बेलेवाडीच्या उपसरपंच पदी नारायण देसाई बिनविरोध। सत्तेचा माज आलेल्यांनी शाखा पाडली.- उद्धव ठाकरे यांचा घणाघात. ( शाखा पाडली. यांची मस्ती निवडणुकीत उतरवून टाकू.)
बेलेवाडीच्या उपसरपंच पदी नारायण देसाई बिनविरोध.
आजरा. प्रतिनिधी.

बेलेवाडी हूबळगी तालुका आजरा ग्रामपंचायत उपसरपंचपदी नारायण देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थानी सरपंच पांडुरंग कांबळे होते !यावेळी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव शिंदे, सदस्या मेघा तोरस्कर ,मनीषा केसरकर ,अनिता गायकवाड ,वर्षाराणी चव्हाण उपस्थित होते !उपसरपंच पदासाठी नारायण देसाई यांचे नाव सर्जेराव शिंदे यांनी सुचवले त्यास मनीषा केसरकर यांनी अनुमोदन दिले !आभार सर्जेराव शिंदे यांनी मानले!
ग्रामस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते!

सत्तेचा माज आलेल्यांनी शाखा पाडली.- उद्धव ठाकरे यांचा घणाघात. ( शाखा पाडली. यांची मस्ती निवडणुकीत उतरवून टाकू.)
ठाणे – प्रतिनिधी.

आज येथे काही घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रु गेली असती. यांना आता सत्तेची मस्ती आली आहे. काहींना सत्तेचा माज आलेला आहे. त्यामुळे त्यांनी शाखा पाडली. यांची मस्ती निवडणुकीत उतरवून टाकू.आमच्या जागेवर अतिक्रमण केले आहे.

तुमच्यात हिंमत असेल, तर पोलीस बाजूला करून समोर या, आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला, तर केस उपटून टाकू, आम्ही लढण्यासाठी तयार आहे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिले.शाखेपाशी ठेवलेला खोका उचला, अन्यथा फेकून देऊ. आमच्याकडे एकजणही भाड्याने कोण आलेला नाही. आज निश्चय करा, नेभळटांना थारा देणार नाही.

मुंब्रा येथे बुलडोझरने पाडलेल्या शिवसेनेच्या शाखेची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.११) सायंकाळी ५.३० च्या सुमारास पाहणी केली. यावेळी ठाकरे गटाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते.

तर यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यामध्ये वाद झाला. आव्हाड यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे येथे एकच गोंधळ उडाला.यावेळी संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, मिलिंद नार्वेकर आदी नेते उपस्थित होते. शाखेच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

