गरीबाची दिवाळी झाली गोड आहे रे वाल्यांनी नाही रे वाल्यांना केली मदत..- उत्तुर येथे माणुसकीची भिंत नावाने उपक्रम.
आजरा.- प्रतिनिधी.
आहे रे वाल्यांनी नाही रे वाल्यांना करावी मदत अशा स्वरुपाचा उपक्रम उत्तुर येथे कांही वर्षांपूर्वी हॉटेल कोल्हापुरी नावाने चालू केलेल्या लहानशा हॉटेलमधुन सुरू करून सामाजिक कार्यकर्ते अशोक तोरस्कर व भैरू सावंत यांनी चालू केला. हॉटेलमध्ये चहा पिताना ज्या गरीबांना चहासाठी पैसे नाहीत अशा गरिबांना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांनी कुपन देऊन चहा पिण्यासाठी मदत करावी असा उपक्रम माणुसकीची भिंत नावाने चालू केला. याच स्वरुपाचा याच धर्तीवर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील अतिशय गरीब, अपंग, अनाथ, गंभीर आजाराने पीडित कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य दिवाळीच्या सणाला कपडे दानशूर व्यक्तींच्या मदतीने देण्याचा उपक्रम चालू केला आहे. हे काम अनेक वर्ष गोपनीयता पाळून केली जात आहे. या उपक्रमाला आता आहे रे वाल्यांनी नाही रे वाल्यांना करावी मदत या उपक्रमाद्वारे काम चालू केले आहे.

यावर्षीच्या दिवाळीमध्ये कै.रामचंद्र गणपती गंगापुरे ट्रस्ट उत्तुर यांच्या वतीने या उपक्रमाला प्रतिसाद देत एक हात काम करताना गमावलेल्या नेताजी साठे या अपंगाच्या दोन मुलांना व इतर काही गरजू अतिशय हलाखीच्या कुटुंबातील मुलांना कपडे देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम या गंगापुरे ट्रस्टने केले आहे. दिवाळी सनाला नवीन कपडे घालून मिरवणारी मुलं पाहून अतिशय गरीब मुलांना मात्र कोणीतरी जुनी पुराणी दिलेली कपडे घालून सण साजरा करावा लागतो. हे पाहून अतिशय वाईट वाटते हे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी प्रत्यक्ष कांहीं कुटुंबांना भेटी दिल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी पासून हा उपक्रम चालू आहे अशा गरीब कुटुंबातील मुलांच्यासाठी मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे त्यासाठी समाजातील कांहीं दानशूर व सामाजिक भावनेने मदत करतील अशा व्यक्तींकडे गोरगरीब मुलांसाठी मत मदतीची आवाहन करून त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. समाजातील गरीब श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी आहे रे वर्गाने नाही रे वर्गासाठी थोडी मदत केल्यास गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद खूप मोठा असतो. त्यामुळे हा उपक्रम यापुढेही असाच चालू ठेवणार असून समाजातील अजून खूप गरजू आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. व त्यांना मदत करावी असे आवाहन आरदाळ येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी व्यक्त केले आहे.
