मल्टी-स्टेट दि आजरा अर्बन को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी श्री. कुरुणकर व व्हा. चेअरमनपदी श्री. मगदूम यांची निवड.
आजरा.- प्रतिनिधी.
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या चेअरमनपदी रमेश कुरुणकर व व्हा. चेअरमनपदी सुनिल मगदूम यांची एकमताने निवड करुन बँकेच्या संचालक मंडळाने यापुर्वीची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखलेली आहे. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा.श्री. अरुण काकडेसो (विभागीय उपनिबंधक कोल्हापूर विभाग) यांनी काम पाहीले. याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी उपस्थित होते, त्यांनी बँकेच्या नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालकांनी बँकेच्या प्रगतीच्या व ग्राहकाभिमुख जलद सेवा देणेच्या दृष्टीने एकमेकांना विश्वासात घेवून कामकाज करुन बँकेचा नावलौकीक वाढवावा असे मार्गदर्शन केले.
- चेअरमन पदासाठी श्री. कुरुणकर यांचे नांव अशोक चराटी यांनी सुचविले. त्यास डॉ. अनिल देशपांडे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी सुनिल मगदूम यांचे नांव श्री. चराटी यांनी सुचविले. त्यास सुरेश डांग यांनी अनुमोदन दिले. नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
नुतन चेअरमन श्री. कुरुणकर यांनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने अण्णा भाऊ व त्यांच्या संस्थापक सहकाऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्यानुसार पारदर्शक व्यवहार करुन बँकेचा नाव लौकीक वाढविणेसाठी सर्व संचालकांना विश्वासात घेवून अण्णा-भाऊ संस्था प्रमुख श्री चराटी यांचे मार्गदर्शनाखाली काम करणार असलेचे सांगून बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून बँकेला शेड्युल दर्जा प्राप्त करुन देण्याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
व्हा. चेअरमन श्री. मगदूम यांनी संचालकांनी सोपविलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडू अशी याप्रसंगी ग्वाही दिली. तसेच माजी चेअरमन डॉ. श्री देशपांडे व माजी व्हा. चेअरमन व विद्यमान चेअरमन श्री. कुरुणकर यांनी संचालक मंडळाने बँकेची प्रगती करणेसाठी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी बँकेचे संचालक विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन केले.
