ती आहे. कारण भरमु पाटील आमदार झाले ते अशोक चराटी यांच्या धाडसामुळे परंतु काही गोष्टी मनात त ठेवायला पाहिजे त्या उघडपणे व्यासपीठावर बोलायच्या नसतात परंतु त्यांना प्रकटपणे तोंडावर बोलायची सवय आहे. कारण त्यांनी लोकांच्या मध्ये विश्वास संपादन केला आहे परंतु कमी बोलून यापेक्षा अधिक विश्वास संपादन करावा असाही त्यांनी उपरात्मक सल्ला दिला.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात संस्थेचा वटवृक्ष करणारे व अर्थकारण, शैक्षणीकरण व सामाजिक कार्यात अग्रेसर सामान्य माणसासाठी झुकून काम करणारे म्हणजे अशोक चराटी. आजरा नगरपंचायत च्या माध्यमातून आजरा शहराचा विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. यापुढेही त्यांना आमचे सहकार्य नेहमीच राहील मतदारसंघात विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे बोलताना आमदार श्री आबिटकर म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले अण्णाभाऊ संस्था समूहाच्या संस्था वाढीमध्ये वाटचाली चालूच आहे येणाऱ्या काही दिवसात बेळगुंदी, बेळगाव, कल्याण मुंबई व साने गुरुजी फुलेवाडी या ठिकाणी संस्थेच्या नवीन शाखेला लवकरच मान्यता मिळेल व सभासदांच्या सेवेत चालू करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संचालक यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. राज्यातील सर्व सूतगिरण्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा तारुण्यात येतील अनेक वेळा मुंबईच्या वाऱ्या करत व अपमान सहन करत सूतगिरण्यात टिकल्या पाहिजे यासाठी प्रयत्न केला आहे. आपण जर भविष्यात अपमान सहन करण्याची ताकद ठेवल्यास अशक्य अशी कोणती गोष्ट नाही. चांगल्या कामासाठी वेळ लागतो पण उशिरा का असेना यश हे नक्की मिळते. आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हणाले माझा अनेक वेळा काही कामगारांनी गाडी काढून घेईपर्यंत अपमान केला व तो अपमान मी सहन केला.
पण दुःख वाटतं या गोष्टीचं माझी चुकी काय नसताना काही कर्मचाऱ्यांनी मला बाहेर काढले संचालक मंडळ १३ विरुद्ध ९ असल्याने काही मंडळींनी कारखान्याचे वाटोळे करण्याचे काम चालू केले व याच दरम्यान देशांमध्ये साखरेचे दर घसरले ३१ शे रुपयाची साखर २३ रुपये झाली व देशातील सर्व साखर कारखाने अडचणीत सापडले. ही काही माझी चुकी नव्हती व १३८ कोटी चे कर्ज १४२ कोटी वर गेले परंतु यावेळी माझ्यावर केलेली व झालेले आरोप हे विरोधकांनी सिद्ध करावे अशी माझी त्यावेळची देखील भूमिका होती सद्यस्थितीला कारखाना अडचणीत असताना कारखान्याची निवडणूक लागली आहे.

बिनविरोध साठी आम्हाला आठ जागा विरोधक देत आहेत व आपण १३ जागा घेत आहेत असा प्रस्ताव आला आहे. तरी आम्ही उद्यापासून शिंपी गट व चराटी गट मिळून खास. संजय मंडलिक, धनंजय महाडिक आम. विनय कोरे सावकार तसेच मंत्री हसन मुश्रीफ, आम. प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, माजी मंत्री आम. सतेज पाटील यांना भेटून बिनविरोध साठी प्रयत्न करणार आहोत. परंतु आमची शेतकरी संघाच्या निवडणुकीत जशी फसवणूक झाली तशी या निवडणुकीत करून घेणार नाही सुनील शिंत्रे चेअरमन असताना आमचे ३२ शे रुपये भरून ३००० सभासद केले होते.

त्यांना कोणतीही नोटीस न देता कमी केले आहेत. यासाठी आम्ही कोर्टात गेलो आहोत. ते सभासद कमी का केले याचे उत्तर द्यावे लागेल. पण आज आमचे दोन्ही गट निवडणुकीला व बिनविरोधात देखील तयार आहेत. पण निवडणूक लागलीस तर सोडणार नाही.
निवडणुकीला सामोरे जाणारच. संघामध्ये ३००० सभासद शंभर रुपये भरून केले होते. त्या सभासदापर्यंत आम्ही न पोचल्यामुळे संघाच्या निवडणुकीत अपयश आले. यामध्ये त्यांनी काही लढाया जिंकण्यासाठी नसतात तर अस्तित्वासाठी असतात असे बोलताना श्री चराटी म्हणाले

यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले अशोक चराटी यांनी संस्थेमध्ये कोणतेही राजकारणात जिल्ह्यात संस्था चांगल्या पद्धतीने चालू ठेवल्या आहेत. कै. अण्णा – भाऊ नंतर सर्व संस्था उत्कृष्टपणे चालवु शकतात व आजरा तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची वृत्ती आहे.. त्यांनी लोकांचा विश्वास मिळवल्यामुळे आजचा इतका प्रचंड जनसमुदाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमला असल्याचे बोलताना श्री घाटगे म्हणाले.

यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, भाजपचे संग्रामसिंह कुपेकर, जि प चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. अण्णाभाऊ संस्था समूहाच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवर व तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी चराटी व शिंपी गटाचे पदाधिकारी यांनी वाढदिवसानिमित्त सत्कार व शुभेच्छा श्री चराटी यांना दिल्या. या कार्यक्रमासाठी अण्णाभाऊ संस्था समूहाचे व आजरा अर्बनचे चेअरमन रमेश कुरुनकर व्हा. चेअरमन सुनील मगदूम . माजी चेअरमन डॉक्टर अनिल देशपांडे सर्व संचालक, कर्मचारी तसेच नगरसेवक अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे, आजरा साखर चे संचालक राजेंद्र सावंत, जनार्धन टोपले, दिगंबर देसाई ,आनंदराव कुलकर्णी, तसेच जनार्दन निऊगरे, प्रकाश बेलवाडे, आतिश देसाई मारुती मोरे सह अण्णाभाऊ संस्था समूह प्रेम करणारे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ऊस दराबाबत चालू असलेल्या आंदोलनात तोडगा काढावा.- सरपंच परिषद मुंबईची पालकमंत्र्यांना निवेदनाने मागणी
कोल्हापूर. प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी ऊस दर प्रश्न तातडीने लक्ष घालून कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यात समन्वयाने ऊस दर तोडगा काढून यंदाचा गळीत हंगाम त्वरित चालू करणे बाबत कार्यवाही करावी असे निवेदन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या शिष्टमंडलाने कोल्हापूर येथे नामदार हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषद मध्ये गत हंगामात तुटलेल्या ऊसाला देणे असलेला दुसरा हप्ता ४०० रुपये देनेचे मान्य करेपर्यंत तसेच यंदाच्या गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रुपये जाहीर करेपर्यंत चालू हंगामातील ऊस तुटू देणार नाही. अशी आक्रमक आंदोलनाची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.
दिवाळी सणाचे तोंडावर सबुरीची भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट साखर कारखान्याचे चेअरमन यांची भेट घेऊन खर्डा भाकरी भेट या प्रतीकात्मक आंदोलनाद्वारे दराची मागणी केली आहे. तसेच स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी विक्रम सिंह मैदान जयसिंगपूर येथे दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत ठिय्या आंदोलन चालू केले असून त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमधील निर्णय नुसार मागील हंगाातील दुसरा हफ्ता ४०० तसेच जयसिंगपूर ऊस परिषद मध्ये जाहीरपणे रुपये ३५०० प्रमाणे चालू वर्षाच्या ऊस दर पहिली उचल मागणी कडे कारखानदार पाठ फिरवत आहेत.
ऊस दराला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात कांहीं ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वयंस्पृथी तसेच शेतकरी संघटनेच्या अहवान प्रमाणे ऊस तोडणी व ऊस वाहतूक बंद केले आहे. काही ठिकाणी तोडलेला ऊस वाळत आहे. ऊस उत्पादक शेतकरी ,ऊस तोडणी कामगार ,वाहतूक यंत्रणा, पोलीस प्रशासन यांच्या बरोबर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची होऊन गावोगावी वादाचे प्रसंग घडत आहेत.

यामुळे ऊस तोडणी हंगाम लांबत चालला असून ऊस उत्पादक शेतकरी, तोडणे मजूर व वाहतूकदार यांचे फार मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शासकीय व प्रशासकीय पातळीवर यामध्ये हस्तक्षेप करून लांबत चाललेला ऊस तोडणी हंगाम त्वरित चालू करावा अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच कारखानदार व शेतकरी संघटना यांच्या योग्य समन्वयाने सर्वमान्य ऊस दर तोडगा घडवून आणण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर योग्य ती प्रयत्न व्हावे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
यावेळी प्रकाश सावंत (बानगे) लक्ष्मण माळी (बस्तवडे )शरद पाटील ,नेताजी पाटील, दीपक कुंभार,दिलीप चौगले, अभिजीत पाटील, मानसिंग पाटील (पन्हाळा), निवास गायकवाड, अक्षय डोंबे , इत्यादी जिल्ह्यातील अनेक गावचे सरपंच यांच्यासह परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनावर राजाराम पोतनीस (प्रदेश सरचिटणीस) , शिवाजीराव मोरे , (विश्वस्त व प्रदेश कार्यकारणी सदस्य),अँड. दयानंद पाटील नंद्याळकर ( जिल्हा समन्वयक), जी. एम. पाटील ( जिल्हा समन्वयक) जोष्ना पाटील ( महिला जिल्हा समन्वयक ) यांच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देण्यात आलेली आहे.
