HomeUncategorizedएक रकमी पहिली उचल ३५ शे रुपये दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू...

एक रकमी पहिली उचल ३५ शे रुपये दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही.- शेतकरी संघटना आक्रमक ( जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा.- राजेंद्र गड्डेनवार. – आजऱ्यात पत्रकार परिषदेत दिली माहिती. )

एक रकमी पहिली उचल ३५ शे रुपये दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही.- शेतकरी संघटना आक्रमक ( जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा.- राजेंद्र गड्डेनवार. – आजऱ्यात पत्रकार परिषदेत दिली माहिती. )

आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रकमी पहिली उचल ३५ शे रुपये व मागील ४०० रुपये द्यावेच लागतील त्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही. यासाठी कारखानदारांनी ऊस उत्पादकांना ही रक्कम देणे बाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घ्यावा. असे शेतकरी संघटनेचे राज्य संघटक राजेंद्र गड्डेनवार यांनी आजरा येथे बुधवार दि. ८ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले स्वागत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तानाजी देसाई यांनी केले. यावेळी श्री गड्डेनवार बोलताना म्हणाले मागील अनेक दिवसापासून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खास. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मागील चारशे रुपये व एक रकमी ३५ शे पहिली उचल मिळाले पाहिजेत यासाठी हे आंदोलन फक्त शेतकरी संघटनेचे नसून हे आंदोलन सामान्य शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद, तोडणी ओढणी वाहतूकदार यांच्यासाठी आहे. जीवनावश्यक वस्तू सह डिझेल पेट्रोल गॅस इतकी महागाई वाढली. परंतु एफ आर पी मध्ये वाढ झाली नाही का? शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळावे यासाठी जिल्ह्यात ३५ सभा घेऊन आमची भूमिका मांडली आहे. मागील वर्षाच्या आर्थिक हिशोबाप्रमाणे चालू हंगाम चालू होण्यापूर्वी आम्ही केलेली मागणी मान्य करावी अन्यथा समाधानकारक दिल्याशिवाय ऊस घालणार नाही अशी भूमिका ऊस उत्पादकांनी देखील घेतली आहे यामुळे आता पहिली उचल ३५ शे दिल्याशिवाय कारखानदारांनी उसाच्या कांड्याला हात लावू नये असे शेवटी बोलताना श्री गड्डेनवार म्हणाले

कारखाना आर्थिक अडचण असताना आपण केलेली मागणी ही कोणत्या आधारे भागवावी असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर संचालक व शेतकरी संघटना अध्यक्ष तानाजी देसाई. म्हणाले- कारखान्याला शेतकरी संघटनेने केलेली मागणी रास्त असून सद्य परिस्थितीत मागील चारशे रुपये देणे शक्य आहे. कारण साखर तखरणसाठी घेतलेले १०० कोटी रुपये कर्ज उर्वरित साखरेतून भागून ३ कोटी २५ लाख शिल्लक राहतात त्यातून सदर केलेली मागणी ही भागवता येते. याबाबत देण्याची भूमिका ठेवल्यास योग्य तो तोडगा काढून मागील चारशे रुपये देता येतात असे श्री देसाई म्हणाले.. 】

आभार सखाराम केसरकर यांनी मानले यावेळी कृष्णा पाटील, धनाजी पाटील, निवृत्ती कांबळे, धोंडीराम पाटील, बसवराज मुदाळे, राणोजी कुंभार, धोंडीबा सावंत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.