पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती आजरा.- एकून १५ पदे रिक्त.
( पशुधन विकास अधिकारी मंजूर पदे ६ पण एकाच अधिकाऱ्यावर चाललाय कारभार.- पशुसंवर्धन जि.प. कोल्हापूरचे दुर्लक्ष. )
आजरा.- संभाजी जाधव.
आजरा तालुका हा प्रामुख्याने शेती व दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करणारा तालुका या तालुक्यात जिल्हा परिषद कोल्हापूर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती आजरा या तालुक्यातील २०१७ नुसार २० वी पशुगणना झाली.

यामध्ये गाय वर्ग – ६ हजार ९८२ म्हैस वर्ग – २७ हजार ८३८ अशी गाय व म्हैस एकूण ३४ हजार ८२० इतकी आहे. तर मेंढरे ६३६, शेळ्या ९ हजार ५५ अशी आहे. सदर २०१७ नुसार पशु गणना असून.

या गणने मध्ये अजून अधिकच वाढ झाली असावी. मागील काही वर्षापासून या तालुक्यात ( पशुधन विकास अधिकारी ) मंजूर पदे ६ आहेत. १ पद भरलेले आहे.


यामध्ये आजरा, उत्तुर, मलिग्रे व भादवण या रिक्त जागा आहेत. तसेच ( पशुधन पर्यवेक्षक) मंजूर पदे ६ आहेत भरलेली पदे ५ व १ रिक्त जागा पंचायत समिती आजरा मध्ये आहे.
(व्रणोपचारक) मंजूर पदे ४ भरलेले पदे एक व रिक्त ३ पदे आहेत. यामध्ये आजरा उत्तुर व भादवण या विभागात रिक्त पदे आहेत
( परिचर ) मंजूर पदे १२ भरलेली पदे ५ तर रिक्त ७ आहेत. यामध्ये मलीग्रे २ आजरा १ उत्तुर १ भादवण १ पेरणोली १ व गवसे १ अशी एकूण १५ पदे पशुसंवर्धन विभाग आजरा पंचायत समिती यांच्याकडे आहेत

एकूणच कारभार हा १ अधिकारी व ११ कर्मचारी यांच्यावर चालला आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग अधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवर ग्रामीण भागातील पशुसंवर्धन विभाग जर रिकामी खुर्चीच असतील तर शेती या व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी जनावरांना दगा फटका झाल्यास याला जबाबदार कोण
असेल मध्यंतरी लंबी रोग आला यामध्ये अनेक जनावरे दगावली असे संकट पुन्हा येऊ नये व यासाठी जी पदे रिक्त आहेत ती नियमाने भरणे गरजेचे असताना आजरा तालुक्यात ७४ खेडोपाडी आहेत.

यासाठी एक अधिकारी यांच्यावर कारभार चालणार नसून राहिलेली पशुधन विकास अधिकारी पाच पदे सह उर्वरित ११ पदे ताबडतोड भरण्यात यावी. अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कडून होत आहे. अन्यथा पशु मालक आपल्या कार्यालयावर पशुना घेऊन मोर्चा काढण्याची वेळ येणार असल्याचे बोलले जाते.

